Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमोल बालवडकरांचा भाजपच्या तिरंगा रॅलीला जोरदार विरोध;15-20 हजार गाड्यामुळे वाहतूक कोंडीची भीती

भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे शहरात आयोजित करण्यात आलेल्या दुचाकी तिरंगा रॅलीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 10, 2026 | 02:02 PM
अमोल बालवडकरांचा भाजपच्या तिरंगा रॅलीला जोरदार विरोध;15-20 हजार गाड्यामुळे वाहतूक कोंडीची भीती

अमोल बालवडकरांचा भाजपच्या तिरंगा रॅलीला जोरदार विरोध;15-20 हजार गाड्यामुळे वाहतूक कोंडीची भीती

Follow Us
Follow Us:

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे शहरात आयोजित करण्यात आलेल्या दुचाकी तिरंगा रॅलीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. “पुण्यात आधीच वाहतूक कोंडीची बिकट समस्या असताना १५ ते २० हजार दुचाकी रस्त्यावर आणून कसली राष्ट्रभक्ती दाखवत आहात?” असा थेट सवाल करत अमोल बालवडकर यांनी भाजपच्या या रॅलीला जिरोदार दर्शवला आहे. अमोल बालवडकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

 

“जगातील सर्वांत जास्त ट्रॅफिक असलेल्या शहरांच्या यादीत पुणे शहर ५ व्या क्रमांकावर आले आहे. अशा परिस्थितीत शहरातील प्रत्येक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना ५० ते १०० दुचाकी आणण्यांचे टार्गेट देऊन हजारो गाड्या रस्त्यावर उतरवणे म्हणजे पुणेकरांचा बळी देण्यासारखे आहे.” “एकाच वेळी १५-२० हजार दुचाकी रस्त्यावर आल्यास शहरात मोठ्या प्रमाणात ध्वनी व वायू प्रदूषण होईल, तसेच इंधनाचा अपव्यय होईल. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी स्वतः इंधन बचतीचे आवाहन केले असताना भाजपचे स्थानिक नेते मात्र हजारो गाड्यांचा ताफा रस्त्यावर उतरवून प्रदूषण वाढवत आहेत. या रॅलीमुळे रुग्णवाहिका, रुग्ण, महिला आणि नोकरदार वर्ग वाहतूक कोंडीत अडकून पडेल.”

रॅलीऐवजी झाडे लावा, खड्डे बुजवा” केवळ वरिष्ठ नेत्यांना आणि वरिष्ठांच्या नजरेत आपली शक्ती दाखवण्यासाठी सामान्य पुणेकरांना वेठीस धरू नका, असा सल्ला देत बालवडकर यांनी भाजपला पर्यायी उपक्रमांची सूचना केली. “जर खरच राष्ट्रभक्ती आणि समाजसेवा करायची असेल, तर दुचाकी रॅलीऐवजी शहरात वृक्षारोपण करा, खड्डे बुजवा, रक्तदान शिबिरे किंवा स्वच्छता अभियान राबवा,” असे बालवडकर म्हणाले.

“नियोजनशून्य उपक्रम आणि रॅलीचा हट्ट बदलला नाही, तर आगामी काळात पुणेकर नागरिक स्वतःच्या पद्धतीने भाजपला या वाहतूक कोंडीचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत.” – अमोल बालवडकर नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवड पोलीस दलात मोठे फेरबदल, 12 नव्या निरीक्षकांची एन्ट्री; सहा निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत पुणे शहरात मंगळवारी (11 ऑगस्ट)  तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. अमोल बालवडकर यांनी या रॅलीला विरोध केल्यामुळे पुण्यातील राजकारण तापलं आहे.

Web Title: Corporator amol balwadkar has opposed the bjps tiranga rally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • Amol Balwadkar
  • BJP
  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.