Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळी कामांचा हिशेब द्या, चार वर्षातील केलेली कामे दाखवा; महापालिका आयुक्तांकडे माजी पदाधिकाऱ्यांची मागणी

गेल्या चार वर्षांत करण्यात आलेल्या पावसाळी लाईन (स्टॉर्म वॉटर ड्रेनेज) कामांचा सविस्तर अहवाल जाहीर करावा, अशी मागणी “आपले पुणे आपला परिसर” संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 03, 2026 | 12:07 PM
Pune Mayor office bomb threat email 2026, Nagpur RSS headquarters security threat, IED bomb threat,

Pune Mayor office bomb threat email 2026, Nagpur RSS headquarters security threat, IED bomb threat,

Follow Us
Follow Us:

पुणे : अवकाळी पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार वर्षांत करण्यात आलेल्या पावसाळी लाईन (स्टॉर्म वॉटर ड्रेनेज) कामांचा सविस्तर अहवाल जाहीर करावा, अशी मागणी “आपले पुणे आपला परिसर” संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. पुणे शहरात निर्माण झालेल्या परीिस्थतीच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात पावसाळी लाईनची कामे कितपत झाली, ती पूर्ण झाली की अर्धवट राहिली, याचा आढावा घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

 

गेल्या चार वर्षांत या कामांवर सुमारे दीडशे कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर येत असून, या खर्चाचा तपशील आणि कामांची ठिकाणनिहाय माहिती पुणे महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे प्रशासनालाही कामांचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करता येईल आणि आगामी पावसाळ्यासाठी योग्य नियोजन करता येईल, असे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी तसेच माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी संयुक्तपणे सांगितले.

आम आदमी पक्षाने प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी ‘‘ पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक असलेल्या पावसाळी लाईनची कामे न झाल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली. परिस्थितीची माहिती देऊनही पालिका आणि सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाने कोणतीही तातडीची दखल घेतली नाही. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा प्रभावी नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला,’’ असा आराेप केला. प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही धनंजय बेनकर यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा : काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट; ‘या’ मागण्यांचे दिले निवेदन

पावसाच्या तडाख्यानंतर प्रशासनाला जाग

अवकाळी पावसाने शहराला जाेरदार तडाखा दिल्यानंतर प्रशासन जागे झाले आहे. साेमवारपासून नालेसफाईची कामे हाती घेतली जातील असे आयुक्त नवल किशाेर राम यांनी स्पष्ट केले. पावसाची तीव्रता लक्षात घेत स्थायी समितीची बैठक सुरु असतानाच आयुक्त नवल किशाेर राम यांनी खाते प्रमुखांना पाणी साठण्याच्या ठिकाणावर पाेहचून पाण्याचा निचरा करण्याच्या सुचना दिल्या हाेत्या. त्यामुळे कमीत कमी वेळेत कर्मचारी, अधिकारी ‘ऑन फिल्ड’ हाेते असा दावाही प्रशासनाने केला आहे. भारत सरकारच्या नियमानुसार पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता सध्याच्या उपलब्ध नैसर्गिक नाल्यात नाहीत. सध्या आपल्याकडे ५० ते ६० मिमी पाऊस पडल्यानंतर पाण्याचा निचरा हाेईल अशी गटार व्यवस्था आहे. मात्र, प्रत्यक्षात आपल्याकडे १३० मिमी पाऊस पडल्यानंतरही शहरात पाणी तुंबणार नाही अशी यंत्रणा उभी करावी लागणार आहे, असे आयुक्त नवल किशाेर राम यांनी नमूद केले.

Web Title: Former municipal office bearers have made a big demand to pune municipal commissioner naval kishore ram

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 12:07 PM

Topics:  

  • Naval Kishore Ram
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
1

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

MPSC Protest : आंदोलनात संजय राऊतांची एन्ट्री; ‘जंतर-मंतर जिल्ह्या-जिल्ह्यात उभं राहिलं तर मंत्रालयाबाहेर पडता येणार नाही’
2

MPSC Protest : आंदोलनात संजय राऊतांची एन्ट्री; ‘जंतर-मंतर जिल्ह्या-जिल्ह्यात उभं राहिलं तर मंत्रालयाबाहेर पडता येणार नाही’

जेजुरीत भाजप युवा मोर्चाचे शक्तिप्रदर्शन; ‘युवाशक्तीला संघटनेत व्यासपीठ द्या’, गोपीचंद पडळकरांचे आवाहन
3

जेजुरीत भाजप युवा मोर्चाचे शक्तिप्रदर्शन; ‘युवाशक्तीला संघटनेत व्यासपीठ द्या’, गोपीचंद पडळकरांचे आवाहन

हवेली-७ कार्यालयाच्या तपासणीत २१ दस्तांवर आक्षेप; संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची रोहन सुरवसे पाटलांची मागणी
4

हवेली-७ कार्यालयाच्या तपासणीत २१ दस्तांवर आक्षेप; संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची रोहन सुरवसे पाटलांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.