Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC Protest : आंदोलनावरून पडळकर भडकले ! ‘रोहित पवारांचं डोकं मेंढराच्या डागणीने डागलं पाहिजे,’ भाजप आमदाराच्या विधानाने नवा वाद

MPSC Protest : एमपीएससी परीक्षांमधील गोंधळ आणि अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावरून राजकारण तापलं आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर टीका करत आंदोलनाचा तमाशा केल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला.

  • By विवेक
Updated On: Oct 10, 2026 | 09:28 PM
Gopichand padalkar

Gopichand padalkar

Follow Us
Follow Us:
  • रोहित पवारांवर पडळकरांचं वादग्रस्त विधान
  • एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून टीका
  • विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकार काम करत असल्याचा दावा
 

MPSC Protest : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. एमपीएससीच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. या मागणीसाठी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. आता या आंदोलनावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली आहे.

रोहित पवारांवर पडळकरांचं वादग्रस्त विधान

सांगलीमध्ये बोलताना गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं. “रोहित पवार यांचे डोके मेंढराच्या डागणीने डागलं पाहिजे,” असं ते म्हणाले. एमपीएससीच्या अध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत रोहित पवार यांनी अध्यक्षांच्या राजीनाम्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं होतं, असा दावा पडळकर यांनी केला. त्यानंतर पुन्हा राजीनाम्याचा मुद्दा उपस्थित करण्यावरून त्यांनी रोहित पवारांना लक्ष्य केलं.

आम्हीही आंदोलनं केली आहेत; मात्र रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा तमाशा केल्याचा आरोप पडळकर यांनी केला. त्यांच्या या विधानामुळे एमपीएससी आंदोलनावरून सुरू असलेल्या राजकीय वादात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

Aditya Thackeray : ‘भाजप विरुद्ध भारत’! आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल, मुंबईतील SIR आंदोलनावरून राजकारण तापलं

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकार काम करत असल्याचा दावा

विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून, सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं पडळकर यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या मुद्द्यावर आंदोलन राजकारणविरहित राहायला हवं, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

आंदोलनादरम्यान नेमकी काय घटना घडली, याची माहिती नसल्याचं सांगत विद्यार्थ्यांची माथी भडकवणं रोहित पवार यांनी थांबवावं, असंही पडळकर म्हणाले.

संजय राऊतांवरही निशाणा

यावेळी पडळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. राज्यसभेवर पुन्हा निवडून येण्याची चिंता राऊत यांनी करावी, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला त्यांच्या सल्ल्याची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं.

केंद्रातील सरकार कोसळणार असल्याच्या राऊत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना, गेल्या सहा वर्षांपासून ते सरकार पडणार असल्याचं सांगत असल्याचा टोला पडळकर यांनी लगावला.

दरम्यान, एमपीएससी परीक्षांबाबत विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याचा मुद्दा यावर पुढे काय निर्णय होतो, याकडे विद्यार्थ्यांसह राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Raj Thackeray : ‘पराकोटीची हुकूमशाही!’ अभिजित दिपकेंच्या अटकेवर राज ठाकरे भडकले, मोदी – शहांविरोधातील संतप्त पोस्ट चर्चेत

Web Title: Gopichand padalkar rohit pawar mpsc protest vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 09:28 PM

Topics:  

  • gopichand padalkar
  • MPSC
  • rohit pawar
  • Student Protest

संबंधित बातम्या

MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; पुण्यातील आंदोलनाचा सलग 9 वा दिवस
1

MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; पुण्यातील आंदोलनाचा सलग 9 वा दिवस

Maharashtra Politics: ‘…तर विद्यार्थ्यांच्या पाठीशी वकिलांची फौज उभी करणार’; Rohit Pawar यांचा इशारा
2

Maharashtra Politics: ‘…तर विद्यार्थ्यांच्या पाठीशी वकिलांची फौज उभी करणार’; Rohit Pawar यांचा इशारा

MPSC Protest Pune: पुण्यात MPSC आंदोलनाला नवीन वळण;  ३ विद्यार्थ्यांचे उपोषण मागे
3

MPSC Protest Pune: पुण्यात MPSC आंदोलनाला नवीन वळण; ३ विद्यार्थ्यांचे उपोषण मागे

MPSC आंदोलनात रोहित पवारांचा पोलिसांना थेट अल्टिमेटम; ’15 मिनिटांत निर्णय घ्या, नाहीतर…’
4

MPSC आंदोलनात रोहित पवारांचा पोलिसांना थेट अल्टिमेटम; ’15 मिनिटांत निर्णय घ्या, नाहीतर…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.