Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुलूपबंद दवाखाना अन् डॉक्टर बेपत्ता, प्रशासनाचा निष्काळजीपणा; शेतकरी, पशुपालक अडचणीत

पाबळ परिसरातील शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने शेतकरी व पशुपालक गंभीर अडचणीत सापडले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 11, 2026 | 01:56 PM
कुलूपबंद दवाखाना अन् डॉक्टर बेपत्ता, प्रशासनाचा निष्काळजीपणा; शेतकरी, पशुपालक अडचणीत

कुलूपबंद दवाखाना अन् डॉक्टर बेपत्ता, प्रशासनाचा निष्काळजीपणा; शेतकरी, पशुपालक अडचणीत

Follow Us
Follow Us:
  • कुलूपबंद दवाखाना अन् डॉक्टर बेपत्ता
  • प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड
  • शेतकरी, पशुपालक अडचणीत
शिरुर : पाबळ परिसरातील शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने शेतकरी व पशुपालक गंभीर अडचणीत सापडले आहेत. शासनाकडून उभारण्यात आलेली सुसज्ज इमारत सध्या धुळखात पडलेली दिसत असून, ना नियमित सेवा सुरू आहे, ना वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत असल्याचे चित्र आहे. या दवाखान्यासाठी अतिरिक्त जबाबदारीवर नेमण्यात आलेले वैद्यकीय अधिकारीही नियमितपणे उपलब्ध नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. “डॉक्टर आले तर आले, नाहीतर दवाखाना दिवसभर कुलूपबंदच असतो,” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

 

विशेष म्हणजे दवाखान्याच्या बाहेर कोणताही नामफलक किंवा पशुवैद्यकीय सेवेची माहिती दर्शविणारा फलक लावलेला नसल्याने हा दवाखाना सुरू आहे की कायमचा बंद, याबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पाबळ, पिंपळवाडी, खैरेनगर तसेच परिसरातील बारावाड्यांतील शेतकऱ्यांना गाई, म्हशी, शेळ्या, कोंबड्या आणि पाळीव कुत्र्यांच्या उपचारासाठी खासगी पशुवैद्यकीय सेवांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक भार वाढत असून, तातडीच्या उपचारांमध्ये विलंब होत असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. शासनाने लाखो रुपये खर्च करून उभारलेली ही इमारत वापराअभावी निष्क्रिय झाली असून, प्रशासन व संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. “दवाखाना सुरू असेल तरच शेतकरी येतील, पण येथे कायम कुलूपच दिसते,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे शहरावर पाणी कपातीची टांगती तलवार; जलसंपदा विभागाच्या सूचनेनंतर महापालकेकडून उपाययोजना सुरु

कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नेमण्याची मागणी

दरम्यान, या दुर्लक्षामुळे पशुधनाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, वेळेवर उपचार न मिळाल्यास जनावरांच्या जीवितालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नेमून दवाखाना सुरू करावा, अशी जोरदार मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Farmers are in trouble as the veterinary clinic in pabal has been closed for several months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Shirur News

संबंधित बातम्या

संभाजीनगरमध्ये दिवंगत डाॅन बाबा फर्जनच्या घरावर पाेलिसांचा छापा; रोख रकमेसह मोठा शस्त्रसाठा जप्त
1

संभाजीनगरमध्ये दिवंगत डाॅन बाबा फर्जनच्या घरावर पाेलिसांचा छापा; रोख रकमेसह मोठा शस्त्रसाठा जप्त

Maharashtra Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा! कर्जमाफी योजनेला ब्रेक; पुढील आठवड्यात अंमलबजावणीची शक्यता
2

Maharashtra Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा! कर्जमाफी योजनेला ब्रेक; पुढील आठवड्यात अंमलबजावणीची शक्यता

Ajit Pawar: मोठी बातमी! अजितदादा पवार यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ द्या; राष्ट्रवादीच्या आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
3

Ajit Pawar: मोठी बातमी! अजितदादा पवार यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ द्या; राष्ट्रवादीच्या आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

मुंबईतील फनेल झोनमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती; मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे निर्देश
4

मुंबईतील फनेल झोनमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती; मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.