Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न जटिल! विभागात टँकरची संख्या पोहोचली तब्बल १५० च्यावर

उन्हाळ्यापूर्वी पाण्यासाठीची कोणतीच तजवीज नसल्याने पाणीटंचाईचे सावट भीषण होण्याची शक्यता आहे. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विभागातील गावांत यंदाही भीषण पाणीटंचाई आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 30, 2025 | 07:34 PM
पुणे जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न जटिल! विभागात टँकरची संख्या पोहोचली तब्बल १५० च्यावर
Follow Us
Follow Us:
पुणे: नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : पुणे जिल्ह्यासह पुणे विभागात पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होताना दिसत असून, आजमितीला पुणे जिल्ह्यातील १३ पैकी ७ जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा टँकर द्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर पुणे विभागातील पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथे १५० च्या वर टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
 पुणे शहर जिल्ह्यासह पुणे विभागात सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. एप्रिल महिन्यातच उष्णतेच्या तीव्र लाटेने अंगाची लाहीलाही झाली. त्यातच हवामान खात्याने येत्या काही दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. दरम्यान उन्हाच्या झळांसोबतच विभागातील अनेक धरणे, तलावातील जलसाठा कमी झाला आहे. नदी नाले तर कधीच कोरडेठाक पडले आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. काही ठिकाणी टँकरच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत, तर अनेक ग्रामपंचायतींवर ‘हंडा मोर्चा’ निघत आहेत.

उन्हाळ्यापूर्वी पाण्यासाठीची कोणतीच तजवीज नसल्याने पाणीटंचाईचे सावट भीषण होण्याची शक्यता आहे. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विभागातील गावांत यंदाही भीषण पाणीटंचाई आहे. गावातील तलाव पूर्ण कोरडे पडल्याने गावाशेजारील विहिरीतून महिलांना पाणी आणावे लागत आहे. टँकरद्वारे विहिरीत पाणी सोडले जाते आणि मग ते पाणी महिला भरतात. ही परिस्थिती अनेक ठिकाणी पाहण्यास मिळत आहे.

Pune Water News: उन्हाळा वाढला! पुण्यात पाण्याची मागणी वाढली; मात्र ‘या’ कारणामुळे नागरिक त्रासले

 पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यापैकी ७ तालुक्यात सध्या टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. यात आंबेगाव तालुक्यातील १९ गावात १९ टँकरने, भोर तालुक्यातील २ गावात २ टँकरने, हवेली तालुक्यातील २ गावात २ टँकरने, जुन्नर तालुक्यातील १५ गावात १३ टँकरने, खेड तालुक्यातील १० गावात ९ टँकरने, पुरंदर तालुक्यातील १७ गावात १७ टँकरने, शिरूर तालुक्यातील ३ गावात ७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी टंचाई मुळे जिल्ह्यातील ६८ गावांमधील ४६२ वाड्या बाधित झाल्या असून, १ लाख १८ हजार ८४३ नागरिकांची तहान जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भागवली जात आहे.

जलवाहिन्यांचे नकाशे नाहीत उपलब्ध

शहराच्या कानाकोफऱ्यात पाणीपुरवठा विभागाने जलवाहिन्यांचे जाळे निर्माण केले आहे. अनेक जलवाहिन्यांद्वारे पाणी येण्यास अडथळा येत आहे. तसेच जलवाहिन्याअसून देखिल पाणी येत नाही. जलवाहिन्यांचे कनेक्शन तसेच वॉल दुरुस्ती केली जाते. परंतु शहरातील जलवाहिन्यांचे नकाशेच पाणीपुरवठा विभागाकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे पाण्याची समस्या सोडविण्यास वेळ लागत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

Web Title: Drinking water shoratage and problem in pune district maharashtra latest weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 07:34 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Water News
  • Water Tanker

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.