Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune : पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेती कर्जवसुलीला स्थगिती

पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम अडचणीत सापडलेल्या पुणे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त आठ तालुक्यांतील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जफेडीसाठी मुदत मिळणार आहे. 

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 02, 2026 | 01:22 PM
पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेती कर्जवसुलीला स्थगिती

पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेती कर्जवसुलीला स्थगिती

Follow Us
Follow Us:

पुणे : पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम अडचणीत सापडलेल्या पुणे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त आठ तालुक्यांतील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. दुष्काळाच्या काळात कर्जाचा तगादा लागू नये, यासाठी खरीप २०२६ मधील अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन करण्यास मान्यता देतानाच शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीलाही स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पीक हातातून गेल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जफेडीसाठी मुदत मिळणार आहे.

 

राज्यात खरीप २०२६ मध्ये Trigger-१ (प्रथम कळ) लागू झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा समावेश आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या २५ सप्टेंबरच्या शासन निर्णयानंतर सहकार विभागाने ३० सप्टेंबर रोजी स्वतंत्र परिपत्रक काढून पीक कर्ज पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जवसुली स्थगितीबाबत कार्यवाही स्पष्ट केली आहे. खरीप पीक कर्जाच्या परतफेडीचा कालावधी ३१ मार्चपर्यंत असल्याने या मुदतीत कर्जाची परतफेड करणे शक्य नसलेल्या शेतकऱ्यांची संमती घेऊन २०२६-२७ मधील अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन करण्यात येणार आहे. सर्व संबंधित बँकांनी ही प्रक्रिया ३० एप्रिल २०२७ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पुनर्गठन झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना पुढील खरीप हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

कर्जवसुलीला ब्रेक; शेतकऱ्यांना श्वास

दुष्काळग्रस्त आठ तालुक्यांतील शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना तात्पुरता आर्थिक दिलासा मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे दुष्काळाच्या काळात पीक उत्पादन घटले असताना कर्जफेडीचा तातडीचा आर्थिक दबाव कमी होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा : पावसामुळे शाळांच्या परिसराती बसथांबा कोसळला, मनसे आक्रमक; महापालिका आयुक्तांकडे केली ‘ही’ मागणी

दुष्काळग्रस्त भागासाठी १२ सवलती

दुष्काळ जाहीर केलेल्या २६५ तालुक्यांसाठी शासनाने विशेष उपाययोजना जाहीर केल्या असून त्यात जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जवसुलीला स्थगिती, कृषी पंपाच्या वीजबिलात सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेतील कामांच्या निकषांत शिथिलता, टँकरद्वारे पाणीपुरवठा, शेतीपंपाची वीज जोडणी खंडित न करणे, अन्नधान्याची उपलब्धता, जनावरांसाठी चारा, जलसंधारणाची कामे आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन या उपायांचा समावेश आहे. शेतपिकांच्या नुकसानीबाबतची आर्थिक मदत मात्र स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे, विहित कार्यपद्धती पूर्ण झाल्यानंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Farmers in pune district have received significant relief due to the governments decision nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • maharashtra

संबंधित बातम्या

Maharashtra SIR 2026: मतदारांसाठी मोठा दिलासा! नोटीस आली तरी सुनावणीला जाण्याची गरज नाही; BLO घरी येऊन घेणार कागदपत्रे
1

Maharashtra SIR 2026: मतदारांसाठी मोठा दिलासा! नोटीस आली तरी सुनावणीला जाण्याची गरज नाही; BLO घरी येऊन घेणार कागदपत्रे

Nashik News: पावसाने पाठ फिरवली अन् भूजलही घटले! पाच तालुक्यांतील शेतकरी संकटात; मदतीकडे डोळे
2

Nashik News: पावसाने पाठ फिरवली अन् भूजलही घटले! पाच तालुक्यांतील शेतकरी संकटात; मदतीकडे डोळे

Dharashiv News: दुष्काळात शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीचा तगादा नको; धाराशिव जिल्हा काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
3

Dharashiv News: दुष्काळात शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीचा तगादा नको; धाराशिव जिल्हा काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sangli : लाडकी बहीण, बँक अन् पेन्शनचे मेसेज ठप्प!; मोबाईल रिचार्जच्या मनमानीविरोधात नागरिक आक्रमक!
4

Sangli : लाडकी बहीण, बँक अन् पेन्शनचे मेसेज ठप्प!; मोबाईल रिचार्जच्या मनमानीविरोधात नागरिक आक्रमक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.