Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली बारामतीतील विकासकामांची केली पाहणी; अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ निर्देश

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती तालुक्यातील श्री क्षेत्र मयुरेश्वर गणपती मंदिर परिसर तसेच मेडद येथील स्व. अजितदादा पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाची पाहणी केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 09, 2026 | 01:20 PM
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली बारामतीतील विकासकामांची केली पाहणी; अधिकाऱ्यांना दिले 'हे' निर्देश

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली बारामतीतील विकासकामांची केली पाहणी; अधिकाऱ्यांना दिले 'हे' निर्देश

Follow Us
Follow Us:

बारामती : श्री क्षेत्र मयुरेश्वर गणपती मंदिराचे पुरातन व धार्मिक महत्त्व जपत प्राचीन वास्तूचे मूळ स्वरूप अबाधित ठेवून आधुनिक सुविधांचा समन्वय साधावा. मंदिर परिसरातील विकास व जीर्णोद्धाराची कामे मंजूर आराखड्यानुसार दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज दिल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती तालुक्यातील श्री क्षेत्र मयुरेश्वर गणपती मंदिर परिसर तसेच मेडद येथील स्व. अजितदादा पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित विकासकामांची माहिती घेतली.

श्री क्षेत्र मयुरेश्वर मंदिर परिसरातील कामांचा आढावा घेताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, मंदिराच्या जिर्णोद्धाराची कामे मंजूर आराखड्यानुसारच करण्यात यावीत. मंदिर परिसर आणि गाभाऱ्यातील स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. परिसरात पावसाच्या पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होईल, याची दक्षता घ्यावी. विकासकामे करताना ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी सातत्याने समन्वय ठेवावा. विकासकामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट करून त्या म्हणाल्या, कामांमध्ये हलगर्जीपणा किंवा चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी. निकृष्ट अथवा चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या कंत्राटदारांचे नाव काळ्या यादीत टाकण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

मेडद येथील स्व. अजितदादा पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाची पाहणी

यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मेडद येथील स्व. अजितदादा पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाची पाहणी केली. महाविद्यालय परिसरातील रस्ते विकसित करण्यासाठी आवश्यक हद्दवाढीचा प्रस्ताव तातडीने मार्गी लावावा. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व निवासाच्या सुविधांचा विचार करून महाविद्यालय आणि वसतिगृह पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी पवार यांनी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, वसतिगृह तसेच परिसरातील विविध सुविधांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामांची सद्यस्थिती जाणून घेतली. तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी श्री क्षेत्र मयुरेश्वर गणपतीचे दर्शन घेतले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, पंचायत समिती सभापती किरण तावरे, जिल्हा परिषद सदस्या रोहणी कदम (ढोले), नगराध्यक्ष सचिन सातव, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाने, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार स्वप्नील रावडे, गटविकास अधिकारी किरण माने, मुख्याधिकारी पंकज भुसे, स्व. अजितदादा पवार शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल काळे, मोरगाव देवस्थानचे विश्वस्त देवराज डहाळे आदी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा  : 14 बोगदे, 93 पूल अन्…; पुण्यात 52 हजार कोटींच्या रिंग रोडचे काम वेगाने सुरु

Web Title: Deputy chief minister sunetra pawar inspected development works in baramati taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद
1

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना  इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!
2

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!

Baramati Power Outrage: बारामती तालुक्यात अवेळी भारनियमनाचा त्रास! शेतकरी अन् व्यापारी त्रस्त
3

Baramati Power Outrage: बारामती तालुक्यात अवेळी भारनियमनाचा त्रास! शेतकरी अन् व्यापारी त्रस्त

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग
4

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.