शिक्षक(फोटो-ISTOCK)
पुणे/सोनाजी गाढावे : राज्यात कंत्राटी शिक्षकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच ८ हजार ९६९, तर राज्यात एकूण ७५ हजार ४७० कंत्राटी शिक्षक आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी या कंत्राटी शिक्षकांच्या संख्येत ७.०२ टक्क्याने वाढ झाली आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने जाहीर केलेल्या ऑगस्टच्या अहवालामधून ही बाब समोर आली आहे.
परिषदेच्या अहवालानुसार, सर्वाधिक कंत्राटी शिक्षक असलेल्या पुण्यानंतर ठाण्यात ६ हजार ९१२, नाशिकमध्ये ४ हजार ५६८, नागपूरमध्ये ४ हजार ५३३ आणि छ. संभाजीनगरमध्ये ३ हजार ३८१ शिक्षक कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत. विशेष म्हणजे कंत्राटी शिक्षकांमध्ये अर्धवेळ (पार्टटाइम) आणि कंत्राटी असे दोन प्रकार आहेत. शाळांमध्ये पूर्णवेळ शिक्षकांची नियुक्ती न झाल्याने शैक्षणिक दर्जा घसरत असून, यात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, असे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : Pune News: मोठी बातमी! ‘PMP’ चालकांनो सावधान; ‘हे’ कृत्य केल्यास होणार थेट निलंबनाची कारवाई
एकाबाजुला कंत्राटी भरती करायांची आणि दुसऱ्या बाजुला कायम शिक्षकांना सुप्रियम कोर्ट च्या निर्णयानुसार उतरत्या वयात द्यावा लागणार टिईटी राज्यात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या शिक्षकांना नेमणूक करून काय साध्य करणार सरकार मात्र यांना टिईटी बंधनकारक नाही, मात्र राज्यात कायमस्वरूपी सेवा बाजवात असणारे शिक्षकांना मात्र टिईटी आहे.
यामुळे शिक्षकांमध्ये दुसरीकडे संभ्रम असून वयाची पन्नाशी पार केलेल्या शिक्षकांना आता त्यांच्या नातवंडासोबत ‘टीईटी’ ची परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यासाठी अवघ्या दोन संधी देण्यात आल्या आहेत. राज्यात प्राथमिक शाळांची संख्या ६५ हजार ८० तर उच्च प्राथमिक शाळांची संख्या २२ हजार ३६० इतकी आहे. या शाळांवर सुमारे पावणेपाच लाख शिक्षक असून त्यातील २०१३ पूर्वीच्या सर्व शिक्षकांना (ज्यांचे वय ५३ वर्षांपर्यंत आहे असे) देखील ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. परंतु, फेब्रुवारी २०१३ पूर्वीच्या शिक्षक सेवेत येताना त्यांना ही अट व शर्त लागू नव्हती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर महाराष्ट्र शासन आपले म्हणणे सरकार करेल असे वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले.
सातारा, नांदेड, कोल्हापूर, जळगाव, अकोला, बुलढाणा, वर्धा, सांगली, मुंबई महापालिका, जालना, सोलापूर, वाशिम, लातूर आणि परभणी, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये कंत्राटी शिक्षकांची संख्या एक ते दोन हजारांदरम्यान आहे. तर १,००० पेक्षा कमी कंत्राटी शिक्षक असलेल्या जिल्ह्यांमध्ये धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, नंदुरबार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे आहेत.
राज्यात कंत्राटी शिक्षक भरती अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांच्या गरजेनुसार भरती होत असताना एनसीआरटी च्या नियमावलीनुसार राज्यातील सर्व माध्यमाच्या शाळेमध्ये पहिली ते आठवी शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना टीईटी किंवा सीटीईटी लागू आहे तरी सुद्धा अनेक खासगी संस्था मध्ये आपल्या जवळच्या लोकांना कंत्राटी पद्धतीने शिक्षक म्हणून नेमणूक देऊन मानधन देत आहेत. त्यामुळे येत्या काळात १ ली ते ८ वी सर्व शिक्षकांना टीईटी लागू करावी अशी ही मागणी जोरदार धरत आहे.
हेही वाचा : MPSC परीक्षेत यश मिळवणाऱ्या अश्विनी केदारी यांचे निधन, शरीराचा ८०% भाग एका वेदनादायक अपघातात भाजला
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षकांचे पदे रिक्त असताना येत्या संचमान्यते मध्ये जागा वाढण्याची शक्यता असताना सुद्धा अनेक जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची नेमणूक करून शासन काय साध्य करणार आहे.आज राज्यात हजारो रिक्त पदे आहेत. आता टेट परीक्षा वेळेवर घेतली जात आहे परंतु निकाल लागून सुद्धा त्यांची निवड कायमस्वरूपी होताना दिसत नाही. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची नेमणूक केली जाते. यामुळे भावी शिक्षकांना न्याय मिळत नाही.शासनाने याचे गांभीर्याने विचार करून कंत्राटी पद्धत शिक्षक नेमणूक रद्द करून कायमस्वरूपी नोकरी उपलब्ध करून द्यावी त्यामुळे भावी शिक्षकांना न्याय मिळेल तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.
प्रशांत शिरगुर(राज्य उपाध्यक्ष स्पर्धा परीक्षा तथा पवित्र पोर्टल शिक्षक भरती संघटना)