Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar Airport News : पुरंदरमधील वनपुरीसह चार गावांतील जमिनी संपादनाची अधिसूचना जारी; एमआयडीसीच्या औद्योगिक विकासाला गती

शासनाने जमीनमालक आणि इतर हितसंबंधित व्यक्तींच्या हरकतींची सुनावणी पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमाच्या कलम ३२(१) अंतर्गत संबंधित जमिनी संपादित करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 26, 2026 | 11:14 AM
Purandar Airport News : पुरंदरमधील वनपुरीसह चार गावांतील जमिनी संपादनाची अधिसूचना जारी; एमआयडीसीच्या औद्योगिक विकासाला गती

Purandar Airport News : पुरंदरमधील वनपुरीसह चार गावांतील जमिनी संपादनाची अधिसूचना जारी; एमआयडीसीच्या औद्योगिक विकासाला गती

Follow Us
Follow Us:

पुणे : पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, खानवडी आणि पारगाव येथील औद्योगिक क्षेत्र विकासासाठी आवश्यक जमिनी संपादित करण्याबाबत राज्य शासनाने अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ अंतर्गत ही अधिसूचना २३ जून २०२६ रोजी राज्य राजपत्राच्या असाधारण अंकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, संबंधित जमिनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) औद्योगिक क्षेत्र विकासासाठी आवश्यक असल्याचे शासनाने नमूद केले आहे. या परिसराला यापूर्वीच औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. शासनाने जमीनमालक आणि इतर हितसंबंधित व्यक्तींच्या हरकतींची सुनावणी पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमाच्या कलम ३२(१) अंतर्गत संबंधित जमिनी संपादित करण्याचा निर्णय घेतला आहे.

महसुलात अव्वल पुण्याला अधिकाऱ्यांचा दुष्काळ ! जिल्ह्यात 27 पैकी 21 दुय्यम निबंधक पदे रिक्त

दरम्यान, प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर या परिसराचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विमानतळ, दळणवळण सुविधा आणि औद्योगिक विकास यांचा एकत्रित परिणाम म्हणून या भागात गुंतवणूक, उद्योगवाढ आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राजपत्रात नमूद केलेल्या अधिसूचनेनुसार, वनपुरी, उदाचीवाडी, खानवडी आणि पारगाव येथील अधिसूचित जमिनींचा समावेश या संपादन प्रक्रियेत करण्यात आला असून, पुढील औद्योगिक विकासासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात आहे.

विमानतळ प्रकल्पबाधित कर्जमाफीपासून राहणार वंचित

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव अशा सात गावात आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प उभारण्यात येत असून भूसंपादन प्रक्रियेने आता चांगलाच वेग घेतला आहे. शेतकऱ्यांची संमती घेवून त्यांच्या बँक खात्यावर थेट पैसे पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्वत्र वेगवेगळ्या कल्पना, आडाखे मांडण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, या सर्व प्रक्रियेत प्रकल्प बाधित शेतकरी शासनाच्या कर्जमाफीपासून वंचित होताना दिसत आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा परतावा या गोंडस नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच असल्याचे दिसत आहे.

Web Title: Notification issued for land acquisition in four villages including vanpuri in purandar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • Land Acquisition
  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.