Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: कोडिंगपासून कंटेंटपर्यंत; पुण्यात ‘AI’ बनतोय कामाचा साथीदार

पुण्यातील आयटी क्षेत्रात एआयचा वापर केवळ प्रयोगापुरता मर्यादित न राहता दैनंदिन कामाचा भाग बनत आहे. त्यामुळे कमी वेळेत अधिक काम करणे, मोठ्या प्रमाणातील माहितीचे विश्लेषण करणे आणि निर्णयप्रक्रियेला वेग देणे शक्य होत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 20, 2026 | 02:35 AM
Pune News: कोडिंगपासून कंटेंटपर्यंत; पुण्यात ‘AI’ बनतोय कामाचा साथीदार
Follow Us
Follow Us:
  • पुण्यात ‘एआय’ बनतोय कामाचा साथीदार
  • शहरातील आयटी कंपन्यांमध्ये ‘एआय’चा वाढता वापर
  • तरुणांच्या कामाची पद्धतही बदलतेय
पुणे/किरण ढोणे: देशातील महत्त्वाचे आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आता केवळ सॉफ्टवेअर कंपन्याच नव्हे, तर विविध क्षेत्रांतील तरुण व्यावसायिकांच्या कामकाजातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वाढत आहे. माहिती तंत्रज्ञान, व्यावसायिक सेवा, स्टार्टअप, मीडिया, शिक्षण आणि ग्राहक सेवा अशा विविध क्षेत्रांत कामाचा वेग वाढविण्यासाठी ‘एआय’चा वापर केला जात आहे. शहरातील मोठ्या आयटी कंपन्यांसोबतच स्टार्टअप आणि नव्या तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांमध्येही एआय टूल्सचा वापर वाढत असल्याचे चित्र आहे.

पुण्यात आयटी आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील मोठी रोजगार बाजारपेठ असल्याने देशाच्या विविध भागांतून दरवर्षी मोठ्या संख्येने तरुण शिक्षण आणि नोकरीसाठी शहरात येतात. त्यामुळे एआयमुळे बदलणाऱ्या रोजगाराच्या पद्धतींचा थेट परिणाम पुण्यातील तरुण व्यावसायिकांवर होत आहे. कोडिंग, डेटा विश्लेषण, कंटेंट तयार करणे, ग्राहक सेवा, सॉफ्टवेअर टेस्टिंग, प्रेझेंटेशन तयार करणे यांसारख्या कामांमध्ये एआय टूल्सचा वापर केला जात आहे.

जागतिक पातळीवरील मॅककिन्सीच्या ‘द स्टेट ऑफ एआय’ अहवालानुसार, तंत्रज्ञान क्षेत्रात एआयचा वापर सर्वाधिक असून, तब्बल ८८ टक्के कर्मचारी त्यांच्या कामातील किमान एका कार्यासाठी जनरेटिव्ह एआयचा वापर करतात. व्यावसायिक सेवा क्षेत्रात हे प्रमाण ८० टक्के, तर प्रगत उद्योग तसेच मीडिया आणि दूरसंचार क्षेत्रात ७९ टक्के आहे.

AI In Indian Sugar Industry : साखर उद्योगासाठी एआय ठरतंय ‘गेमचेंजर’; उसाची रिकव्हरी अन् इथेनॉल निर्मितीत होणार मोठी वाढ

पुण्यातील आयटी क्षेत्रात एआयचा वापर केवळ प्रयोगापुरता मर्यादित न राहता दैनंदिन कामाचा भाग बनत आहे. त्यामुळे कमी वेळेत अधिक काम करणे, मोठ्या प्रमाणातील माहितीचे विश्लेषण करणे आणि निर्णयप्रक्रियेला वेग देणे शक्य होत आहे. मात्र, एआयच्या वाढत्या वापरामुळे पारंपरिक कौशल्यांबरोबरच एआयचा योग्य वापर करण्याची क्षमता हीदेखील तरुणांसाठी रोजगारातील महत्त्वाची गरज बनत आहे.

