Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालखी सोहळ्यासाठी शासनाची जोरदार तयारी; मागील वर्षीपेक्षा जास्त चांगल्या सुविधा मिळणार

पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या जागेचे भूसंपादन सुरु असून शेतकऱ्यांच्या विविध अडीअडचणी, हरकती सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी डुडी सासवडला आले होते. यावेळी त्याच्याशी चर्चा केली असता खते बियाणांचा कोणत्याही प्रकारे तुटवडा येणार नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 26, 2026 | 03:03 PM
पालखी सोहळ्यासाठी नीरा सज्ज; वाहतूक, पार्किंग व सुरक्षा नियोजनावर जेजुरी पोलिसांचा भर

पालखी सोहळ्यासाठी नीरा सज्ज; वाहतूक, पार्किंग व सुरक्षा नियोजनावर जेजुरी पोलिसांचा भर

Follow Us
Follow Us:

सासवड : आगामी दोन आठवड्यात संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी यात्रेसाठी जात असून, याबाबत शासनाची संपूर्ण तयारी झाल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. यापूर्वी चार ते पाच आढावा बैठका झाल्या असून, प्रत्येक आठवड्याला आढावा घेण्यात येत आहे.

वारकरी आणि भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वीज, पाणी, रस्ते, औषधे, आरोग्यसेवा तसेच वारकऱ्यांची सुरक्षा याबाबतीत शासन अत्यंत गंभीर आहे. प्रत्येक वेळी नवनवीन उपक्रम राबवीत असून मागील वर्षीपेक्षा आणखी चांगली सुविधा देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.

संत सोपानदेव पालखी सोहळ्याला वेग; पालखीचे 12 जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान

पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या जागेचे भूसंपादन सुरु असून शेतकऱ्यांच्या विविध अडीअडचणी, हरकती सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी डुडी सासवडला आले होते. यावेळी त्याच्याशी चर्चा केली असता खते बियाणांचा कोणत्याही प्रकारे तुटवडा येणार नाही, यासाठी शासनाची सर्व तयारी असल्याचे सांगितले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत, भूसंपादन अधिकारी कल्याण पांढरे, प्रांताधिकारी वर्षा लांडगे, संगीता चौघुले, तहसीलदार विक्रम राजपूत, संदीप पाटील, तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, भूमी अभिलेख अधिकारी स्मिता गौड तसेच विविध विभागाचे प्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित होते.

पुरंदर तालुक्यातील बेलसर, कोडीत, राजेवाडी आदी परिसरातील शासनाच्या गायरान जमिनीवर सौर उर्जा प्रकल्प होत असून, स्थानिक नागरिकांचा याला प्रखर विरोध होत आहे. शासन प्रकल्प बाबतीत जबरदस्ती करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप होत आहे. याबाबत प्रश्न उपस्थित केला असता पुणे जिल्ह्यातील शासकीय जागेत शासन सौरऊर्जा प्रकल्प करणार असल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.

सध्या विजेचे दिवसेंदिवस भाव वाढत असून, शेतकऱ्यांना वीज परवडेनासी झाली आहे. आणि सौरऊर्जा प्रकल्पातून मिळणारी वीज अत्यंत कमी पैशात मिळणार असल्याने शेतकऱ्यांची मोठी बचत होणार आहे. यासाठी केंद्र सरकार अनुदान देत असून महाराष्ट्रातील सौरऊर्जा प्रकल्प देशासाठी पथदर्शी ठरणार आहे. बारामती, मोरगाव परिसरात सौरऊर्जा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यासाठी सकारात्मक प्रतिसाद देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे.

Web Title: Government making extensive preparations for the palkhi procession

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Jitendra Dudi
  • pune news
  • Sant Sopandev Palkhi Procession

संबंधित बातम्या

अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट
1

अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पृथ्वीराज सावंत यांची सोशल मीडियावर पोस्ट

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?
2

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?

MPSC Protest Pune: पुण्यात MPSC आंदोलनाला नवीन वळण;  ३ विद्यार्थ्यांचे उपोषण मागे
3

MPSC Protest Pune: पुण्यात MPSC आंदोलनाला नवीन वळण; ३ विद्यार्थ्यांचे उपोषण मागे

Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला! ‘नाना गरिबांची कायम…’; फार्महाऊसवरील जाधव झाले भावूक
4

Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला! ‘नाना गरिबांची कायम…’; फार्महाऊसवरील जाधव झाले भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.