सौजन्य - नवराष्ट्र टीम
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज रोहित पठारेच्या कुटुंबियांची भेट घेतली, यावेळी त्यांच्यासोबत खासदार कल्याण काळे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण डोणगावकर, राजाभाऊ देशमुख यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सपकाळ पुढे म्हणाले की, राज्यातील खराब कायदा व सुव्यवस्थेस गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत. रोहित पठारेची हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आली आहे. पठारेची हत्या बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसारखीच विकृत पद्धतीने केली आहे. मराठवाड्यात व राज्यात अशा पद्धतीने होणाऱ्या हत्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार आहे. गुंडांची हिम्मत कशी होते, अशा विकृत्त पद्धतीने वागण्याची. राज्यात पोलीस नावाची यंत्रणा राहिलेली नाही, गुंडांना पोलिसांचे भय राहिलेले नाही. ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रिदवाक्याप्रमाणे पोलिसांचे वर्तन नसून महाराष्ट्र पोलीस खल प्रवृत्तीचे रक्षण करत आहेत, असेच या घटना पाहता दिसत आहे.
सपकाळ पुढे म्हणाले की, रोहित पठारे हत्याप्रकणातील आरोपी गजाआड झाले असले तरी कुटुंबाने दिलेली माहिती व स्थानिक पोलिसांनी केलेली कारवाई यात कुठेही साधर्म्य आढळून येत नाही, तपास योग्य मार्गाने होत नाही. घटनेवेळी पोलिसांकडे तक्रार करूनही पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही, स्थानिक पोलीसांच्या तपासावर पठारे कुटुंब समाधानी नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची जबाबदारी स्विकारून तत्काळ आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटी गठीत करावी, परिवाराला तपासाबाबत अवगत करावे आणि पठारे कुटुंबाच्या शंकांचे समाधान करावे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
Ans: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सध्याची एसआयटी रद्द करून आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली नवीन एसआयटीमार्फत तपास करण्याची मागणी केली आहे. तसेच तपास पथकात वैजापूरबाहेरील अधिकारी आणि महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची मागणी केली आहे.
Ans: रोहित पठारे यांच्या कुटुंबीयांनी स्थानिक पोलिसांच्या तपासाबाबत असमाधान व्यक्त केले असून, घटनेपूर्वी पोलिसांकडे तक्रार करूनही योग्य कारवाई झाली नसल्याचा आरोप केला आहे.
Ans: राज्यातील खराब कायदा-सुव्यवस्थेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. पोलिसांचे गुन्हेगारांवर नियंत्रण राहिले नसून, दलित आणि मागासवर्गीय समाज सुरक्षित नसल्याचेही त्यांनी म्हटले.






