लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील महादेवपुरा मतदारसंघात झालेल्या बोगस मतदानाचे राहुल गांधीनी पुरावेच दाखवले
Rahul Gandhi Press Conference: गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने करत आहेत. गुरूवारी (७ ऑगस्ट) पत्रकार परिषदेत मतचोरीचा आरोप केला आणि भाजप आणि निवडणूक आयोग एकमेकांशी हातमिळवणी करत असल्याचे सांगितले. गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील महादेवपुरा मतदारसंघातील थेट आकडेवारीच त्यांनी सादर केली आहे. मतदार यादी ही देशाची मालमत्ता आहे, परंतु निवडणूक आयोगाकडून निवडणूक यादी देण्यास आम्हाला नकार देण्यात आला.
राहुल म्हणाले, जेव्हा आम्ही डेटाचे विश्लेषण करतो तेव्हा आम्हाला सॉफ्ट कॉपीची आवश्यकता असते. परंतु निवडणूक आयोग ती दिली नाही. आम्ही आमची चौकशी सुरू केली. अंतर्गत सर्वेक्षणात आम्हाला आढळले की, आम्ही लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात १६ जागा जिंकत आहोत, परंतु प्रत्यक्षात आम्ही फक्त ९ जागा जिंकल्या. ज्या सात जागांवर आम्ही हरलो त्यापैकी एका जागेची (महादेवपुरा मतदारसंघ) आम्ही चौकशी केली. यासाठी आम्ही महादेवपुरा विधानसभा जागेवर लक्ष केंद्रित केले.
राहुल म्हणाले की, ”२०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला बेंगळुरू मध्यवर्ती जागेवर ६,२६, २०८ मते मिळाली. त्याच वेळी, भाजपला ६,५८,९१५ मते मिळाली. विजयाचे अंतर ३२,७०७ होते. जेव्हा आम्ही महादेवपुरा विधानसभा जागेची चौकशी केली तेव्हा याठिकाणी काँग्रेसला १,१५,५८६ मते मिळाल्याचे आमच्या निदर्शनास आले. तर भाजपला २,२९,६३२ मते मिळाली. दोघांमधील विजय आणि पराभवाचे अंतर १,१४,०४६ होते. महादेवपुरा वगळता या भागातील सर्व विधानसभा जागांवर काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यानंतर आम्ही आकडेवारी पाहण्यास सुरुवात केली. फक्त एकाच जागेवर एवढी मोठी संख्या का आली. आम्हाला आढळले की महादेवपुरामधील ६ लाख ५० हजार मतांपैकी १ लाख २५० मते चोरीला गेली. हे ५ मत पाच वेगवेगळ्या प्रकारे चोरीला गेले.
या भागात ११ हजार ९६५ डुप्लिकेट मतदार होते.
खोटे पत्ते असलेले ४० हजार ९ मतदार होते.
एकच पत्ता असलेले १० हजार ४५२ बहुमत मतदार होते.
फॉर्म ६ चा गैरवापर ३३ हजार ६९२ आढळून आला.
बोगस छायाचित्रे असलेले मतदार – ४१३२
राहुल गांधींनी मतदार यादीत एकच मतदार अनेक वेळा कसा दिसला हे स्पष्ट केले. त्यांनी गुरकिरत सिंग नावाच्या व्यक्तीचे उदाहरण देत सांगितले की, गुरकिरत सिंग नावाची व्यक्तीची मतदार यादीतील ४ वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर नोंदणी असल्याचे आढळून आले. गुरकिरत सिंग हा एकटाच नाही तर असे हजारो मतदार आहेत. इतकेच नव्हे तर एकच मतदार वेगवेगळ्या राज्यात मतदार करत आहे. आदित्य श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीने महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेशमध्येही मतदान केले. एकच व्यक्ती वेगवेगळ्या राज्यात मतदान करणारे असे हजारो मतदार आहेत. तसेच, एकाच पत्त्यावर अनेक मतदार असल्याचेही आढळून आले आहे. मतदार यादीत एकाचा घर क्रमांक ३५ आहे. याठिकाणी ८० मतदार आहेत. घर क्रमांक ७९१ आहे आणि तिथे ४६ मतदार आहेत. मग एका खोलीच्या घरात इतके मतदार कसे असू शकतात?, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
Budget Friendly Travel : कमी बजेटमध्ये करा इंटरनॅशनल ट्रिप; 50 हजार रुपयांतच होईल या 3 देशांची सफर
आपल्या संविधानात ज्या गोष्टी नमूद केल्या आहेत त्या या वस्तुस्थितीवर आधारित आहेत, एका व्यक्तीला एका मताचा अधिकार देण्यात आला आहे. पण आता ही वस्तुस्थिती सुरक्षित राहिली आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. काही काळापासून जनतेमध्ये सत्ताविरोधी वातावरण असल्याची शंका होती. पण भाजप एकमेव असा पक्ष होता, सत्ताविरोधी वातावरण परंतु भाजप हा एकमेव पक्ष आहे ज्याच्याविरुद्ध हे वातावरण कुठेही दिसत नाही.
महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, सर्वेक्षणातून काही महत्त्वाची आकडेवारी समोर आली होती. पण निकाल काहीतरी वेगळेच निघाले. जेव्हा ईव्हीएम नव्हते तेव्हा संपूर्ण देश एकाच दिवशी मतदान करत होता. पण आजच्या काळात टप्प्याटप्प्याने मतदान होते. ही परिस्तिथी देखील संशयास्पद आहे.
पाच वर्षात जितक्या मतदार जोडण्यात आले नव्हते, तितके मतदार लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात पाच महिन्यांत इतक्या मतदारांची नावे जोडण्यात आली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान महाराष्ट्रात एक कोटी मतदार वाढले. आम्ही निवडणूक आयोगाकडे जाऊन महाराष्ट्रातील निवडणूक चोरली गेल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यांच्याकडे फेरमतमोजणीची मागणीही केली, पण निवडणूक आयोगाने मशीन रीडेबल यादी देण्यास नकार दिला. आधी आमच्याकड कोणतेही पुरावे नव्हते. पण आता निवडणूक आयोग भाजपसोबत मिळून निवडणुकीत फेरफार करत असल्याचा आरोप राहूल गांधी यांनी केला आहे.






