पुणे महमेट्रो वाहतूक आराखडा (फोटो- istockphoto/टीम नवराष्ट्र)
यावेळी हर्डीकर यांनी सादरीकरणाद्वारे बैठकीत हिंजवडी ते जिल्हा न्यायालय, पिंपरी चिंचवड ते निगडी व स्वारगेट ते कात्रज या मार्गावर नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या मेट्रो लाईन, बीआरटी व रेल्वे लाईन, मांगडेवाडी, कदम वस्ती, लोणीकंद व मोशी या ठिकाणी नवीन बस टर्मीनल, कोथरुड, कात्रज, हडपसर, मार्केटयार्ड व पिंपरी बस डेपोचा पुनर्विकास, पूलगेट, चिंचवड, भोसरी, निगडी, मुखई चौक, चिखली, वाघोली, रांजणगाव, तळेगाव व चाकण येथील जुन्या बस टर्मीनलचा पुनर्विकास, रिंग रोड, मिसींग लिंक, रेल्वे जंक्शनचा विकास, सायकल ट्रॅक, फूटपाथमध्ये सुधारणा, ट्रक टर्मीनल व लॉजिस्टिक हब, पार्कींग व्यवस्था, रस्ता रुंदीकरण, बसेसची उपलब्धता, रेल्वे ओव्हर ब्रीज, पीएमपीएमएलच्या नवीन मार्गावर बस सुरु करणे याविषयी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दर पाच वर्षांनी वाहतूक आराखडा अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यानुसार आराखडा तयार करण्यात आला असल्याचे हर्डीकर यांनी सांगितले.
काेणी काय सुचना केली ?
– खासदार सुळे : वाहतूक विकास आराखडा तयार करताना पुरंदर येथील विमानतळाच्या जागेचा विचार करावा.
– विजय शिवतारे : सासवड येथे बसडेपो सुरु करावा, पुणे ते नीरा लोकलची सेवा सुरु करावी.
– चेतन तुपे : खडकवासला ते फुरसुंगीपर्यंत प्रस्तावित कालवा बोगद्यास मंजुरी मिळाली आहे. या कालव्याच्या जागेचा वापर रस्ता आणि समांतर लोकल रेल्वे किंवा मेट्रोसाठी करावा.
हेही वाचा: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, आजपासून मेट्रो रात्री अकरा वाजेपर्यंत धावणार
मेट्रो रात्री अकरा वाजेपर्यंत धावणार
मेट्राेच्या पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि रामवाडी ते वनाज या दोन्ही मार्गिका पूर्णपणे सुरू झाल्या. यावर लोकांचा वाढता वापर आणि प्रवाशांच्या आग्रहास्तव प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत पुणे मेट्रोने आपल्या प्रवासी सेवेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या दोन्ही मर्गिकांवरील पुणे मेट्रोची प्रवासी सेवा सकाळी ६ ते रात्री १० अशी आहे. तर आता दिनांक २६ जानेवारीपासून या सेवेमध्ये एक तासाची वाढ करून ही प्रवासी सेवा रात्री ११ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे मेट्रोची वारंवारता गर्दीच्या वेळी (सकाळी ८ते ११ आणि संध्या. ४ ते ८) दर ७ मिनिटांनी व कमी गर्दीच्या वेळी (सकाळी ६ ते संध्याकाळी ८, सकाळी. ११ ते दुपारी ४ आणि रात्री ८ ते रा.१०) दर १० मिनिटांनी आहे. आता रात्री १० ते ११ या वाढलेल्या वेळेमध्ये मेट्रोची वारंवारता दर १५ मिनिटांनी असणार आहे.