
Pune MPSC Protest, Rohit Pawar MPSC Agitation,
पुण्यातील एस.एम. जोशी पुलावरील एमपीएससी आंदोलनाचा आजचा नववा दिवस असून पोलिसांनी विद्यार्थ्यांना पूल मोकळा करण्याचे आदेश दिले आहेत. पण आमच्या मागण्या होत नाही तोपर्यंत मागे हचणार नाही,अशी ठाम भूमिका विद्यार्थी आंदोलक आणि आमदार रोहित पवार यांनी घेतली आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची संपूर्ण राज्यात चर्चा सुरू आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासाठी एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. काहींची तब्येत अत्यंत खालावली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या ज्येष्ठ मंडळींनी आवाहन केल्यानंतर सोमनाथ, ऋषिकेश आणि गजानन या विद्यार्थ्यांनी उपोषण सोडलं. विराज शिंदे या चिमुकल्याच्या आणि आमदार विश्वजित कदम यांच्या हाताने दूध घेऊन त्यांनी उपोषण थांबवलं. पण विवेक भिमनवार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन संपणार नाही, असा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे.
दरम्यान, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी राज्य सरकारवर तीव्र निशाणा साधला आहे. “महायुती सरकार जाणूनबुजून एमपीएससी विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. सरकारने लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा पुण्याच्या मध्यवर्ती अलका टॉकीज चौकात तीव्र आंदोलन आणि ठिय्या आंदोलन करु, असा इशारा मोरे यांनी दिला आहे. एमपीएससीच्या मुद्द्यांवरून लढा तीव्र करण्यासाठी राज्यातील सर्व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिल्लीत होणाऱ्या राहुल गांधी यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
Navratri 2026: पितृपक्ष संपताच नवरात्रीची सुरुवात का होते? जाणून घ्या धार्मिक कारणे