Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio AI Glasses: चष्मा घाला आणि पेमेंट करा! Jio आणतोय स्वस्त AI Glass; Live Translationही मिळणार

Jio AI Glasses: रिलायन्स जिओ लवकरच Jio AI Glasses किंवा JioFrames नावाचा AI स्मार्ट चष्मा बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. इंडिया मोबाईल काँग्रेस 2026 मध्ये या चष्म्याची झलक दाखवण्यात आली. चष्म्यासाठी जिओने स्वतःची JioRealityOS ऑपरेटिंग सिस्टिम तयार केली असून त्याचे Audio Frames आणि Smart Camera Frames असे दोन प्रकार आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 08, 2026 | 07:00 PM
Jio AI Glasses: चष्मा घाला आणि पेमेंट करा! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jio AI Glasses: चष्मा घाला आणि पेमेंट करा! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • JioFrames मध्ये UPI QR स्कॅन करून ₹5,000 पर्यंत पेमेंटची सुविधा.
  • AI चष्मा 12 भारतीय भाषांमध्ये भाषांतर करणार.
  • Jio AI Glasses ₹10 हजारांपेक्षा कमी किमतीत येण्याची माहिती.
 

रिलायन्स जिओ पुन्हा एकदा मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. मोबाईल आणि इंटरनेट स्वस्त करून जिओने जशी क्रांती केली होती, तशीच क्रांती आता चष्म्याच्या दुनियेत होणार आहे.
कंपनी लवकरच आपला पहिला Jio AI Glasses किंवा JioFrames नावाचा AI स्मार्ट चष्मा बाजारात आणत आहे. नुकत्याच झालेल्या इंडिया मोबाईल काँग्रेस 2026 मध्ये जिओने या चष्म्याची झलक दाखवण्यात आली. हा फक्त दिसण्यासाठी नाहीतर, हा पूर्णपणे AI वर चालणारा आहे. Jio AI Glasses:

सामान्य चष्म्यासारखा दिसेल, पण काम भारी करेल

बघायला गेलं तर हा अगदी साध्या चष्म्यासारखाच दिसत असून वजनाला पण एकदम हलका आहे. पण आतमध्ये जिओने स्वतःची पूर्ण टेक्नॉलॉजी टाकली आहे. यासाठी जिओने स्वतःची JioRealityOS.ऑपरेटिंग सिस्टिम बनवली आहे.

कंपनीने या चष्म्याचे दोन प्रकार आणले आहेत.

एक आहे ऑडिओ फ्रेम्स.
यामध्ये फक्त स्पीकर आणि माईक असेल. यातून तुम्ही गाणी ऐकू शकता आणि कॉलवर बोलू शकता.

दुसरा आहे तो मेन मॉडेल
म्हणजे स्मार्ट कॅमेरा फ्रेम्स. यात HD कॅमेरा आणि व्हिज्युअल इंटेलिजन्स सेन्सर दिला आहे. हाच खरा गेम चेंजर ठरणार आहे.

‘या’ चष्म्याचे भन्नाट फीचर्स
या चष्म्यात असे काही फीचर्स आहेत जे आजपर्यंत आपण फक्त सिनेमात बघितले होते.

Technology News: स्मार्टफोन चार्जिंगसाठी बोटची नवी पॉवरबँक सीरिज बाजारात; ग्राहकांना मिळणार नवे पर्याय

1. हॅलो जिओ बोलताच सुरू होणार: तुम्हाला चष्म्याला हात लावायची पण गरज नाही. फक्त “Hello Jio” असं म्हणा, चष्मा सुरू होईल. त्यानंतर तुम्ही त्याला काहीही विचारा, गुगल सर्चपासून ते हवामानापर्यंत सगळी माहिती तो तुम्हाला मिळेल.

2. बघून पेमेंट करणार: हे या चष्म्याचं सगळ्यात मोठं फीचर आहे. तुम्ही दुकानात गेला आहात आणि खिशातून फोन काढायचा कंटाळा आलाय? काही हरकत नाही. फक्त चष्म्यातून त्या दुकानाच्या UPI QR कोडकडे बघा. चष्म्यातील कॅमेरा तो कोड स्कॅन करेल आणि तुम्ही थेट 5000 रुपयांपर्यंतचं पेमेंट करू शकता. फोनला हात न लावता पेमेंट होणार.

3. 12 भाषांमध्ये ट्रान्सलेशन: तुम्ही कुठे बाहेर फिरायला गेलात आणि तिथला बोर्ड तुम्हाला समजत नसेल तर हा चष्मा तुम्हाला मदत करेल. तो बोर्डकडे पाहून AI च्या मदतीने त्याचं भाषांतर करेल आणि थेट तुमच्या कानात मराठीत किंवा हिंदीत सांगेल. एकूण 12 भारतीय भाषांना हा सपोर्ट करतो.

4. रस्ता दाखवणार आणि लाईव्ह पण करणार: तुम्ही बाईकवर असाल आणि रस्ता शोधायचा असेल तर चष्मा तुम्हाला कानातच दिशा सांगेल. हाताने फोन पकडायची गरज नाही. शिवाय जे यूट्यूबर किंवा कंटेंट क्रिएटर्स आहेत, ते थेट या चष्म्यातूनच इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर लाईव्ह जाऊ शकतात.

Samsung Galaxy Tab S12 : सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स

किंमत किती आणि कधी येणार?

बाजारात सध्या Meta आणि Ray-Ban चा असा चष्मा आहे, त्याची किंमत 30 हजाराच्या वर आहे. पण जिओ आपला हा चष्मा 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत आणणार आहे अशी माहिती आहे. टेक एक्सपर्ट्सच्या मते हा चष्मा याच वर्षाच्या शेवटी, म्हणजे नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2026 मध्ये लॉन्च होईल. जर 10 हजाराच्या आत हा चष्मा आला तर भारतात वियरेबल गॅजेट्सची एक नवीन क्रांती सुरू होईल हे नक्की.

Web Title: Jio ai glasses jioframes upi payment 12 language translation rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • AI technology
  • jio
  • meta
  • Tech News

संबंधित बातम्या

Technology News: स्मार्टफोन चार्जिंगसाठी बोटची नवी पॉवरबँक सीरिज बाजारात; ग्राहकांना मिळणार नवे पर्याय
1

Technology News: स्मार्टफोन चार्जिंगसाठी बोटची नवी पॉवरबँक सीरिज बाजारात; ग्राहकांना मिळणार नवे पर्याय

Samsung Galaxy Tab S12 : सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स
2

Samsung Galaxy Tab S12 : सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स

मेटाच्या यंत्रणेला सापडले ५३ लाख धक्कादायक कंटेंट; ९८ टक्के प्रकरणे तक्रारीआधीच उघड, नेमकं काय घडलं?
3

मेटाच्या यंत्रणेला सापडले ५३ लाख धक्कादायक कंटेंट; ९८ टक्के प्रकरणे तक्रारीआधीच उघड, नेमकं काय घडलं?

AI Agents: समान काम, समान तंत्रज्ञान तरीही महिला AI एजंटला कमी पैसे? लिमरिक विद्यापीठाचा धक्कादायक खुलासा
4

AI Agents: समान काम, समान तंत्रज्ञान तरीही महिला AI एजंटला कमी पैसे? लिमरिक विद्यापीठाचा धक्कादायक खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.