Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: ऐन जानेवारीतच पुण्यनगरीत टॅंकरची मागणी वाढली; टॅंकर व्यावसाियकांवर पालिकेचा ‘वाॅच’ राहणार का?

महापालिकेने जानेवारीमध्ये ३५ हजार ५२७ टँकर पाणी मोफत, तर ४ हजार १६५ टँकर पाणी चलनाद्वारे पुरविले आहे.  महापालिकेकडे १२८२ रुपयांचे चलन जी व्यक्ती किंवा सोसायटी भरते त्यांना महापालिकेच्या टँकरमधून पाणी पुरविले जाते.  

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 20, 2025 | 09:43 PM
Pune News: ऐन जानेवारीतच पुण्यनगरीत टॅंकरची मागणी वाढली; टॅंकर व्यावसाियकांवर पालिकेचा ‘वाॅच’ राहणार का?

Pune News: ऐन जानेवारीतच पुण्यनगरीत टॅंकरची मागणी वाढली; टॅंकर व्यावसाियकांवर पालिकेचा ‘वाॅच’ राहणार का?

Follow Us
Follow Us:

पुणे: जानेवारी महिन्यातच पाण्याच्या टॅंकरची मागणी वाढल्याचे आकडेवारीतून समाेर आले आहे.  गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारी महिन्यातच टॅंकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. खासगी टॅंकर व्यावसाियकांवर महापािलकेचे काेणतेही नियंत्रण नाही, परंतु महापालिकेच्या ठेकेदारी पद्धतीवरील टॅंकरवर तरी कर्मचाऱ्यांचा ‘वाॅच’ राहणार का ? याचे उत्तर पुढील काळात मिळेल.

महापालिकेच्या टँकर पॉइंटवरून जानेवारी महिन्यात ३९ हजार ६९२ टँकर पुरविण्यात आले आहे. गतवर्षी जानेवारी महिन्यात पुरविलेल्या टँकरच्या तुलनेत ही संख्या ७ हजार ११२ने जास्त आहे. ज्या भागात महापािलकेच्या पाणी पुरवठा विभागाची यंत्रणा कार्यरत नाही, यंत्रणा असुनही अपुरा पाणी पुरवठा हाेताे अशा भागात  महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यासाठी महापालिकेने पर्वती, वडगावशेरी, धायरी, रामटेकडी, चतुश्रृंगी, पद्मावती, पटवर्धन बाग अशा विविध सात ठिकाणी टँकर पॉइंटची व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या मालकीचे व ठेकेदारांचे टँकर यासाठी कार्यरत आहेत. एका ठेकेदाराकडे कमीत कमी आठ टँकर असावेत, असे बंधन टाकण्यात आले आहे.

यंदा जानेवारी महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने शहराच्या उपनगरांसह समाविष्ट गावांमधून पाण्याच्या टँकरची मागणी वाढलेली आहे. मागील वर्षी जानेवारी महिन्यात महापालिकेने ३२ हजार ५८० टँकर पाणीपुरवठा केला होता. यंदा याच महिन्यात ३९ हजार ६९२ टँकर पुरविले आहेत. फेब्रुवारी महिन्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. मात्र, महापालिका प्रशासनाकडे अद्याप गेल्या पंधरा दिवसांतील टँकरची आकडेवारी उपलब्ध नाही. फेब्रुवारी महिना संपल्यानंतर आकडेवारी संकलित केली जाते, अशी अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

हेही वाचा: Pune News: पुण्याला हक्काचे पाणी कधी मिळणार? महापालिकेची मागणी जलसंपदा विभाग ऐकणार? वाचा सविस्तर

दरम्यान, महापालिकेच्या टॅंकर ठेकेदारांकडुन केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात पारदर्शकता ठेवण्यासाठी जीपीएस यंत्रणा प्रत्येक टॅंकरवर बसविणे बंधनकारक आहे. या जीपीएस यंत्रणेची सुत्रे आता भरणा केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडे साेपविण्यात आली आहे .  त्यांना दैंनदिन अहवाल सादर करावा लागणार आहे. यामुळे बाेगस फेऱ्या दाखवून बिले लाटण्याचा प्रकार कमी हाेईल असा दावा केला जात आहे.

खासगी टॅंकर व्यावसाियकांवर नियंत्रण नाही

महापालिकेने जानेवारीमध्ये ३५ हजार ५२७ टँकर पाणी मोफत, तर ४ हजार १६५ टँकर पाणी चलनाद्वारे पुरविले आहे.  महापालिकेकडे १२८२ रुपयांचे चलन जी व्यक्ती किंवा सोसायटी भरते त्यांना महापालिकेच्या टँकरमधून पाणी पुरविले जाते.  खासगी टँकरधारकांना महापालिकेकडून एका टँकरसाठी ६६६ रुपयांचा पास दिला जातो. ते पाणी त्या टँकरचालकाने किंवा मालकाने किती रुपयांना विकावे, यासंबंधी कसलेही बंधन नाही.

हेही वाचा: Pune Water News: पुण्यात ‘पाणी’ पेटणार! ७१४ काेटी रुपये न भरल्यास…; महानगरपालिकेला नोटीस

गेल्या तीन वर्षातील जानेवारी महिन्याची आकडेवारी

वर्ष – टँकर संख्या
२०२२-२३ – २८,५८०
२०२३-२४ – ३२,५८०
२०२४-२५ – ३९,६९२

Web Title: Demand for tankers increased in pune in january 2025 pune corporation marathi water problem news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 09:43 PM

Topics:  

  • Pune
  • pune news
  • Water problem

संबंधित बातम्या

सुनील पांडे यांची संकल्पना; विसर्जन घाटावरील गणेशोत्सव सांस्कृतिक चित्राचे मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन
1

सुनील पांडे यांची संकल्पना; विसर्जन घाटावरील गणेशोत्सव सांस्कृतिक चित्राचे मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन

२१ हजार पाणीपुरींपासून साकारला १३ फूटी गणपती बाप्पा; पुण्यातील गणेश भेळचा अनोखा उपक्रम
2

२१ हजार पाणीपुरींपासून साकारला १३ फूटी गणपती बाप्पा; पुण्यातील गणेश भेळचा अनोखा उपक्रम

‘विद्येच्या माहेरघरा’ची नवी ओळख, पुणे बनतेय अभियंत्यांचे शहर; शिक्षणनगरीपासून तंत्रज्ञाननगरीपर्यंतचा प्रवास
3

‘विद्येच्या माहेरघरा’ची नवी ओळख, पुणे बनतेय अभियंत्यांचे शहर; शिक्षणनगरीपासून तंत्रज्ञाननगरीपर्यंतचा प्रवास

तुकोबांची वेशभूषा अन् बाप्पाचं स्वागत; नगरसेवक सुनील पांडे यांच्या घरी गणरायाचे आगमन
4

तुकोबांची वेशभूषा अन् बाप्पाचं स्वागत; नगरसेवक सुनील पांडे यांच्या घरी गणरायाचे आगमन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.