Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati Crime : अमरावतीत दरोड्याचा मोठा डाव उधळला; सात जणांना पोलिसांनी पकडले

अमरावती शहरातील राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करून ताब्यात घेतले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 21, 2026 | 01:21 PM
अमरावतीत दरोड्याचा मोठा डाव उधळला; सात जणांना पोलिसांनी पकडले

अमरावतीत दरोड्याचा मोठा डाव उधळला; सात जणांना पोलिसांनी पकडले

Follow Us
Follow Us:
  • दरोड्याचा डाव उधळला
  • सात जणांना घेतले ताब्यात
  • ३.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त
अमरावती : अमरावती शहरातील राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करून ताब्यात घेतले आहे. रवीनगर रोडवरील दसरा मैदान परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपींकडून दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, मोबाइल आणि वाहनांसह एकूण ३ लाख २६ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे दरोड्याचा संभाव्य प्रकार घडण्यापूर्वीच उधळण्यात यश आले आहे.

 

गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दसरा मैदान परिसरात काही संशयित दरोडा टाकण्याच्या तयारीत एकत्र जमले आहेत. माहिती मिळताच पोलिस पथकाने रवीनगर रोडवरील दसरा मैदान परिसर गाठून पाहणी केली. त्यावेळी काही जण अंधारात झाडाझुडपांच्या आडोशाला संशयास्पदरीत्या बसल्याचे दिसून आले. ते दरोड्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करून सातही जणांना ताब्यात घेतले.

दरोड्याचे साहित्य जप्त

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून मिरची पावडरचे पॅकेट, लोखंडी टॉमी, लोखंडी रॉड, लाकडी लाठी, चाकू, मोबाइल, दोरी तसेच वाहन आदी साहित्य जप्त करण्यात आले. या साहित्याच्या आधारे आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये सागर धोटे, रोहित जाजळे, सोहळ पचककार, कार्तिक ठोके, समर्थ कळकटकर, प्रतीक कुशराम आणि सुदर्शन वानखेडे यांचा समावेश आहे. या प्रकरणी राजापेठ पोलिस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : कुर्ल्यात धक्कादायक प्रकार! तरुण जोडप्यावर अल्पवयीन मुलांचा बेल्ट-काठी, दगडाने हल्ला, मारहाणीचा VIDEO व्हायरल

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त यशवंत सोळंके, पोलिस उपायुक्त शाम घुगे, पोलिस उपायुक्त प्रांजली सोनवणे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) नीलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

हे सुद्धा वाचा : ट्रक थांबविणे बाप-लेकाला पडले महागात, भर चौकात बेदम मारहाण; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या किती जणांना ताब्यात घेण्यात आले?

    Ans: गुन्हे शाखेने दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात जणांना ताब्यात घेतले.

  • Que: किती रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला?

    Ans: पोलिसांनी वाहन आणि दरोड्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांसह एकूण ३ लाख २६ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

  • Que: आरोपींकडून कोणते साहित्य जप्त करण्यात आले?

    Ans: मिरची पावडर, लोखंडी टॉमी, लोखंडी रॉड, लाकडी लाठी, चाकू, मोबाइल, दोरी आणि वाहन आदी साहित्य जप्त करण्यात आले.

Web Title: In amravati the police have apprehended seven individuals who were preparing to commit a robbery nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Tata Dam Project: धरणाच्या ब्लास्टिंगमुळे घरांना तडे, ग्रामस्थांच्या जीवाला धोका; तापकीरवाडीत महिला-विद्यार्थ्यावर दगडांचा मारा
1

Tata Dam Project: धरणाच्या ब्लास्टिंगमुळे घरांना तडे, ग्रामस्थांच्या जीवाला धोका; तापकीरवाडीत महिला-विद्यार्थ्यावर दगडांचा मारा

ट्रक थांबविणे बाप-लेकाला पडले महागात, भर चौकात बेदम मारहाण; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
2

ट्रक थांबविणे बाप-लेकाला पडले महागात, भर चौकात बेदम मारहाण; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट
3

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट

देवघराच्या खिडकीतून घरात प्रवेश, सोनं-रोकड लंपास; दहा दिवसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या
4

देवघराच्या खिडकीतून घरात प्रवेश, सोनं-रोकड लंपास; दहा दिवसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.