Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tukaram Mundhe: पुण्यातील दारूकांडानंतर FDA अ‍ॅक्शन मोडमध्ये! तुकाराम मुंडे म्हणाले, ‘मद्यावर कारवाई…’

अन्न सुरक्षा हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे दूध, पनीर, तेल यांसारख्या रोजच्या वापरातील वस्तूंच्या गुणवत्तेला प्राधान्य दिले जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 08, 2026 | 06:33 PM
Tukaram Mundhe: पुण्यातील दारूकांडानंतर FDA अ‍ॅक्शन मोडमध्ये! तुकाराम मुंडे म्हणाले, ‘मद्यावर कारवाई…’
Follow Us
Follow Us:

गावठी दारूच्या सेवनाने वीस नागरिकांचा मृत्यू
अल्कोहोलिक आणि बिनअल्कोहोलिक पेयांच्या गुणवत्तेवर काम करण्याची गरज
आगामी काळात मद्यावर कारवाई करण्याचे नियोजन

पुणे: ‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात काही दिवसांपूर्वी गावठी दारूच्या सेवनाने वीस नागरिकांचा मृत्यू झाला. चुकीच्या रसायनांचा वापर झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. हा गंभीर विषय असल्याने याकडे लक्ष देण्यासाठी गरज आहे. तसेच अल्कोहोलिक आणि बिनअल्कोहोलिक पेयांच्या गुणवत्तेवर काम करण्याची गरज आहे. सध्या राज्यात अन्न पदार्थांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनावर ताण आहे. मात्र, आगामी काळात मद्यावर कारवाई करण्याचे नियोजन असून त्यावर कारवाई करण्यात येईल,’ असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

मद्याची गुणवत्ता, उत्पादन आणि त्यावरील माहिती हे विषय अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकारात येतात. एफडीएच्या कार्यालयात मद्याबाबत तक्रारीही येत असल्याने आता मद्याच्या गुणवत्तेकडे लक्ष देत आगामी काळात कारवाईचे नियोजन करण्यात आले आहे. दूध, पनीर, तेल यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंसोबत आता मद्य आणि चायनीज पदार्थांच्या गुणवत्तेचीही तपासणी केली जाणार असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी स्पष्ट केले. माय जनसेवक आणि पुणे लोकल यांच्या वतीने मुंंढे यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुंढे बोलत होते. कवी अरविंद जगताप आणि महाराष्ट्र टाइम्सचे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर यांनी मुंढे यांची मुलाखत घेतली.

Nagpur News : सावजी वरून बावनकुळे आक्रमक ; मुंडेंना इशारा , रेस्ट्रॉरंट बंद पडतील अशी विधाने करू नका

मुंढे म्हणाले, ‘अन्न सुरक्षा हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे दूध, पनीर, तेल यांसारख्या रोजच्या वापरातील वस्तूंच्या गुणवत्तेला प्राधान्य दिले जात आहे. पूर्वी संसर्गजन्य आजारांचे प्रमाण अधिक होते. मात्र, आता उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना भेसळमुक्त अन्न पदार्थ मिळणे आवश्यक आहे. भेसळ रोखण्यासाठी उत्पादक, प्रशासन आणि नागरिक या तिन्ही घटकांनी आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. उत्पादकांनी दर्जेदार पदार्थ तयार करावेत, प्रशासनाने तपासणी करून देखरेख ठेवावी आणि नागरिकांनी संशयास्पद प्रकार आढळल्यास प्रश्न विचारावेत. तिन्ही घटकांनी योग्य काम केल्यास भेसळ रोखणे शक्य आहे.’

‘अन्नविषयक तक्रारी नोंदविण्यासाठी सुरू केलेल्या पोर्टलवर तीन आठवड्यांत सुमारे तीन हजार तक्रारी आल्या असून, त्यात पुणे जिल्ह्यातील तक्रारी सर्वाधिक आहेत. अधिकारी येतील-जातील; मात्र प्रशासनाने सातत्याने चांगले काम केले पाहिजे. परिस्थिती किंवा मनुष्यबळाच्या कमतरतेला दोष देत बसण्यापेक्षा त्यावर मात करून काम करण्याची गरज आहे,’ असे मुंढे यांनी सांगितले.
समाज माध्यमांचा वापर करताना युवकांनी स्वतःची विचार करण्याची क्षमता जपावी. समाज माध्यमांचा वापर करणे चुकीचे नाही. मात्र, त्याचा किती वापर करायचा हे महत्त्वाचे आहे. तरुणांनी योग्य गोष्टींच्या प्रेमात पडून जीव ओतून काम करावे आणि स्वतःचे अस्तित्व स्वतः निर्माण करावे, असे आवाहन मुढे केले. मिलिंद कुलकर्णी सूत्रसंचालन केले. अमित रुके आणि विरेश आंधळकर यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: Fda commissioner tukaram mundhe in pune said take action against alcoholic and non alcoholic drinks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • FDA
  • liquor
  • pune news
  • Tukaram Munde
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या देखाव्यांना ‘AI’ची साथ; तंत्रज्ञानाने बदलले जिवंत देखाव्यांचे रूप
1

Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या देखाव्यांना ‘AI’ची साथ; तंत्रज्ञानाने बदलले जिवंत देखाव्यांचे रूप

FDA ची पुन्हा धडक कारवाई; चक्क लक्झरी बस थांबवून मिठाईसाठी नेण्यात येणारा 16 लाखांचा खवा जप्त
2

FDA ची पुन्हा धडक कारवाई; चक्क लक्झरी बस थांबवून मिठाईसाठी नेण्यात येणारा 16 लाखांचा खवा जप्त

Hadapsar Ghorpadi 3rd Railway Line: हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला वेग; ‘डी-१५ ब्लॉक’चा पहिला टप्पा यशस्वी!
3

Hadapsar Ghorpadi 3rd Railway Line: हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला वेग; ‘डी-१५ ब्लॉक’चा पहिला टप्पा यशस्वी!

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ
4

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.