‘एआय’मुळे पुण्यातील नोकरीचे गणित बदलणार 
पुण्यातील तरुणांसाठी एआय ही केवळ नवीन तंत्रज्ञानाची ओळख राहिलेली नाही. कंपन्यांमध्ये एआयचा वापर वाढत असताना एआय टूल्स हाताळता येणे, योग्य प्रश्न विचारणे, एआयने तयार केलेल्या माहितीची पडताळणी करणे आणि त्याचा व्यावसायिक वापर करता येणे, ही कौशल्ये रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहेत.

एआय’चा सर्वाधिक वापर कुठल्या क्षेत्रात?

क्षेत्र. एआय वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण
तंत्रज्ञान. ८८%
व्यावसायिक सेवा. ८०%
प्रगत उद्योग. ७९%
मीडिया व दूरसंचार. ७९%
ग्राहक वस्तू व किरकोळ. ६८%
वित्तीय सेवा. ६५%
आरोग्यसेवा, औषधनिर्मिती
व वैद्यकीय उत्पादने. ६३%
ऊर्जा व कच्चा माल. ५९%

(स्रोत : मॅककिन्सी, ‘द स्टेट ऑफ एआय’ )

OpenAI News : OpenAI मधील ‘एथिक्स’ प्रमुखांची वर्षभरातच एक्झिट; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांमुळे चर्चेला उधाण

शहरात ‘एआय’ कुठे दिसतोय? 

आयटी — कोडिंग, सॉफ्टवेअर टेस्टिंग, डेटा विश्लेषण कॉर्पोरेट — रिपोर्ट, प्रेझेंटेशन आणि डेटा तयार करणे
मीडिया — कंटेंट आयडिया, भाषांतर, ट्रान्सक्रिप्शन
शिक्षण — अभ्यास, नोट्स आणि संशोधनासाठी एआय टूल्स
स्टार्टअप — ग्राहक सेवा, मार्केटिंग आणि व्यवसाय विश्लेषण
ई-कॉमर्स — ग्राहकांच्या आवडीनुसार उत्पादनांच्या शिफारसी

एआय म्हणजे नोकरीचा पर्याय नव्हे, कौशल्य वाढवण्याचे साधन ,एआयमुळे नोकऱ्या संपण्यापेक्षा काम करण्याची पद्धत वेगाने बदलत आहे. पुण्यासारख्या आयटी आणि स्टार्टअप हबमध्ये एआयचा स्वीकार तुलनेने वेगाने होत आहे. त्यामुळे तरुणांनी एआयला घाबरण्यापेक्षा आपल्या क्षेत्रातील कौशल्यासोबत एआयचा प्रभावी वापर शिकणे अधिक महत्त्वाचे आहे.
-आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ

Web Title: From coding to content ai is becoming a work companion in pune it hub technology news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • AI technology
  • Artificial intelligence
  • pune news

संबंधित बातम्या

Jio AI Glasses: चष्मा घाला आणि पेमेंट करा! Jio आणतोय स्वस्त AI Glass; Live Translationही मिळणार
1

Jio AI Glasses: चष्मा घाला आणि पेमेंट करा! Jio आणतोय स्वस्त AI Glass; Live Translationही मिळणार

Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला! ‘नाना गरिबांची कायम…’; फार्महाऊसवरील जाधव झाले भावूक
2

Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला! ‘नाना गरिबांची कायम…’; फार्महाऊसवरील जाधव झाले भावूक

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गिरीश गुरनानी यांच्यावर मोठी जबाबदारी; कोथरूड विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती
3

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गिरीश गुरनानी यांच्यावर मोठी जबाबदारी; कोथरूड विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती

AI Agents: समान काम, समान तंत्रज्ञान तरीही महिला AI एजंटला कमी पैसे? लिमरिक विद्यापीठाचा धक्कादायक खुलासा
4

AI Agents: समान काम, समान तंत्रज्ञान तरीही महिला AI एजंटला कमी पैसे? लिमरिक विद्यापीठाचा धक्कादायक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.