Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Weather: हुडहुडी भरणार! पुणेकरांनो दोन दिवस स्वेटर घालूनच फिरा; तापमान थेट…

Pune Weather: राज्यातही थंडीचा प्रभाव वाढला असून, जळगाव येथे सर्वात कमी ८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सोलापूर येथे राज्यातील सर्वाधिक ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 21, 2026 | 08:33 PM
हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद

हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद

Follow Us
Follow Us:
  • पुणे शहरात थंडीचा जोर वाढला, पारा ११.२ अंशांवर
  • हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद
  • पुढील दोन दिवस थंडी कायम
Pune Weather: गेल्या काही दिवसांपासून शहराच्या किमान तापमानात सातत्याने घट होत असून, शनिवारी (ता. २१) पारा थेट ११.२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. यंदाच्या हंगामातील हे आतापर्यंतचे नीचांकी तापमान ठरले आहे. त्यामुळे पहाटे घराबाहेर पडणाऱ्यांना थंडीचा सामना करावा लागत असून, पुढील दोन दिवसही गारठा कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे.

शहरात गेल्या आठवड्यापासून थंडीचा प्रभाव वाढत आहे. विशेषतः मध्यरात्रीनंतर तापमानात घट होत असल्याने पहाटेच्या वेळी गारवा अधिक जाणवत आहे. सकाळी दहाच्या सुमारासही हवेत थंडावा टिकून राहत असल्याने मॉर्निंग वॉक, व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या पेहरावात स्वेटर, जॅकेट आणि कानटोप्यांची भर पडली आहे. दरम्यान, दिवसभर उन्हाची तीव्रता तुलनेने कमी असल्याने दुपारचे वातावरण मात्र आल्हाददायक राहत आहे.

Pune Weather: माणसं काय झाडं पण गारठली! तापमान ११.३ अंशांवर; पुढील दोन दिवसांत…

शनिवारी शहरात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दिवसभर आकाश निरभ्र आणि वातावरण कोरडे होते. शहराच्या विविध भागांतही तापमानात फरक जाणवत असून, हवेली, पाषाण, एनडीए आणि सिंहगड रस्ता परिसरात थंडीचा प्रभाव अधिक आहे. तर मगरपट्टा आणि चिंचवड परिसरात तुलनेने अधिक तापमानाची नोंद झाली.

रविवारी (ता. २२) किमान तापमानात किंचित वाढ होऊन ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची, तर कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. राज्यातही थंडीचा प्रभाव वाढला असून, जळगाव येथे सर्वात कमी ८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सोलापूर येथे राज्यातील सर्वाधिक ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले.

पुढील चार दिवस राज्यात हवामान कोरडे राहणार असून, सकाळचा गारवा कायम राहील. त्यानंतर किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत किमान आणि कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळी बोचऱ्या वाऱ्यांमुळे गारठ्याची तीव्रता अधिक जाणवत आहे.

Pune Weather: हुडहुडी भरणार! कारण पुण्यात गारठा वाढणार; स्वेटर घालूनच फिरा; पुढील काही दिवसांत…

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुण्यात २१ नोव्हेंबर रोजी किमान तापमान किती नोंदवले गेले?

    Ans: पुण्यात शनिवारी (२१ नोव्हेंबर) किमान तापमान ११.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

  • Que: पुण्यात पुढील दोन दिवस थंडी कायम राहणार का?

    Ans: भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, पुणे शहरात पुढील दोन दिवसही थंडीचा गारठा कायम राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Pune weather cold wave increase in next two days winter season tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 08:33 PM

Topics:  

  • Cold Wave
  • pune news
  • Pune Weather
  • Winter Season

संबंधित बातम्या

FDAची पुण्यात ५०१ औषध आस्थापनांवर कारवाई; विक्रेत्यांवर सर्वाधिक कारवाई, ३६७ परवाने निलंबित
1

FDAची पुण्यात ५०१ औषध आस्थापनांवर कारवाई; विक्रेत्यांवर सर्वाधिक कारवाई, ३६७ परवाने निलंबित

Pune FDA Action : पुण्यातील कॅम्प परिसरात FDAची कारवाई! आठ हॉटेलांचे परवाने तातडीने निलंबित
2

Pune FDA Action : पुण्यातील कॅम्प परिसरात FDAची कारवाई! आठ हॉटेलांचे परवाने तातडीने निलंबित

धक्कादायक ! UPSC क्लासेसच्या तक्रारी मागे घेण्यासाठी 10 लाखांची खंडणी; पुण्यातील विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल
3

धक्कादायक ! UPSC क्लासेसच्या तक्रारी मागे घेण्यासाठी 10 लाखांची खंडणी; पुण्यातील विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल

अतिक्रमण रोखण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करा; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांचे आयुक्तांना पत्र
4

अतिक्रमण रोखण्यात अपयशी ठरणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करा; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांचे आयुक्तांना पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.