Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तहानलेल्या पिंपरी-चिंचवडला अखेर दिलासा! मुख्यमंत्र्यांकडून पवना प्रकल्पाला हिरवा कंदील; तातडीने काम पूर्ण करण्याचे निर्देश

पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणाऱ्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा 'पवना धरण ते निगडी जलशुद्धीकरण केंद्र थेट जलवाहिनी प्रकल्पा'ला अखेर निर्णायक गती मिळाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 03, 2026 | 06:37 PM
तहानलेल्या पिंपरी-चिंचवडला अखेर दिलासा! मुख्यमंत्र्यांकडून पवना प्रकल्पाला हिरवा कंदील; तातडीने काम पूर्ण करण्याचे निर्देश

तहानलेल्या पिंपरी-चिंचवडला अखेर दिलासा! मुख्यमंत्र्यांकडून पवना प्रकल्पाला हिरवा कंदील; तातडीने काम पूर्ण करण्याचे निर्देश

Follow Us
Follow Us:

पिंपरी/विजया गिरमे : पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणाऱ्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘पवना धरण ते निगडी जलशुद्धीकरण केंद्र थेट जलवाहिनी प्रकल्पा’ला अखेर निर्णायक गती मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पातील सर्व प्रशासकीय, तांत्रिक, आर्थिक आणि कायदेशीर अडथळे दूर करून काम तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. विधान भवन, मुंबई येथे झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला.

 

या प्रकल्पावरून मावळात झालेल्या आंदोलनाची पार्श्वभूमी लक्षात घेता, स्थानिक शेतकरी आणि भूमिपुत्रांच्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. यासाठी पुढील आठवड्यात शेतकरी आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक होणार असून, त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत स्पष्ट केले. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी या विषयावर केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शहराची वाढती लोकसंख्या आणि पवना नदीतील प्रदूषणाचे गंभीर संकट पाहता राज्य शासनाने या प्रकल्पाला ‘विशेष प्राधान्य’ देण्याचे निश्चित केले आहे.

महापालिकेची २०० कोटींची बचत, तांत्रिक पडताळणी पूर्ण

सन २००६ मध्ये केंद्र सरकारच्या ‘जेएनएनयूआरएम’ योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या या प्रकल्पाचे काम २००८ मध्ये सुरू झाले होते. मात्र, २०११ मधील दुर्दैवी आंदोलनानंतर हा प्रकल्प पूर्णपणे स्थगित करण्यात आला होता. सप्टेंबर २०२३ मध्ये राज्य सरकारने या प्रकल्पावरील ‘जैसे थे’ आदेश मागे घेतल्याने कामाचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर प्रकल्पाचा सुधारित डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करून ‘आयआयटी मुंबई’कडून त्याची तांत्रिक पडताळणीही पूर्ण करण्यात आली आहे. या सुधारित अहवालानुसार प्रकल्पाची अंदाजित किंमत १,०१५.६४ कोटी रुपये असून, पूर्वी खरेदी केलेल्या जलवाहिन्यांचा पुनर्वापर केला जाणार असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तब्बल २०० कोटी रुपये वाचणार आहेत.

पवना नदीतील प्रदूषण ठरले धोक्याची घंटा!

या उच्चस्तरीय बैठकीत पवना नदीतील पाण्याच्या वाढत्या प्रदूषणाबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. विविध अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये करण्यात आलेल्या पाणी चाचण्यांचे धक्कादायक अहवाल बैठकीत सादर करण्यात आले.

पाण्यात आढळले घातक घटक : पवना नदीच्या पाण्यात ‘PFAS’ (फॉरेव्हर केमिकल्स), थॅलेट्स (Phthalates), औद्योगिक रसायने, कीटकनाशकांचे अंश, औषधांचे अवशेष आणि कॅफिन आढळले आहे.

आरोग्याला गंभीर धोका : या प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांना कर्करोग, हार्मोनल विकार, मूत्रपिंड व यकृताचे आजार, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे तसेच गर्भातील बालकांच्या विकासावर गंभीर परिणाम होण्याचा मोठा धोका वैज्ञानिक अहवालांमधून समोर आला आहे. त्यामुळे थेट धरणातून शुद्ध पाणी आणणे हाच एकमेव पर्याय असल्याचे बैठकीत अधोरेखित झाले.

भविष्यातील लोकसंख्येचा विचार करता प्रकल्प अनिवार्य

पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार आणि लोकसंख्या वेगाने वाढत आहे. सध्या शहराची लोकसंख्या सुमारे ३२ लाख आहे. मात्र, भविष्यकालीन अंदाजानुसार: २०३१ पर्यंत : ५५ लाख, २०४१ पर्यंत: ९५ लाख, २०५१ पर्यंत: १ कोटी ३५ लाख होऊ शकेल.

एवढ्या अथांग लोकसंख्येची पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी पवना थेट जलवाहिनी प्रकल्प तातडीने पूर्ण करणे अपरिहार्य बनले आहे. या पार्श्वभूमीवर, प्रकल्पाचे उर्वरित १५ टक्के भूसंपादन, रेल्वे व एमएसआरडीसीच्या परवानग्या, महावितरणची वीजजोडणी आणि पीएमआरडीए हद्दीतील तांत्रिक बाबी तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.

शेतकऱ्यांशी संवादाची जबाबदारी लांडगे, शेळके यांच्यावर

मावळातील शेतकरी, भूमिपुत्र आणि संबंधित संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या मागण्यांवर न्याय्य तोडगा काढण्यासाठी पुढील आठवड्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत मुंबईत बैठक होईल. या बैठकीच्या समन्वयाची आणि शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची महत्त्वाची जबाबदारी आमदार महेश लांडगे आणि आमदार सुनील शेळके यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : संगमनेर हादरलं! मुरुम वाहतुकीच्या वादातून गोळीबार; भाजप पदाधिकाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न

बैठकीला दिग्गजांची उपस्थिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या हायव्होल्टेज बैठकीस जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार श्रीरंग बारणे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, आमदार शंकर जगताप, आमदार सुनील शेळके, माजी आमदार बाळा भेगडे उपस्थित होते. तसेच पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सभागृह नेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासह पुणे विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि रेल्वे, नगरविकास, महसूल, एमएसआरडीसी, महावितरण व पीएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Chief minister devendra fadnavis has held a meeting regarding the pavana project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 06:37 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पावरून पिंपरी पालिकेत गोंधळ; विरोध डावलून 430 कोटींच्या ऐनवेळच्या विषयाला मंजुरी
1

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पावरून पिंपरी पालिकेत गोंधळ; विरोध डावलून 430 कोटींच्या ऐनवेळच्या विषयाला मंजुरी

महाराष्ट्र पोलिसांचा बिहारमध्ये छापा; टीईटी पेपरफुटी प्रकरणी तिघांना ठोकल्या बेड्या
2

महाराष्ट्र पोलिसांचा बिहारमध्ये छापा; टीईटी पेपरफुटी प्रकरणी तिघांना ठोकल्या बेड्या

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी दुरुस्त करा; खासदार बारणेंची मागणी
3

पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी दुरुस्त करा; खासदार बारणेंची मागणी

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मुख्यालयाचा मार्ग मोकळा; 50 एकर जागा मंजूर; परेड ग्राऊंडसह प्रशासकीय संकुल उभारणार
4

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मुख्यालयाचा मार्ग मोकळा; 50 एकर जागा मंजूर; परेड ग्राऊंडसह प्रशासकीय संकुल उभारणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.