Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पात प्रशासकीय इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील नऊ मृत कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत व पुनर्वसनाचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 11, 2026 | 05:45 PM
मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्...

मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्...

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पात प्रशासकीय इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील नऊ मृत कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत व पुनर्वसनाचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. संबंधित कंत्राटदार ‘अँटोनी लारा रिन्युव्हेबल एनर्जी’ कंपनीकडून विम्यासह ४० लाख रुपये, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून १० लाख रुपये आणि राज्य शासनाकडून ५ लाख रुपये, अशी एकूण ५५ लाख रुपयांची मदत प्रत्येक मृत कामगाराच्या कुटुंबाला दिली जाणार आहे. सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. १०) आयोजित पत्रकार परिषदेत या निर्णयाची अधिकृत माहिती दिली.

मतद व पुनर्वसन पॅकेजची प्रमुख वैशिष्ट्ये

एकूण ५५ लाखांचे सहाय्य : कंपनीकडून ४० लाख (विम्यासह), पालिकेकडून १० लाख आणि राज्य सरकारकडून ५ लाख रुपये.

कायमस्वरूपी नोकरी : मृत कामगाराच्या कुटुंबातील एका सदस्याला कंपनीत कायमस्वरूपी नोकरी. ऑगस्ट महिन्यापासून पगार सुरू करण्याचा प्रयत्न.

मोफत शिक्षण : मृत कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या पदवी/उच्च शिक्षणाचा संपूर्ण खर्च कंपनी उचलणार.

आरोग्य विमा : मृत कामगारांचे आई-वडील, पत्नी व मुलांसाठी कंपनीतर्फे आरोग्य विमा कवच.

पालिका नोकरी व घर : पालिकेच्या नियमांनुसार महापालिकेत नोकरी व घर देण्यासाठी महासभेच्या मान्यतेने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवणार.

नातेवाईकांची भूमिका आणि वास्तव

या दुर्घटनेनंतर पीडित कुटुंबीयांनी १ कोटी रुपयांची आर्थिक मदत, महापालिकेत नोकरी आणि घराची मागणी केली होती. प्रत्यक्षात कंपनीकडून ४० लाख रुपयांची मदत निश्चित झाली आहे.

“आम्ही १ कोटी रुपयांची मागणी केली होती, मात्र ४० लाख रुपयांवर सहमती झाली आहे. हा कोणताही व्यवहार नव्हता; कुटुंबाची बिकट परिस्थिती लक्षात घेता सर्व नातेवाईकांनी या निर्णयाला संमती दिली आहे.” — सतीश गायकवाड (मृत कामगार राहुल गायकवाड यांचे बंधू)

प्रशासकीय फेऱ्यांची शक्यता

दुर्गाटनाग्रस्त ९ मृत कामगारांपैकी ५ जण कंपनीच्या थेट सेवेत, ३ जण कंत्राटी आणि १ जण चालक म्हणून कार्यरत होते. महापालिकेतील नोकरी आणि घराच्या आश्वासनासाठी महासभेत मंजुरी मिळवून राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पीडित कुटुंबीयांना प्रशासकीय फेऱ्या माराव्या लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती

Web Title: Assistance has been announced for the families of the workers who died in the moshi tragedy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Moshi Building
  • PCMC News

संबंधित बातम्या

दुष्काळात ऊसाला हुमणीचा विळखा, शेतकऱ्यांची चिंता वाढली; उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता
1

दुष्काळात ऊसाला हुमणीचा विळखा, शेतकऱ्यांची चिंता वाढली; उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता

MPSC Student Protest : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली आंदोलनाची दखल; आयोगाच्या अध्यक्ष-सदस्यांवर कारवाईसाठी मोठी शिफारस
2

MPSC Student Protest : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली आंदोलनाची दखल; आयोगाच्या अध्यक्ष-सदस्यांवर कारवाईसाठी मोठी शिफारस

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, ‘पोलिसांनी गुन्हेगारांसारखी वागणूक दिली’; NSUIचा गंभीर आरोप
3

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, ‘पोलिसांनी गुन्हेगारांसारखी वागणूक दिली’; NSUIचा गंभीर आरोप

अटक केलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ सोडा, अन्यथा वर्षा बंगल्याला…; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा
4

अटक केलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ सोडा, अन्यथा वर्षा बंगल्याला…; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.