Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे

मुठा नदीच्या प्रदूषणासाठी केवळ आरएमसी प्रकल्पच जबाबदार नसून सांडपाणी हेही मोठे कारण असल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, नदी प्रदूषण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एसटीपी उभारण्याचे काम सुरू आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 02, 2026 | 02:35 AM
पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे
Follow Us
Follow Us:
  • आरएमसी प्रकल्पांच्या प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा आढावा
  • नियमांचे पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर सातत्याने कारवाई
  • नियमित बैठका घेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार 
मुंबई: पुणे शहरातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांमुळे मुठा नदीचे प्रदूषण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे बैठक घेऊन नदी पुनर्जीवन प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसेच आरएमसी प्रकल्पांच्या प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर सातत्याने कारवाई केली जात असून, यापुढेही नियमित बैठका घेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवले जाईल, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

यासंदर्भात विधानपरिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेत डॉ. नीलम गोऱ्हे, प्रवीण दरेकर आणि विक्रम काळे यांनी सहभाग घेतला. पर्यावरण मंत्री मुंडे म्हणाल्या की, पुण्यातील १०५ आरएमसी प्रकल्पांपैकी सर्व प्रकल्प बंद करण्यात आलेले नसून, केवळ नियमांचे पालन न करणारे, बेकायदेशीरपणे कार्यरत किंवा प्रदूषण नियंत्रणाच्या अटींचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवरच कारवाई करण्यात आली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात ‘एकात्मिक दुग्धव्यवसाय विकास उपक्रम’, मंत्री पंकजा मुंडेंनी केले उपक्रमाचे उदघाटन

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आरएमसी प्रकल्पांसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानुसार सर्व प्रकल्पांना बंदिस्त (बॉक्स कव्हर) व्यवस्था, धूळ नियंत्रणासाठी स्प्रिंकलर, वाहनांच्या टायर धुण्याची व्यवस्था आणि इतर प्रदूषण नियंत्रण उपाययोजना बंधनकारक करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कारवाई केली जाईल.

मुठा नदीच्या प्रदूषणासाठी केवळ आरएमसी प्रकल्पच जबाबदार नसून सांडपाणी हेही मोठे कारण असल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, नदी प्रदूषण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एसटीपी उभारण्याचे काम सुरू आहे. पाण्याच्या गुणवत्तेचे ऑनलाईन निरीक्षणही करण्यात येत आहे, असेही मंत्री मुंडे यांनी नमूद केले.

“पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांना…”; मंत्री पंकजा मुंडेंची माहिती

पर्यावरण विभागाकडून प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना वेळोवेळी नोटिसा दिल्या जात असून, नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रदूषण नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी उद्योगांच्या बँक गॅरंटीची रक्कम वाढविण्याबाबत समितीमार्फत धोरण तयार करण्यात येत असून, अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेले व्यापक धोरणही तयार करण्यात येत असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले.

Web Title: Strict enforcement of pollution control measures at ready mix concrete plants in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • environment
  • Pankaja Munde
  • pune news

संबंधित बातम्या

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
1

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले
2

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प
3

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…
4

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.