Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: अधिछात्रवृत्ती वाटपात महाज्योतीकडून दिरंगाई: विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ

Scholarship News: बार्टी आणि सारथी संस्थांना निधी उपलब्ध करून देण्यात आला असताना महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मात्र आजही अधिछात्रवृत्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 17, 2025 | 02:35 AM
Pune News: अधिछात्रवृत्ती वाटपात महाज्योतीकडून दिरंगाई: विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ
Follow Us
Close
Follow Us:

पुणे/सोनाजी गाढवे: राज्यातील ओबीसी, भटके विमुक्त विद्यार्थ्यांना महाज्योती संस्थेकडून मिळणाऱ्या अधिछात्रवृत्तीच्या वितरणात दिरंगाई होत आहे. संशोधनार्थी विद्यार्थ्यांना मोठ्या आर्थिक आणि मानसिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाने नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती मंजूर केली असली तरी संस्थेने निधीअभावी २५ जुलै २०२४ पासूनच ती देण्याचा निर्णय घेतला होता.

बार्टी आणि सारथी संस्थांना निधी उपलब्ध करून देण्यात आला असताना महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मात्र आजही अधिछात्रवृत्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे. संशोधनासाठी सहा महिन्यांनी मिळणारी ही रक्कम विद्यार्थ्यांचा मुख्य आधार असून, तिच्या विलंबामुळे त्यांचे संशोधनकार्य अडचणीत आले आहे.

विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार, कागदपत्रे वेळेवर जमा करूनही स्टायपेंडशीट तयार होत नाही, उपयोगिता प्रमाणपत्रात सतत त्रुटी काढल्या जातात, कार्यालयाशी संपर्क साधला तरी फोन घेतला जात नाही, तर कर्मचारी उद्धट भाषेत उडवा-उडवीची उत्तरे देतात. यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अलीकडेच आमदार अभिजित वंजारी यांच्या उपस्थितीत महाज्योती व्यवस्थापन व विद्यार्थी शिष्टमंडळाची बैठक घेण्यात आली होती. व्यवस्थापकांनी तातडीने कारवाईचे आश्वासन दिले असले तरी, अद्यापही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही.

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये TET धारक कंत्राटी शिक्षक भरती होते चं का..? वाचा सविस्तर…

जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत मिळणारी अधिछात्रवृत्ती आजपर्यंत केवळ २१२ विद्यार्थ्यांना मिळाली असून उर्वरित ६८८ विद्यार्थ्यांची रक्कम थांबवण्यात आली आहे. महाज्योतीच्या धोरणांमुळे संशोधनासाठी नोकरी किंवा व्यवसाय करता न येणाऱ्या विद्यार्थ्यांचे वास्तव्य, दैनंदिन खर्च आणि संशोधनकार्य गंभीर संकटात आले आहे.

कागदपत्रे जमा करून एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटला तरी अध्याप माझ्यासारखे अनेक विदयार्थी स्टायफंडशिट दिसण्याची प्रतीक्षा करत आहेत. अधिछात्रवृत्ती खात्यात जमा होण्यापेक्षा कर्मचाऱ्यांची उद्धट भाषा विद्यार्थ्यांच्या कानावर पडत आहे हे दुर्दैवी आहे.
-अतुल मरेवाड संशोधक विदयार्थी

Pune News: चितेची राख पाण्यात न सोडता शेतातल्या झाडांना! लोहोट परिवार राखतोय पर्यावरणाचा समतोल

महाज्योती संस्थेमध्ये गेल्या एक महिन्यापासून डॉक्युमेंट्स पाठवलेले आहे. सर्व डॉक्युमेंट्स ची पूर्तता करून पाठवले असता कारणाने त्यांनी आर एस सी रिपोर्टमध्ये जोडलेला नाही. म्हणून चूक काढलेले आहे वेळोवेळी सर्व डॉक्युमेंट्स त्यांना पुरवलेल्या असतात परंतु त्यांची बोलण्याची भाषा आणि कॉल केला की उचलत नाही. उचलला तर बोलण्याची भाषा पण वेगवेगळ्या पद्धतीने असते. या कारणामुळे महाज्योती संस्थेतील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना मानसिक त्रास त्याला सामोरे जावे लागत आहे. तरी कृपया शासनाने या मध्ये लक्ष घालून लवकरात लवकर आमची नोंदणी दिनांक पासून फेलोशिप अदा करावी आणि महाज्योती संस्थेतील कर्मचाऱ्यांचे बाबतीत योग्य ती कार्यवाही करून आम्हाला न्याय द्यावा ही नम्र विनंती.

-अक्षय अनाप संशोधक विद्यार्थी

Web Title: Delay by mahajyoti in allotment of additional scholarship students face many problems pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Pune
  • Student

संबंधित बातम्या

पुणे ग्रॅंड टूरमध्ये आजोबांचा जलवा! वय ७० पार पण जिद्द मात्र २० वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशी, VIDEO VIRAL
1

पुणे ग्रॅंड टूरमध्ये आजोबांचा जलवा! वय ७० पार पण जिद्द मात्र २० वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशी, VIDEO VIRAL

Pune Crime: रस्त्यात अडवलं, शिवीगाळ करत सपासप वार; कोथरुडमध्ये 10 वीत शिकणाऱ्या मुलावर कोयत्याने हल्ला
2

Pune Crime: रस्त्यात अडवलं, शिवीगाळ करत सपासप वार; कोथरुडमध्ये 10 वीत शिकणाऱ्या मुलावर कोयत्याने हल्ला

Pune Grand Tour 2026: प्रदूषणमुक्तीसाठी पुण्याचे मोठे पाऊल; ‘प्रोलॉग’ रेसने सायकलिंग स्पर्धेचा दिमाखदार प्रारंभ
3

Pune Grand Tour 2026: प्रदूषणमुक्तीसाठी पुण्याचे मोठे पाऊल; ‘प्रोलॉग’ रेसने सायकलिंग स्पर्धेचा दिमाखदार प्रारंभ

पुणे ग्रँड चॅलेंज टूरनिमित्त १९ जानेवारीला पुण्यातील प्रमुख भागांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
4

पुणे ग्रँड चॅलेंज टूरनिमित्त १९ जानेवारीला पुण्यातील प्रमुख भागांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.