
देवघराच्या खिडकीतून घरात प्रवेश, सोनं-रोकड लंपास; दहा दिवसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या
ऐन दिवाळीच्या काळात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (९ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १.३० ते सकाळी ७.३० या वेळेत) हडपसर येथील नेताजी सुभाष गृह रचना सोसायटीत अज्ञाताने घरात शिरून देवघराच्या खिडकीतून आत प्रवेश केला. नंतर देवघरात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेला होता. याप्रकरणी हडपसर पोलिसांत गुन्हा नोंद केला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू होता. त्यानुसार युनिट सहाचे पोलिस निरीक्षक संतोष शेटे व पथक तपास केला. सलग दहा दिवस तांत्रिक विश्लेषण, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी व गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून आरोपीचा माग काढला.
दरम्यान, आरोपी रोहित पवार हा म्हातोबाची आळंदी परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिस अंमलदार संतोष राठोड यांना मिळाली. त्यानूसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता, त्याने हडपसर येथील घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीकडून चोरीला गेलेली ७ लाख ५४ हजार रुपयांची रोकड आणि २५.१ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ३८ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालेल्या या मोठ्या घरफोडीचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.
Ans: घरफोडीत ७ लाख ५४ हजार रुपये रोख आणि २५.१ तोळे सोन्याचे दागिने, असा एकूण ३८ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता.
Ans: गुन्हे शाखेच्या युनिट सहाने रोहित ऊर्फ पिल्या प्रवीण पवार (वय २५) याला अटक केली आहे.
Ans: पोलिसांनी सलग दहा दिवस तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा माग काढला. त्यानंतर सापळा रचून त्याला म्हातोबाची आळंदी परिसरातून ताब्यात घेण्यात आले.