Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रुपाली चाकणकरांना अटक करा; पुण्यात महिला काँग्रेसचे जोरदार आंदोलन

रुपाली चाकणकरांना अटक करा, या मागणीसाठी पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने शनिवारी फर्ग्युसन कॉलेज रोड येथे आंदोलन करण्यात आले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 21, 2026 | 05:10 PM
रुपाली चाकणकरांना अटक करा; पुण्यात महिला काँग्रेसचे जोरदार आंदोलन

रुपाली चाकणकरांना अटक करा; पुण्यात महिला काँग्रेसचे जोरदार आंदोलन

Follow Us
Follow Us:

पुणे : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याला अटक केल्यानंतर रुपाली चाकणकर यांचे खरात सोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात याच्यासोबतचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये रुपाली चाकणकर या अशोक खरात याचे पाद्यपूजन करताना बघायला मिळत आहे. तसेच काही व्हिडीओमध्ये रुपाली चाकणकर खरातचे कौतुक करताना दिसत आहेत. चाकणकर यांनी महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता चाकणकरांविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. रुपाली चाकणकरांना अटक करा, अशा मागणीसाठी पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने शनिवारी फर्ग्युसन कॉलेज रोड येथे आंदोलन करण्यात आले.

 

पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. रूपाली चाकणकर यांनी महिलांच्या चारित्र्याशीच खेळ केला, हा गुन्हा अक्षम्य आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा भंग आणि  महिलांचे शोषण केलेल्या खरात या भोंदू बाबाला संरक्षण दिल्याबद्दल रुपाली चाकणकरांना अटक झालीच पाहिजे. राज्यातील ‘एपस्टीन’ खरात याची ३० दिवसांत चौकशी करा. तसेच त्या बाबाच्या अनेक गैरकृत्यात सहभागी असलेल्या मंत्र्यांची त्वरीत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी स्वाती शिंदे यांनी केली आहे.

‘मंत्र्यांनो खुर्च्या खाली करा’, ‘भोंदूबाबा खरातला कडक शासन करा’, अशा घोषणांचे फलक आंदोलकांनी हाती घेतले होते. भोंदूबाबा खरात आणि रुपाली चाकणकर यांच्या प्रतिमांना जोडे मारण्यात आले. या आंदोलनात अर्चना शाह, अनिता मकवाना, प्राजक्ता जाधव, रेखा जैन, अंजली सोलापूरे, राजश्री दामले-चव्हाण, रुपाली पवार, मनोरमा चौधरी, कल्पना शिंदे, ज्योती अडागळे, अंजली देसाई, सुवर्णा माने, सुरेखा मारणे आदी सहभागी झाले हाेते.

हे सुद्धा वाचा : गॅस दरवाढ, तुटवड्याविरोधात महिला आक्रमक! शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शहराध्यक्ष शिंंदेंकडून चाकणकरांची पाठराखण?

रुपाली चाकणकर यांच्यावर टिका हाेत असतानाच, काॅंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी चाकणकर यांची बदनामी करू नका, वेळ पडली तर त्यांना काॅंग्रेस पक्षात घेण्यासाठी शिफारस करू असे वक्तव्य केल्याची चर्चा आहे. शिंदे यांच्या वक्तव्यावर काॅंग्रेसच्या प्रवक्त्यांनी ते शिंदे यांचे वैयक्तिक मत असल्याची प्रतिक्रीया दिली आहे.

Web Title: Congress party has staged a strong protest against rupali chakankar in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • Congress
  • pune news
  • rupali chakankar

संबंधित बातम्या

Ketan Agrawal Murder Case : सिया गोयलच्या भावाचीही पोलिसांकडून चौकशी; आत्तापर्यंत 8 जणांचे नोंदवले जबाब
1

Ketan Agrawal Murder Case : सिया गोयलच्या भावाचीही पोलिसांकडून चौकशी; आत्तापर्यंत 8 जणांचे नोंदवले जबाब

‘मी काँग्रेसचा…’, शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांनी सोडले मौन, म्हणाले- ‘बदनामीचे राजकारण थांबवा’
2

‘मी काँग्रेसचा…’, शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांनी सोडले मौन, म्हणाले- ‘बदनामीचे राजकारण थांबवा’

अभिमन्यू पवार अन् मेधा कुलकर्णी यांच्यात खुर्चीवरून वाद, खासदार कार्यक्रमातून निघून गेल्या; नेमकं काय घडलं?
3

अभिमन्यू पवार अन् मेधा कुलकर्णी यांच्यात खुर्चीवरून वाद, खासदार कार्यक्रमातून निघून गेल्या; नेमकं काय घडलं?

पालखी सोहळ्यासाठी शासनाची जोरदार तयारी; मागील वर्षीपेक्षा जास्त चांगल्या सुविधा मिळणार
4

पालखी सोहळ्यासाठी शासनाची जोरदार तयारी; मागील वर्षीपेक्षा जास्त चांगल्या सुविधा मिळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.