Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, घरखर्चाचा ताळमेळ बसेना; दरवाढीमुळे नागरिक हवालदिल

गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. “महिन्याचा पगार हातात पडतो आणि काही दिवसांतच संपतो,” अशी व्यथा अनेक कुटुंबप्रमुखांनी व्यक्त केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 12, 2026 | 11:21 AM
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, घरखर्चाचा ताळमेळ बसेना; दरवाढीमुळे नागरिक हवालदिल

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, घरखर्चाचा ताळमेळ बसेना; दरवाढीमुळे नागरिक हवालदिल

Follow Us
Follow Us:
  • वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
  • घरखर्चाचा ताळमेळ बसेना
  • दरवाढीमुळे नागरिक हवालदिल
राजगुरूनगर/प्रभाकर जाधव : गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. घरगुती गॅस, पेट्रोल-डिझेल, भाजीपाला, खाद्यतेल, डाळी तसेच दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या दरात झालेल्या वाढीमुळे मध्यमवर्गीय व कामगार वर्गाचे जगणे अधिक कठीण बनले आहे. पूर्वी महिन्याचा खर्च ठराविक मर्यादेत भागत होता; मात्र आता पगार वाढत नसताना खर्च दुप्पट झाल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. “महिन्याचा पगार हातात पडतो आणि काही दिवसांतच संपतो,” अशी व्यथा अनेक कुटुंबप्रमुखांनी व्यक्त केली आहे.

 

बाजारपेठेत टोमॅटो, कांदा, बटाटा यांसारख्या सर्वसामान्य भाज्यांचे दरही चढेच राहिले आहेत. त्यातच दूध, खाद्यतेल व किराणा सामानाच्या किंमती वाढल्याने गृहिणींचे बजेट विस्कळीत झाले आहे. घरखर्च भागविताना अनेकांना बचतीकडे पाठ फिरवावी लागत असून, काही कुटुंबांनी अनावश्यक खर्चाला कात्री लावण्यास सुरुवात केली आहे.

वाहनधारकांनाही इंधन दरवाढीचा मोठा फटका बसत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे प्रवास खर्च वाढला असून, त्याचा परिणाम भाडेवाढ आणि मालवाहतुकीवरही होत आहे. परिणामी बाजारातील वस्तूंच्या किंमती आणखी वाढत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

हे सुद्धा वाचा : विमानतळ प्रकल्पबाधित कर्जमाफीपासून राहणार वंचित; ‘या’ अटीमुळे पुरंदरच्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी

रोजंदारीवर काम करणाऱ्यांना सर्वाधिक फटका

महागाईचा सर्वाधिक फटका रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार, शेतमजूर आणि लहान व्यावसायिकांना बसत आहे. अनेकांच्या हाताला काम नसताना वाढत्या खर्चामुळे आर्थिक अडचणी अधिक तीव्र झाल्या आहेत. “दोन वेळच्या जेवणाची चिंता निर्माण झाली आहे,” अशी खंत काही नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती नियंत्रणात ठेवाव्यात तसेच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

हे सुद्धा वाचा : प्रत्येक कामात तरुणांचा सहभाग महत्वाचा; पुण्यात स्वच्छता मोहिमेला सतेज पाटील, यशोमती ठाकूर यांची उपस्थिती

Web Title: Due to rising inflation common citizens are facing financial crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Petrol and diesel
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
1

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
2

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
3

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

मानलेल्या बहिणीची छेड काढल्याचा राग, तरुणाचा खून; वाकड पोलिसांनी 4 तासांत लावला गुन्ह्याचा छडा
4

मानलेल्या बहिणीची छेड काढल्याचा राग, तरुणाचा खून; वाकड पोलिसांनी 4 तासांत लावला गुन्ह्याचा छडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.