संग्रहित फोटो
पोलिस निरीक्षक प्रशांत आरदवाड (दहशतवाद विरोधी पथक, मुंबई), हेमंत कदम (धाराशिव), रवींद्र कदम (पुणे शहर), सिद्धराम म्हेत्रे (गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), विजयकुमर शिंदे (गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), देवेंद्र चव्हाण (पोलिस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा), सुरेखा घार्गे (मुंबई शहर), चंद्रकांत जाधव (नांदेड), राजेंद्र निकाळजे (ठाणे शहर), गोताराम शेवाळे (ठाणे शहर), सोमनाथ जाधव (छत्रपती संभाजीनगर शहर), अमोल गवळी (पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर) यांची पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. रवींद्र कदम यांची यापूर्वी पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर येथे बदली आदेशाधीन होती. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातून निरीक्षक प्रदीप रायण्णावर यांची रायगड येथे, तर शत्रुघ्न माळी यांची नवी मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.
…यांची झाली अंतर्गत बदली
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सहा पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. संतोष पाटील यांची तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातून गुन्हे शाखेत, अर्जुन घोडे पाटील यांची निगडी पोलिस ठाण्यातून गुन्हे शाखेत, विजयानंद पाटील यांची पिंपरी पोलिस ठाण्यातून तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात, नरेंद्र ठाकरे यांची नियंत्रण कक्षातून गुन्हे शाखेत, प्रदीप पाटील यांची नियंत्रण कक्षातून वाहतूक शाखेत, तर तेजस्विनी कदम यांची गुन्हे शाखेतून वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा : बारवर गुन्हे शाखेची छापा कारवाई; आठ जणांवर गुन्हा दाखल; तब्बल 89 ग्राहक आढळले






