Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बुकट्यूबर’मुळे तरुणाई पुन्हा वाचनाकडे आकर्षित; युट्यूबच्या माध्यमातून पुस्तकांचे परीक्षण

सध्याच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात वाचनसंस्कृती लोप पावत असल्याची चर्चा होत असली, तरी ‘बुकट्यूबर’ या नव्या संकल्पनेने या समजुतीला छेद दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 26, 2026 | 02:57 PM
‘बुकट्यूबर’मुळे तरुणाई पुन्हा वाचनाकडे आकर्षित; युट्यूबच्या माध्यमातून पुस्तकांचे परीक्षण

‘बुकट्यूबर’मुळे तरुणाई पुन्हा वाचनाकडे आकर्षित; युट्यूबच्या माध्यमातून पुस्तकांचे परीक्षण

Follow Us
Follow Us:

पुणे/पवळे गायत्री : सध्याच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात वाचनसंस्कृती लोप पावत असल्याची चर्चा होत असली, तरी ‘बुकट्यूबर’ या नव्या संकल्पनेने या समजुतीला छेद दिला आहे. युट्युब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पुस्तकांचे परीक्षण व शिफारसी करणारे हे डिजिटल कंटेंट क्रिएटर्स तरुणाईला पुन्हा वाचनप्रवाहात आणत असल्याचे चित्र दिसत आहे.

 

“बुकट्यूबर” म्हणजे पुस्तकांचे परीक्षण, कथासार, लेखकांची ओळख आणि वाचनाचे महत्त्व यावर आधारित व्हिडिओ तयार करणारे निर्माते. पारंपरिक पुस्तक परीक्षणाच्या पलीकडे जाऊन हे बुकट्यूबर्स आपल्या सादरीकरणात नाट्यमयता, दृश्यात्मकता आणि वैयक्तिक अनुभवांचा समावेश करतात. त्यामुळे प्रेक्षकांना वाचनाकडे आकर्षित करण्यात ते यशस्वी ठरत आहेत. विशेषतः तरुण पिढीला लक्षात घेऊन तयार केलेले हे व्हिडिओ हलक्या-फुलक्या शैलीत सादर केले जातात. “५ मिनिटांत पुस्तकाचा सारांश”, “वाचायलाच हवेत अशी १० पुस्तके”, “प्रेरणादायी कादंबऱ्या” अशा विविध विषयांवर व्हिडिओ तयार होत आहेत. त्यामुळे वाचनाविषयीची भीती किंवा कंटाळा कमी होऊन नव्या वाचकवर्गाची निर्मिती होत आहे.

पुण्यातील काही तरुणांनीही या संकल्पनेचा स्वीकार करत मराठी साहित्याला डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मराठी कादंबऱ्या, कथा आणि काव्यसंग्रह यांचे सुलभ व आकर्षक सादरीकरण करून ते स्थानिक साहित्याची ओळख नव्या पिढीला करून देत आहेत. त्यामुळे वाचनसंस्कृतीसोबतच मराठी साहित्याचा प्रसारही वाढत आहे. शिक्षणतज्ज्ञांच्या मते, बुकट्यूबर ही संकल्पना पारंपरिक वाचन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा उत्तम संगम आहे. विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांविषयी उत्सुकता निर्माण करण्यासाठी हा प्रभावी मार्ग ठरू शकतो. शाळा व महाविद्यालयांनीही या माध्यमाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावावी, असे मत व्यक्त केले जात आहे.

मराठी साहित्याचा जागतिक प्रवास

इंग्रजी साहित्यासोबतच मराठी ‘बुक ट्यूबिंग’ क्षेत्रातही मोठी वाढ होत आहे. पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, ग. दि. माडगुळकर यांसारख्या दिग्गज लेखकांपासून ते नवोदित लेखकांच्या साहित्यावर बुकट्यूबर्स भाष्य करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राबरोबरच जगभरातील मराठी भाषिकांपर्यंत साहित्य पोहोचण्यास मदत होत आहे.

“एखाद्या पुस्तकाची ओळख करून दिल्यामुळे वाचकांना त्याच्या विषयाचा अंदाज येतो. ते पुस्तक आपल्या उपयोगाचे आहे का, हे समजून घेणे सोपे जाते आणि खरेदीचा निर्णय घेता येतो. व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत विविध विषयांची पुस्तके पोहोचवता येतात. त्यामुळे वाचनाची सवय नसलेल्या व्यक्तींमध्येही हळूहळू वाचनाची आवड निर्माण होते.” — रेशम जगताप, बुकट्यूबर

प्रकाशन क्षेत्रावर सकारात्मक परिणाम

पुस्तकांच्या जाहिरातीचे पारंपरिक मार्ग बदलत असून, अनेक नामवंत प्रकाशक आता बुकट्यूबर्सच्या माध्यमातून आपल्या पुस्तकांचे परीक्षण करून घेत आहेत. एखाद्या लोकप्रिय बुकट्यूबरने सकारात्मक मत दिल्यास त्या पुस्तकाच्या विक्रीत व ‘प्री-बुकिंग’मध्ये वाढ होत असल्याचे ग्रंथविक्रेत्यांचे निरीक्षण आहे.

“बुकट्यूबर हे तंत्रज्ञानाच्या कल्पक वापरातून पुढे आलेले प्रभावी माध्यम आहे. मोबाईल आणि इंटरनेटच्या साहाय्याने कुठलेही पुस्तक सहज उपलब्ध होत असल्याने तरुण पिढी त्याकडे आकर्षित होत आहे. पूर्ण पुस्तक न दाखवता उत्सुकता निर्माण केली जाते, ज्यामुळे वाचनसंस्कृतीला चालना मिळते.” — अनिल खिरडकर, विद्यार्थी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

Web Title: Booktubers are attracting the younger generation to reading

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • book reading
  • pune news
  • Social Media

संबंधित बातम्या

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!
1

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय
2

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश
3

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश

Football प्रेमींसाठी पर्वणी! पुण्यनगरीत ‘लोयोला कप २०२६’चा धुमाकूळ; पाहा कोणते संघ आमनेसामने?
4

Football प्रेमींसाठी पर्वणी! पुण्यनगरीत ‘लोयोला कप २०२६’चा धुमाकूळ; पाहा कोणते संघ आमनेसामने?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.