Three new municipalities in Pune district : मागील काही वर्षात पुणे जिल्ह्याचा वाढता विस्तार, शहरीकरण आणि पायाभूत सुविधा, आयटी पार्क,औद्योगिक क्षेत्र, वाहतुकीच्या समस्या या सर्व समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालल्या आहेत. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका स्थापन करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. हवेली, जुन्नर आणि इंदापूर या शहरांचा यामध्ये समावेश असून, लवकरच या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे संबंधित शहरांच्या शहरीकरणास वेग येणार असून नागरी सुविधा आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
नगरविकास विभागाच्या सूत्रांनुसार, संबंधित भागांमध्ये लोकसंख्या वाढ, शहरी विस्तार आणि प्रशासनिक गरजा लक्षात घेता महापालिका स्थापनेचा प्रस्ताव पुढे नेण्यात आला आहे. सध्या या भागांमध्ये नगरपालिका किंवा नगरपंचायती कार्यरत आहेत, मात्र वाढत्या शहरी गरजांमुळे महापालिकेचे स्वतंत्र प्रशासन आवश्यक ठरत असल्याचे मत प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आले आहे. या प्रस्तावासंदर्भात स्थानिक स्तरावर सर्वेक्षण आणि आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचे समजते. स्थानिक जनतेकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून, भविष्यातील नियोजनबद्ध विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच नव्या महापालिकांची घोषणा केली. पुणे जिल्ह्यातील चाकण, हिंजवडी आणि उरळी देवाची-फुरसुंगी-मांजरी अशा तीन महापालिकांचा समावेश करण्यात येणार आहे. अजित पवार आज चाकण येथील औद्योगिक क्षेत्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी चाकण औद्योगिक क्षेत्रातील नागरी समस्यांची पाहणी केली. यासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, चाकणमध्ये नगरपरिषद असल्यामुळे इथल्या विकासावर मर्यादा येत आहेत. तसेच हिंजवडीमध्येही ग्रामपंचायत असल्यामुळे तिथेही विकास कामांवर मर्यादा येत आहेत. त्यामुळे चाकण आणि हिंजवडीसाठी नव्या महानगरपालिकांची स्थापना करण्यात येणार आहे. याशिवाय उरळी देवाची-मांजरी-फुरसुंगसाठी नवीन महापालिका होणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवार म्हणाले, ” गेल्या काही वर्षात पुणे जिल्ह्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. हिंजवडी आयटी पार्क, चाकण औद्योगिक क्षेत्रामुळे इथल्या नागरी समस्यांही सातत्याने वाढत आहेत. हिंजवडीमध्ये होणारी वाहतूक कोंडींची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून ती गंभीर होत आहे. या सर्व समस्यांच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यांपासून दर आठवड्याला आयटी पार्क आणि चाकण औद्योगिक क्षेत्राची पाहणी सुरू आहे.
हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्क परिसरातील रस्ते रुंदीकरणाच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. स्थानिक ग्रामपंचायतींनी गावठाण हद्दीत रस्त्यांची रुंदी मर्यादित ठेवण्याची मागणी ठामपणे मांडली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त यांनी गुरुवारी स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा केली. या चर्चेनंतर ग्रामस्थ आज (शुक्रवार) अजित पवार यांची भेट घेऊन आपली बाजू सविस्तरपणे मांडणार आहेत. त्यामुळे राजीव गांधी आयटी पार्कमधील रस्ते विकासाचा मुद्दा पुन्हा एकदा अजित पवार यांच्या कोर्टात गेला आहे.