Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

APJ Abdul Kalam : भारतरत्न कलामांचा अनोखा खजिना पुण्यात; ‘या’ ठिकाणी आहे ५०० दुर्मीळ फोटोंचा संग्रह

Rare Photos of Abdul Kalam : पुण्यात भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या ५०० हून अधिक अत्यंत दुर्मिळ आणि अनमोल फोटोंचा संग्रह जपण्यात आला आहे. खडकी शिक्षण संस्थेच्या श्रीमती शकुंतला हेमराज मुथा चित्रकला महाविद्यालयाने हा दुर्मिळ खजिना जपला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 20, 2026 | 04:05 PM
Bharat Ratna Abdul Kalam Rare Photos

Bharat Ratna Abdul Kalam Rare Photos

Follow Us
Follow Us:
  • खडकीत वसलंय डॉ. कलामांचं ‘गाव’
  • चित्रकला महाविद्यालयाने जपली ५०० दुर्मीळ छायाचित्रे
पुणे : सोनाजी गाढवे : आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचं आणि देशभरातील विविध शाळांचं नातं त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत अजोड होतं. आजही देशातल्या कितीतरी शाळांनी कलामांच्या नावाचा ठेवा जपून ठेवलाय. खडकी शिक्षण संस्थेच्या चित्रकला महाविद्यालयाकडेही त्यांच्या दुर्मीळ ५०० हून अधिक छायाचित्रांचा अनमोल संग्रह आहे. तो पाहताना जणू आपण कलामांच्या ‘गावातच’ आलो की काय, असा भास होतो.

हे देखील वाचा : Pune Gang War: पुण्यात गँगवॉर पुन्हा पेटलं! बालाजीनगरात गोळीबार करून अक्षय म्हस्केची हत्या

खडकी शिक्षण संस्थेत २००२ पासून श्रीमती शकुंतला हेमराज मुथा चित्रकला महाविद्यालय कार्यरत आहे. या महाविद्यालयानं आजवर अनेक नामांकित चित्रकार घडवले. दोन वर्षांपूर्वी संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या पाहण्यात एके ठिकाणी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची दुर्मीळ छायाचित्रे आली. ती आपल्या संस्थेत असावीत, असे त्यांना वाटल्याने त्यांनी कैलास भिंगारे यांच्यामार्फत ५०० हून अधिक छायाचित्रांचा अनमोल संग्रह मिळवला. त्यानंतर संस्थेने ही छायाचित्रे अतिशय आकर्षक स्वरूपात जपण्याचे काम केले आहे.

सर्वसामान्य चाहत्यांना कलामांच्या आठवणी जागवता आल्या पाहिजेत, यासाठी त्यांचे प्रदर्शन भरविण्यावर संस्थेचे सचिव आनंद छाजेड, सहसचिव व प्राचार्य डॉ. संजय चाकणे, संचालक ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी भर दिला. त्यानुसार चित्रकला महाविद्यालयाचे मुख्यध्यापक दिनेश लोखंडे व त्यांचे सहकारी संस्थाचालकांच्या मदतीने वेळोवेळी चाहते व विद्यार्थी-विद्यार्थ्यांसाठी त्याची प्रदर्शने भरवतात.

कोणकोणती छायाचित्रे आहेत?

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या दुर्मीळ छायाचित्रांत त्यांच्या विविध मान्यवरांसोबतच्या भेटींची छायाचित्रे, देशासाठी राबविलेल्या विविध मोहिमांच्या काळातील छायाचित्रे, विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधतानाच्या कँडिड आठवणी आणि त्यांच्यासोबत देशासाठी योगदान दिलेल्या विविध शास्रज्ञांसोबतच्या मोहिमाही या छायाचित्रांत कैद आहेत. ही छायाचित्रे पाहताना कलामांचे चाहते व विद्यार्थी-विद्यार्थिनी हरखून जातात.

खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी म्हटले की, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे आपल्या देशाचं भूषण होते. त्यांची दुर्मीळ छायाचित्रे लोकांसमोर आली पाहिजेत, हा आमचा आग्रह आहे. त्यासाठीच त्यांचे प्रदर्शन भरवले गेले पाहिजे, सर्वसामान्य चाहत्यांना कलामांच्या आठवणी जागवता आल्या पाहिजेत.

हे देखील वाचा : मराठी चित्रपट महामंडळासाठी ‘या’ तारखेला होणार मतदान; निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Web Title: Bharat ratna abdul kalam rare photo collection pune khadki

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • apj abdul kalam
  • Marathi News
  • pune news

संबंधित बातम्या

‘लालपरी’ला पावसाचा फटका; पुणे एसटी प्रशासनाला दररोज भोगावे लागतेय तब्बल ‘इतक्या’ कोटींचे नुकसान
1

‘लालपरी’ला पावसाचा फटका; पुणे एसटी प्रशासनाला दररोज भोगावे लागतेय तब्बल ‘इतक्या’ कोटींचे नुकसान

हातमाग क्षेत्राचा कायापालट होणार! केंद्र सरकारकडून ‘हँडलूम हॅकेथॉन २०२६’ ची घोषणा; विणकरांना मिळणार तंत्रज्ञानाची साथ
2

हातमाग क्षेत्राचा कायापालट होणार! केंद्र सरकारकडून ‘हँडलूम हॅकेथॉन २०२६’ ची घोषणा; विणकरांना मिळणार तंत्रज्ञानाची साथ

Flight Ticket:  विंडो सीटसाठी जादा पैसे का? एअरलाईन्सच्या Seat Selection Fee चं संपूर्ण गणित
3

Flight Ticket: विंडो सीटसाठी जादा पैसे का? एअरलाईन्सच्या Seat Selection Fee चं संपूर्ण गणित

Food Inflation: महागाईचा उडाला भडका! Veg, Nonveg दोन्ही थाळ्या महागल्या; 5 महिन्यांतील उच्चांकावर पोहोचला जेवणाचा खर्च
4

Food Inflation: महागाईचा उडाला भडका! Veg, Nonveg दोन्ही थाळ्या महागल्या; 5 महिन्यांतील उच्चांकावर पोहोचला जेवणाचा खर्च

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.