Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाकण-हिंजवडीतील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी डुडी यांनी अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

चाकण आणि हिंजवडी औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, पर्जन्य जलनिस्सारण, नाल्यांवरील अतिक्रमणे, रस्ते रुंदीकरण तसेच जंक्शन, यू-टर्न आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 02, 2026 | 03:16 PM
चाकण-हिंजवडीतील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी डुडी यांनी अधिकाऱ्यांना दिले 'हे' महत्वाचे निर्देश

चाकण-हिंजवडीतील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी डुडी यांनी अधिकाऱ्यांना दिले 'हे' महत्वाचे निर्देश

Follow Us
Follow Us:

पुणे : चाकण आणि हिंजवडी औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे, पर्जन्य जलनिस्सारण, नाल्यांवरील अतिक्रमणे, रस्ते रुंदीकरण तसेच जंक्शन, यू-टर्न आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी उच्चस्तरीय टास्क फोर्स समितीच्या माध्यमातून आढावा घेतला. संबंधित यंत्रणांनी सर्वेक्षण, नियोजन आणि आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करून त्याचा कृती आराखडा तयार ठेवावा, असे निर्देश त्यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी तथा समितीच्या सदस्य सचिव ज्योती कदम, पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यासह एमआयडीसी, महापालिका, पोलिस, महामार्ग आणि अन्य संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

नाले अतिक्रमणमुक्त करण्यावर भर

चाकण परिसरातील नाल्यांचे सर्वेक्षण करून त्यावरील अतिक्रमणांची माहिती संकलित करावी आणि अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना डुडी यांनी दिल्या. हंगामी अतिक्रमणे तातडीने हटवावीत, तर अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार कारवाई करून नाले मोकळे करावेत. परवानगी घेऊन झालेल्या बांधकामांमुळे नाल्यांचा प्रवाह अडत असल्यास, पर्यायी मार्गाने नाला वळविण्यासाठी आवश्यक जागेचे नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. एमआयडीसी आणि पीएमआरडीएने त्यांच्या कार्यक्षेत्रातील नाल्यांचे सर्वेक्षण करून अतिक्रमणांची स्वतंत्र माहिती संकलित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

ट्रॅफिक डेटाच्या आधारे यू-टर्न, जंक्शनचे नियोजन

राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजक, यू-टर्न आणि जंक्शनचे नियोजन करताना प्रत्यक्ष वाहतूक डेटा, वाहनांची दिशा आणि भविष्यातील वाहतूक वाढीचा अभ्यास करावा. ट्रॅफिक सिम्युलेशनच्या आधारे आवश्यक ठिकाणीच अधिकृत यू-टर्न आणि जंक्शन निश्चित करावेत, अशा सूचना डुडी यांनी दिल्या. रस्त्यांची रचना करताना सध्याची तसेच भविष्यातील वाहतूक क्षमता विचारात घ्यावी. वाहतूक व्यवस्थापनासाठी आयटीएमएस आणि ट्रॅफिक सिम्युलेशनचा प्रभावी वापर करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला.

खड्ड्यांबरोबरच पावसाच्या पाण्याचा प्रश्न सोडवा

हिंजवडी आणि चाकण परिसरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, केवळ खड्डे बुजविण्याऐवजी रस्त्यांवर साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा प्रभावी निचरा होण्यासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज व्यवस्था सक्षम करणे आवश्यक असल्याचे डुडी यांनी स्पष्ट केले.

अनधिकृत बसथांबे, पार्किंगवर कारवाई

राष्ट्रीय महामार्ग आणि सर्व्हिस रोडवर अनधिकृतपणे बस तसेच अन्य वाहने थांबविल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे वाहने केवळ अधिकृत बसथांबे आणि नियोजित बस डेपोमध्येच थांबतील, याची दक्षता घ्यावी. अनधिकृत थांबे आणि पार्किंगविरोधात पोलिस प्रशासनाने कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले.

हे सुद्धा वाचा : कोलवडीत व्यावसायिकावर लोखंडी रॉड, दांडक्याने हल्ला; सोन्याची चैन, घड्याळ अन् रोकड हिसकावली

पाइपलाइन, नदी प्रदूषणाचाही आढावा

एमएनजीएल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच संबंधित यंत्रणांच्या पाइपलाइनशी निगडित प्रश्न आणि नदी प्रदूषणाच्या समस्येचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांनी समन्वयाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान, गणेशोत्सवामुळे स्थगित करण्यात आलेली अतिक्रमणविरोधी कारवाई तातडीने पुन्हा सुरू करून आवश्यक जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी डुडी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Web Title: District collector jitendra dudi reviewed the situation to alleviate traffic congestion in chakan and hinjawadi nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Chakan News
  • Jitendra Dudi
  • pune news

संबंधित बातम्या

पुण्यात पुन्हा पाणी कपातीचे संकट; आठवड्यातून एक दिवस पाणी ठेवणार बंद
1

पुण्यात पुन्हा पाणी कपातीचे संकट; आठवड्यातून एक दिवस पाणी ठेवणार बंद

‘आश्वासन नको, प्रत्यक्ष मदत द्या’; प्रशासनाला शेतकऱ्यांची आर्त हाक
2

‘आश्वासन नको, प्रत्यक्ष मदत द्या’; प्रशासनाला शेतकऱ्यांची आर्त हाक

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण
3

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण

पावसामुळे शाळांच्या परिसराती बसथांबा कोसळला, मनसे आक्रमक; महापालिका आयुक्तांकडे केली ‘ही’ मागणी
4

पावसामुळे शाळांच्या परिसराती बसथांबा कोसळला, मनसे आक्रमक; महापालिका आयुक्तांकडे केली ‘ही’ मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.