Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे महापालिकेचे ऐतिहासिक पाऊल, बाणेरमध्ये कॅन्सर सेंटर प्रकल्प; ‘या’ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे महापालिका आणि अपुलकी मेडिकल केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या १५० खाटांच्या अत्याधुनिक कॅन्सर आणि हृदयविकार रुग्णालयाचे लोकार्पण येत्या रविवारी होणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 16, 2026 | 12:52 PM
पुणे महापालिकेचे ऐतिहासिक पाऊल, बाणेरमध्ये कॅन्सर सेंटर प्रकल्प; 'या' तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे महापालिकेचे ऐतिहासिक पाऊल, बाणेरमध्ये कॅन्सर सेंटर प्रकल्प; 'या' तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे शहरात कॅन्सर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुणे महापालिका आणि अपुलकी मेडिकल केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या १५० खाटांच्या अत्याधुनिक कॅन्सर आणि हृदयविकार रुग्णालयाचे लोकार्पण येत्या रविवार (दि.१७) रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

 

बाणेर येथे सुमारे १ एकर जागेत उभारण्यात आलेला हा १६५ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, यामध्ये पुणे महापालिकेने १४ कोटी रुपयांची जमीन उपलब्ध करून दिली आहे. उर्वरित गुंतवणूक, व्यवस्थापन आणि कर्मचारी खर्चाची जबाबदारी संबंधित संस्था म्हणजेच अपुलकी मेडिकल केअर सेंटर पार पाडणार आहे. हा देशातील कोणत्याही महानगरपालिकेचा पहिला पीपीपी मॉडेल कॅन्सर सेंटर असल्याचे विशेष नमूद केले जात आहे.

या रुग्णालयात सीजीएचएस दरांनुसार उपचार उपलब्ध असणार असल्याने सामान्य रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. कॅन्सर निदानापासून ते उपचारापर्यंत सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या केंद्रात कॅन्सर पेशींवर अचूक उपचार करणारी अत्याधुनिक लिनियर अ‍ॅक्सेलेरेटर मशीन बसविण्यात आली आहे. ३५ कोटी रुपये किमतीची ही मशीन पुण्यातील केवळ काही मोजक्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. यासोबतच पेट स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी, आधुनिक आॅपरेशन थिएटर आणि जनरल हॉस्पिटल सुविधाही उपलब्ध असतील.

हे सुद्धा वाचा : नीट पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट; सीबीआयने लातुरातून निवृत्त प्राध्यपकाला घेतले ताब्यात

४५ तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सेवेत

डॉ. प्रीतेश मुनोत यांच्या माहितीनुसार, या केंद्रात सुमारे ४० ते ४५ तज्ज्ञ डॉक्टर आणि सुमारे ४०० कर्मचारी २४ तास सेवा देणार आहेत. कॅन्सर रुग्णांना विविध ठिकाणी फिरावे लागू नये म्हणून सर्व तपासण्या आणि उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या प्रकल्पाला पुणे महापालिकेचा आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा मानले जात आहे. विशेषत: पुणे मनपा क्षेत्रातील रुग्णांना उपचारात प्राधान्य दिले जाणार असून, वेळ आणि खर्च दोन्हीमध्ये मोठी बचत होणार आहे. पुण्यातील आरोग्य सुविधांच्या इतिहासात हा प्रकल्प एक मैलाचा दगड ठरणार आहे’’ – श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती, पुणे महापालिका.

Web Title: Cancer center project in baner to be inaugurated by chief minister devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 12:52 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद
1

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद

Pune PMC Mula Mutha Riverfront: मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन; महापालिकेचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव
2

Pune PMC Mula Mutha Riverfront: मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन; महापालिकेचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव

पुण्यात वाहनांची संख्या वाढतीच; महिनाभरातच MH-61 च्या सीरीज फुल्ल
3

पुण्यात वाहनांची संख्या वाढतीच; महिनाभरातच MH-61 च्या सीरीज फुल्ल

वाळू उपशाला लगाम! इंदापूर तालुक्यातील माळवाडीत महसूलची मोठी कारवाई; तीन बोटी उद्ध्वस्त
4

वाळू उपशाला लगाम! इंदापूर तालुक्यातील माळवाडीत महसूलची मोठी कारवाई; तीन बोटी उद्ध्वस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.