Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑक्टोबर-2025 ची नुकसान भरपाई मदत रखडली; शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

ऑक्टोबर-2025 मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असतानाही शासनाकडून जाहीर करण्यात आलेली मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने शिरूर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 12, 2026 | 01:03 PM
जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी द्या; शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी द्या; शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Follow Us
Follow Us:

न्हावरे : ऑक्टोबर-2025 मध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असतानाही शासनाकडून जाहीर करण्यात आलेली मदत अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने शिरूर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे तब्बल 760 शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

 

ऑक्टोबर-2025 मध्ये अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सुमारे 415 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. या क्षेत्रावरील पंचनामे त्यावेळी तात्काळ पूर्ण झाले असले तरीही प्रत्यक्ष मदत वितरणात मोठा विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. शासनाने हेक्टरी 10 हजार रुपयांची मदत जाहीर करून निधीला मान्यता दिली होती, मात्र प्रत्यक्षात सुमारे 70 लाख रुपयांची मदत अद्याप प्रलंबित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

अहवालानुसार,आतापर्यंत केवळ 60 टक्के शेतकऱ्यांनाच मदत मिळाली असून, उर्वरित शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत. शासनाने 15 दिवसांत मदत देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अनेक महिन्यांनंतरही निधी न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. नुकत्याच मार्च-2026 च्या सुरुवातीला पुन्हा गारपीट व अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. मागील मदत न मिळाल्याने नव्या संकटांपुढे शेतकरी हवालदिल झाला आहे.

“नैसर्गिक आपत्तीची मदत वेळेत न देणे म्हणजे शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नाही,” अशी तीव्र प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व भाजपाच्या किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य सुभाष कांडगे यांनी व्यक्त केली. तसेच प्रलंबित मदत शासनाने तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही कांडगे यांनी दिला आहे.

सुभाष कांडगे यांनी शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्यावरही गंभीर आरोप करत महसूल विभागाच्या दिरंगाईमुळेच मदत रखडल्याचे स्पष्ट केले. तर, तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक यांनी कृषी विभागाकडील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितल्याने महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या रोषामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, शासन आता या प्रश्नावर किती तत्परतेने कार्यवाही करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याप्रकरणी शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

हे सुद्धा वाचा : कुलूपबंद दवाखाना अन् डॉक्टर बेपत्ता, प्रशासनाचा निष्काळजीपणा; शेतकरी, पशुपालक अडचणीत

Web Title: Farmers in shirur taluka have warned of agitation due to non receipt of compensation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Shirur News

संबंधित बातम्या

संभाजीनगरमध्ये दिवंगत डाॅन बाबा फर्जनच्या घरावर पाेलिसांचा छापा; रोख रकमेसह मोठा शस्त्रसाठा जप्त
1

संभाजीनगरमध्ये दिवंगत डाॅन बाबा फर्जनच्या घरावर पाेलिसांचा छापा; रोख रकमेसह मोठा शस्त्रसाठा जप्त

Maharashtra Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा! कर्जमाफी योजनेला ब्रेक; पुढील आठवड्यात अंमलबजावणीची शक्यता
2

Maharashtra Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा! कर्जमाफी योजनेला ब्रेक; पुढील आठवड्यात अंमलबजावणीची शक्यता

Ajit Pawar: मोठी बातमी! अजितदादा पवार यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ द्या; राष्ट्रवादीच्या आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
3

Ajit Pawar: मोठी बातमी! अजितदादा पवार यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ द्या; राष्ट्रवादीच्या आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

मुंबईतील फनेल झोनमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती; मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे निर्देश
4

मुंबईतील फनेल झोनमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती; मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.