Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune: युवा खेळाडूंचा जलवा! DSP करंडक स्पर्धेत ढोले-पाटील अकादमीची विजयाची हॅट्रिक; ‘या’ संघाचा दारुण पराभव

Pune: दुसऱ्या सामन्यात ढोले पाटील क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २५ षटकांत सात गडी गमावून २२४ धावांचा भक्कम डोंगर उभारला. नुवान चांदेकर याने ४१ चेंडूंत १० चौकारांसह ५२ धावांची खेळी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 02, 2026 | 03:04 PM
१० वर्षांखालील स्पर्धेत व्हिबग्योरचीही विजयी कामगिरी

१० वर्षांखालील स्पर्धेत व्हिबग्योरचीही विजयी कामगिरी

Follow Us
Follow Us:
  • डीएसपी करंडकमध्ये ढोले पाटील अकादमीचा तिसरा विजय
  • १० वर्षांखालील स्पर्धेत व्हिबग्योरचीही विजयी कामगिरी
  • रिदान देसाईची भेदक गोलंदाजी
Pune: डीएसपी स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स यांच्या वतीने आयोजित पहिल्या डीएसपी करंडक १० वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत ढोले पाटील क्रिकेट अकादमीने सलग तिसरा विजय नोंदवत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. साखळी फेरीतील सामन्यात ढोले पाटील अकादमीने व्हिबग्योर क्रिकेट अकादमीचा तब्बल १५२ धावांनी पराभव केला. अन्य सामन्यात व्हिबग्योर क्रिकेट अकादमीने पुणे फ्युचर स्टार्स संघावर दोन गडी राखून मात करत स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला.

वाघोली येथील पुणे क्रिकेट क्लबच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात पुणे फ्युचर स्टार्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २३.४ षटकांत सर्वबाद १२५ धावा केल्या. सर्वज्ञ बोऱ्हाडे (२०) आणि यतीन शर्मा (१७) यांनी धावा केल्या. व्हिबग्योरकडून गितांश बारस्कर याने प्रभावी गोलंदाजी करत १४ धावांत तीन गडी बाद केले. आहिल शेख आणि श्रेयांशी दास यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.प्रत्युत्तरात व्हिबग्योर क्रिकेट अकादमीनेही २३.४ षटकांत आठ गडी गमावून १२६ धावा करत विजयाचे लक्ष्य पूर्ण केले. वेदांत कुमार (१७), दीपक देवरानी (१४) आणि राकेश कुमार (नाबाद ९) यांनी योगदान दिले. पुणे फ्युचर स्टार्सकडून यतीन शर्मा याने १८ धावांत चार गडी बाद केले. मात्र, व्हिबग्योरने दोन गडी राखून विजय मिळवला. अष्टपैलू कामगिरी करणारा गितांश बारस्कर सामनावीर ठरला.

Naushad Khan Viral Video: वडिलांची शिकवण कामी आली! नौशाद खान यांच्या लेकाने मोडला ३५ वर्षांचा विक्रम

 नुवानची सुंदर फटकेबाजी

दुसऱ्या सामन्यात ढोले पाटील क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २५ षटकांत सात गडी गमावून २२४ धावांचा भक्कम डोंगर उभारला. नुवान चांदेकर याने ४१ चेंडूंत १० चौकारांसह ५२ धावांची खेळी केली. त्याला प्रतीक राठोड याने नाबाद ५४ धावा करत मोलाची साथ दिली. प्रतीकने ३५ चेंडूंत नऊ चौकार लगावले. पार्थ निकम यानेही २४ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकारासह नाबाद ३७ धावा करत धावसंख्येत भर घातली.

प्रतिकची दमदार कामगिरी

२२५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना व्हिबग्योर क्रिकेट अकादमीचा डाव १९.५ षटकांत अवघ्या ७२ धावांत आटोपला. आवीर सेठी (१०) याच्याशिवाय अन्य फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. ढोले पाटीलकडून रिदान देसाई याने केवळ एका धावेच्या मोबदल्यात चार गडी बाद करत प्रतिस्पर्धी संघाचे कंबरडे मोडले. प्रतीक राठोड यानेही २२ धावांत दोन गडी बाद केले. भेदक गोलंदाजी करणारा रिदान देसाई सामनावीर ठरला. या विजयासह ढोले पाटील अकादमीने स्पर्धेत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.

Cricket News: प्रियांश राठोडची फटकेबाजी, विहान बोकरियाचा विकेट्सचा चौकार; सीएनए अंतिम फेरीत

💡

Frequently Asked Questions

  • Que: डीएसपी करंडक स्पर्धेत ढोले-पाटील अकादमीचा कितवा विजय आहे?

    Ans: ढोले-पाटील क्रिकेट अकादमीने या संप्रदहेत सलग तिसरा विजय पटकावला आहे.

  • Que: ढोले पाटील क्रिकेट अकादमीने 25 ओव्हर्समध्ये किती रन्स केल्या?

    Ans: ढोले पाटील क्रिकेट अकादमीने 25 ओव्हर्समध्ये 224 रन्सचा डोंगर उभा केला.

Web Title: Dhole patil cricket academy beat vibgyor team dsp league pune tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • cricket news
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

MHADA Lottery 2026 : तीन वेळा मुदतवाढ देण्याची वेळ का आली? म्हाडाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
1

MHADA Lottery 2026 : तीन वेळा मुदतवाढ देण्याची वेळ का आली? म्हाडाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Pune Metro Line 3: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! ३ नोव्हेंबरला शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन
2

Pune Metro Line 3: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! ३ नोव्हेंबरला शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन

Rain Update: बारामतीसह इंदापूरच्या बहुतांश भागात पावसाने झोडपले, द्राक्ष-डाळिंब बागांवर संकटाचे सावट
3

Rain Update: बारामतीसह इंदापूरच्या बहुतांश भागात पावसाने झोडपले, द्राक्ष-डाळिंब बागांवर संकटाचे सावट

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक समोर
4

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.