Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रताप सरनाईकांनी केली वल्लभनगर बसस्थानकाची पाहणी; ST प्रशासनाला दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुणे विभागातील वल्लभनगर बसस्थानकाला भेट दिली. यावेळी त्यांनी एसटी प्रशासनाला महत्वाचे निर्देश दिले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 30, 2026 | 06:37 PM
प्रताप सरनाईकांनी केली वल्लभनगर बसस्थानकाची पाहणी; ST प्रशासनाला दिले 'हे' महत्वाचे निर्देश

प्रताप सरनाईकांनी केली वल्लभनगर बसस्थानकाची पाहणी; ST प्रशासनाला दिले 'हे' महत्वाचे निर्देश

Follow Us
Follow Us:

पिंपरी : दमून-भागून आलेल्या चालक व वाहकांना योग्य विश्रांती मिळावी यासाठी त्यांच्या विश्रांतीगृहांमध्ये उत्तम सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वच्छतागृहे टापटीप व स्वच्छ ठेवावीत, कर्मचाऱ्यांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी तसेच अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय करावी, अशा घरगुती सुविधांची निर्मिती करावी, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिले आहेत. ते पुणे विभागातील वल्लभनगर बसस्थानकाला भेट दिली असता बोलत होते.

 

“चालक-वाहक हा एसटीचा कणा आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कष्ट करून तो दररोज राज्यातील सुमारे ५० ते ५५ लाख प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. या कर्मचाऱ्यांना कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर घरच्यासारख्या सुविधा मिळाल्यास ते अधिक उत्साहाने सेवा बजावतील,” असा मोलाचा सल्ला मंत्री सरनाईक यांनी दिला.

बसस्थानकाची पाहणी करताना त्यांनी अनेक वर्षे बंद असलेले व्यापारी गाळे महिला बचत गटांना व होतकरू उद्योजक तरुणांना अत्यल्प भाड्यात उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. यामुळे एसटी महामंडळाचा महसूल वाढेल तसेच प्रवासी व कर्मचाऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील, असे त्यांनी नमूद केले.

महामार्गांवरील हॉटेल-मोटेलप्रमाणेच एसटी बसस्थानकांवरील उपहारगृहांमध्येही सर्व प्रवाशांना ४० रुपयांत चहा-नाश्ता देण्याची योजना १ जूनपासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केली. या पाहणीदरम्यान खासदार श्रीरंग बारणे, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच एसटीचे अधिकारी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी शिवसेनेला मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का? काँग्रेसचा सवाल

प्रताप सरनाईक यांचा विक्रेत्यांना सज्जड दम

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकांवरील प्रवाशांना ‘नाथजल’ची थंडगार पाण्याची बाटली केवळ १५ रुपयांनाच मिळाली पाहिजे. जर कोणीही अधिक दराने विक्री करताना आढळल्यास संबंधितांचा विक्री परवाना थेट रद्द केला जाईल, असा कडक इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी (३० एप्रिल) सकाळी पुणे विभागातील लोणावळा बसस्थानकास अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी बसस्थानकावरील प्रवासी सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी दरम्यान, प्रवाशांशी संवाद साधत असताना ‘नाथजल’च्या एक लिटर बाटलीसाठी २० रुपये उकळले जात असल्याचे काही प्रवाशांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. याची गंभीर दखल घेत सरनाईक यांनी संबंधित विक्रेत्याला जाब विचारला आणि तात्काळ स्पष्ट दरफलक लावण्याच्या सूचना दिल्या. यापुढे १५ रुपयांची बाटली महाग विकल्यास परवाना रद्द करण्याची तंबीही त्यांनी यावेळी दिली.

Web Title: Transport minister pratap sarnaik has inspected vallabhnagar bus stand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 06:37 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
1

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान
2

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
3

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

MSRTC NCMC Card: ST प्रवाशांसाठी मोठी सुविधा! NCMC कार्ड आता ‘या’ वरून करा रिचार्ज; केंद्रावर जाण्याची गरज नाही
4

MSRTC NCMC Card: ST प्रवाशांसाठी मोठी सुविधा! NCMC कार्ड आता ‘या’ वरून करा रिचार्ज; केंद्रावर जाण्याची गरज नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.