Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Election : अमोल बालवडकरांचे तिकीट का कापले? चंद्रकांत पाटील यांनी केला खुलासा

पुणे महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ९ (सुस–बाणेर–पाषाण) सध्या पूर्णपणे हाय व्होल्टेज बनला असून, भाजपच्या उमेदवारी निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 11, 2026 | 12:46 PM
अमोल बालवडकरांचे तिकीट का कापले? चंद्रकांत पाटील यांनी केला खुलासा

अमोल बालवडकरांचे तिकीट का कापले? चंद्रकांत पाटील यांनी केला खुलासा

Follow Us
Follow Us:
  • अमोल बालवडकरांचे तिकीट का कापले?
  • चंद्रकांत पाटील यांनी केला खुलासा
  • व्हिडिओ’चा मुद्दा आणला समोर
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ९ (सुस–बाणेर–पाषाण) सध्या पूर्णपणे हाय व्होल्टेज बनला असून, भाजपच्या उमेदवारी निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचे तिकीट कापून लहू बालवडकर यांना उमेदवारी दिल्याने सुरू झालेला वाद आता गंभीर आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे. अमोल बालवडकर यांनी पक्षाकडून अन्याय झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत अमोल बालवडकर यांचे तिकीट कापण्यामागील कारण स्पष्ट करत थेट ‘व्हायरल व्हिडिओ’चा मुद्दा समोर आणला. अमोल बालवडकर यांचे कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे त्यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आणि स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व आहे. गृह खात्याच्या माध्यमातून त्यांना योग्य आणि संवेदनशील माहिती मिळाली होती. जर अमोल बालवडकर यांना तिकीट दिले असते आणि निवडणुकीदरम्यान हे व्हिडिओ समोर आले असते, तर पक्षाची मोठी प्रतिमा मलिन झाली असती. त्यामुळे वेळेत निर्णय घेऊन तिकीट कापण्यात आले.”

ते पुढे म्हणाले की, पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने तब्बल ४२ माजी नगरसेवकांची तिकीटे कापली असून, प्रत्येक निर्णयामागे ठोस कारणे होती. “आमच्या पक्षात मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याची परंपरा नाही. योग्य माहितीच्या आधारे मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेळेत निर्णय घेतला,” असे स्पष्ट करत त्यांनी अप्रत्यक्षपणे पक्षशिस्तीचा मुद्दाही अधोरेखित केला. Pया प्रकरणाला आणखी धार देत चंद्रकांत पाटील यांनी निलेश घायवळसोबत फोटो किंवा व्हिडिओ असलेल्या इतर व्यक्तींविरोधातही माहिती गोळा करून ती मुख्यमंत्र्यांकडे देणार असल्याचे जाहीर केले. गरज पडल्यास चौकशीची मागणी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले

Web Title: Chandrakant patil has responded to his candidacy in the pune municipal corporation elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 12:46 PM

Topics:  

  • Amol Balwadkar
  • chandrakant patil
  • pune news

संबंधित बातम्या

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी
1

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी

पुण्यात दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा मृत्यू
2

पुण्यात दहीहंडीसाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर कोसळली; 45 वर्षीय महिलेचा मृत्यू

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; धारदार हत्याराने वार केले अन्…
3

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; धारदार हत्याराने वार केले अन्…

पुणेकरांनो, शहर परिसरात येताय? तर थांबा ! वाहतुकीतील ‘हे’ बदल एकदा जाणून घ्या
4

पुणेकरांनो, शहर परिसरात येताय? तर थांबा ! वाहतुकीतील ‘हे’ बदल एकदा जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.