
भाजपच्या प्रतिनिधींना नागरिकांच्या समस्यांचे काही देणे घेणे नाही
कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
हर्षवर्धन सपकाळ यांची भाजपवर टीका
पुणे: भाजपच्या प्रतिनिधींना नागरिकांच्या समस्यांचे काही देणे घेणे नाही, असा आरोप कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी येथे केला. मुकुंद नगर – सॅलेसबरी पार्क प्रभागातील काँग्रेस -शिवसेना- मनसे आघाडीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत सपकाळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी उमेदवार पुष्कर अबनावे ( अ गट ),डॉ. स्नेहल पाड़ळे (ब गट ), योगिता सुराणा ( क गट ),अक्षय जैन (ड गट ) हे उपस्थित होते. आता गप्प बसायचं नाही… आता लढायचं! असा निर्धार यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी केला. तडजोडीची नाही — लढ्याची, गुलामीची नाही — स्वाभिमानाची, संविधान रक्षणाची असल्याचे मत उपस्थित वक्त्यांनी व्यक्त केले.
सपकाळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले “भाजपच्या लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या समस्यांविषयी काही देणे घेणे नाही. सत्तेचा गैरवापर त्यांच्याकडून सुरू आहे. भाजपची सत्ता जिथे जिथे आहे तेथे हा प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहे. देशाची घटना आणि धर्मनिरपेक्षता सार्वभौमत्व आदी संरक्षक करण्यासाठी नागरिकांनी काँग्रेसला हात द्यावा असे आवाहनही सपकाळ यांनी केले.
सत्ताधाऱ्यांची गुंडगिरी, ‘स्थानिक’च्या निवडणुकीत राज्यात तीन खून; हर्षवर्धन सपकाळांचा आरोप
यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते मुकुंद नगर सॅलेसबरी पार्क मधील नागरी समस्या सुटल्या नाहीत. या प्रभागात सत्ताधारी भाजपचेच नगरसेवक होते परंतु या भागातील कचरा पिण्याचा पाण्याचा प्रश्न तसेच पावसाळ्यातील नाल्याला येणाऱ्या पुराच्या धोक्यापासून वस्ती भागाला संरक्षित करण्यासाठी कोणतीच उपाययोजना केली गेली नाही. या भागातील लोकप्रतिनिधींनी केवळ जुन्या बांधकामाचा पुनर्विकासावरच जास्त भर दिला असा आरोपही काँग्रेसच्या उमेदवारांनी यावेळी केला. या भागातील पाणीपुरवठा संदर्भात पाण्याची टाकी बांधण्यात आली परंतु अद्यापि कार्यान्वित केली गेली नाही तसेच या भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात आलेला उड्डाणपूल देखील चुकीच्या पद्धतीने केला गेला. गंगाधाम चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अद्यापही ठोस आराखडा सत्ताधारी भाजपकडून केला गेला नाही, असा आरोप उमेदवारांनी केला.
हर्षवर्धन सपकाळांचा आरोप
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात गुंडगिरी केली जात आहे. उमेदवारांना धमकावले जात आहे, पैशांचे आमिष दाखवून अर्ज भरु दिला जात नाही किंवा मागे घेण्यास भाग पाडले जात आहे. पोलीस यंत्रणा, प्रशासन व निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बटिक बनले आहे. लोकशाहीत निवडणुका निकोप, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पडल्या पाहिजेत पण त्याला हरताळ फासला आहे. सत्तेचा खेळ नाही तर लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसची लढाई आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.