
Former Pune mayor and NCP leader Shantilal Suratwala has passed away
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये तीन दिवसीय दुखवटा असताना पुण्यातील आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्याचे निधन झाले. शांतीलाल सुरतवाला यांनी वयाच्या 76 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही काळापासून ते कॅन्सर या गंभीर आजाराशी झुंज देत होते. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने पुण्यातील राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात असून एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
हे देखील वाचा : पीएमपी प्रवाशांचा ऑनलाईन तिकीटाकडे कल; दररोज १ लाख…
पुण्याचे महापौर पद भुषवले
शांतीलाल सुरतवाला यांनी १९९२ ते १९९३ या वेळामध्ये पुणे शहराचे महापौर होते. त्यांची ही कारकीर्द ही अत्यंत यशस्वी ठरली. महापौर म्हणून त्यांनी शहराच्या पायाभूत सुविधा प्रदान करण्यासाठी आणि विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. पाणीपुरवठा, रस्ते, नागरी सुविधा आणि सर्वसामान्य पुणेकरांचे प्रश्न सोडवणे हे त्यांच्या कामाचे केंद्रबिंदू होते. महापौर म्हणून त्यांनी नेहमीच प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय राखण्याचा प्रयत्न केला.
हे देखील वाचा : रनवे दिसला नाही, म्हणून पायलटने….तांत्रिक बिघाड नव्हता – कंपनीचा खुलासा
राष्ट्रवादी पक्षाचेही कामकाज सांभाळले
शांतीलाल सुरतवाला यांनी पक्षांतर्गत काम देखील मोठ्या हाततोडीने सांभाळले आहे. शांतीलाल सुरतवाला यांनीराष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली. ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी पुण्यात मोठे योगदान दिले. विशेषतः तरुण कार्यकर्त्यांना घडवण्यात आणि मार्गदर्शन करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती.