Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’

विश्रांतीनगरमधील बचाव मोहिमेदरम्यान रानगव्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्याच्या सुरक्षित सुटकेसाठी अनेकजण प्रार्थना करत होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 01, 2026 | 08:32 PM
प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी 'घरवापसी'

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी 'घरवापसी'

Follow Us
Follow Us:

जलवाहिन्यांमध्ये अडकला होता रानगवा 
बोर व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक अधिवासात केले निसर्गमुक्त
अनेकांच्या बचावकार्यामुळे रानगवा सुखरूप 

पुणे: विश्रांतीनगर परिसरातील जलवाहिन्यांमध्ये अडकलेल्या आणि संपूर्ण पुण्याचे लक्ष वेधून घेतलेल्या त्या रानगव्याची अखेर ‘घरवापसी’ झाली. मंगळवारी थरारक बचाव मोहिमेनंतर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेल्या या प्रौढ नर रानगव्याला बुधवारी वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक अधिवासात निसर्गमुक्त करण्यात आले. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेचा सुखद शेवट झाला.

पुणे महानगरपालिकेच्या दोन मोठ्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेल्या रानगव्याची पुणे वन विभागाने विविध शासकीय यंत्रणा, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, पशुवैद्यकीय तज्ज्ञ आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने यशस्वी सुटका केली होती. सुटकेनंतर करण्यात आलेल्या सखोल वैद्यकीय तपासणीत रानगवा पूर्णपणे निरोगी असल्याचे स्पष्ट झाले. कोणतीही गंभीर दुखापत नसल्याने त्याला निसर्गात पुनर्वसन करण्यास वैद्यकीयदृष्ट्या हिरवा कंदील देण्यात आला.

वन विभागाची ‘धडाकेबाज’ कारवाई! घोरपडीच्या अवयवांसह तस्कर जेरबंद, शिकाऱ्यांच्या मनात उडाली धडकी

त्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये आणि वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ मधील तरतुदींनुसार रानगव्याचे विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुण्यात आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विशेष वन्यप्राणी वाहतूक वाहनातून रानगव्याला सुरक्षितरीत्या बोर व्याघ्र प्रकल्पात नेण्यात आले. नवीन बोर वनपरिक्षेत्रातील नवरगाव नियतक्षेत्र, कक्ष क्रमांक २४० मध्ये त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. ही प्रक्रिया उपसंचालक मंगेश ठेंगडी यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली पार पडली, तर संपूर्ण बचाव, उपचार, वाहतूक आणि पुनर्वसन मोहिमेचे नियोजन व समन्वय पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस यांनी केले.

वणव्यांच्या तडाख्यातून जंगलांची सुटका; सुखावणारा पाऊस, टेकड्यांनी घेतला मोकळा श्वास

विश्रांतीनगरमधील बचाव मोहिमेदरम्यान रानगव्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्याच्या सुरक्षित सुटकेसाठी अनेकजण प्रार्थना करत होते. अखेर हा रानगवा सुखरूप जंगलात परतल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. वन्यजीव संवर्धनासाठी विविध यंत्रणांनी केलेल्या समन्वयाचे हे एक यशस्वी उदाहरण ठरले आहे.

Web Title: Wild boars trapped waterways at vishnitawadi in pune safely released into boar tiger reserve

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 08:32 PM

Topics:  

  • Forest Department
  • pune news
  • Wild Animals

संबंधित बातम्या

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण
1

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
2

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले
3

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प
4

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.