Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महसुलात अव्वल पुण्याला अधिकाऱ्यांचा दुष्काळ! जिल्ह्यात 27 पैकी 21 दुय्यम निबंधक पदे रिक्त

पुणे शहराकडे राज्य सरकारने अक्षरशः दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर आले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील २७ दस्तनोंदणी कार्यालयांपैकी तब्बल २१ कार्यालयांमध्ये दुय्यम निबंधकांची पदे रिक्त आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 25, 2026 | 09:05 PM
महसुलात अव्वल पुण्याला अधिकाऱ्यांचा दुष्काळ! जिल्ह्यात 27 पैकी 21 दुय्यम निबंधक पदे रिक्त

महसुलात अव्वल पुण्याला अधिकाऱ्यांचा दुष्काळ! जिल्ह्यात 27 पैकी 21 दुय्यम निबंधक पदे रिक्त

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्याच्या तिजोरीत दस्तनोंदणीतून सर्वाधिक महसूल भरणाऱ्या पुणे शहराकडे राज्य सरकारने अक्षरशः दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर आले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील २७ दस्तनोंदणी कार्यालयांपैकी तब्बल २१ कार्यालयांमध्ये दुय्यम निबंधकांची पदे रिक्त असून, सह जिल्हा निबंधकांचे पदही महिनाभरापासून रिक्त आहे. परिणामी दस्तनोंदणीच्या कामकाजावर मोठा ताण निर्माण झाला असून, नागरिकांना विलंबाचा सामना करावा लागत आहे.

गेल्या आर्थिक वर्षात राज्यात दस्तनोंदणीतून ६१ हजार २८२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. त्यापैकी तब्बल १० हजार ८५१ कोटी रुपये म्हणजे सुमारे १८ टक्के महसूल एकट्या पुणे शहरातून जमा झाली. तर पुणे जिल्ह्यातून आणखी २ हजार ५०३ कोटी रुपयांचा महसूल राज्याच्या तिजोरीत जमा झाला आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये एकूण २७ दुय्यम निबंधक कार्यालयांमार्फत दस्तनोंदणीची कामे केली जातात. प्रत्येक कार्यालयात दुय्यम निबंधक वर्ग-२ दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती अपेक्षित असते. मात्र, अनेक वर्षांपासून ही पदे पूर्ण क्षमतेने भरली गेलेली नाहीत. आधीच १८ पदे रिक्त असताना अलीकडील बदल्यांनंतर आणखी तीन पदे रिक्त झाली असून, आता एकूण रिक्त पदांची संख्या २१ वर पोहोचली आहे.

वरिष्ठ लिपिकांकडे कारभार

अनेक कार्यालयांचा कारभार सध्या वरिष्ठ लिपिकांकडे सोपविण्यात आला आहे. मात्र, त्यांना महत्त्वाच्या निर्णयांचे अधिकार नसल्याने प्रत्येक बाबीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे दस्तनोंदणीसह इतर प्रशासकीय कामांमध्ये विलंब होत असल्याचे सांगितले जाते.

हे सुद्धा वाचा : बायको गाढ झोपेत होती, नवरा पहाटे तिच्या जवळ गेला अन्…; पुण्यात कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट

सह जिल्हा निबंधक पदाचा कारभार अधिकच अडचणीत

दरम्यान, पुणे शहर सह जिल्हा निबंधक म्हणून कार्यरत असलेले संतोष हिंगाणे यांची सहाय्यक नोंदणी महानिरीक्षकपदी बदली झाल्यानंतर हे पद गेल्या महिनाभरापासून रिक्त आहे. या पदाचा अतिरिक्त कार्यभार सह जिल्हा निबंधक वर्ग-२ मंगेश खामकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र, त्यांचीही बदली दुय्यम निबंधक म्हणून हवेली-२० कार्यालयात करण्यात आल्याने सह जिल्हा निबंधक पदाचा कारभार अधिकच अडचणीत आला आहे. वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्याची कनिष्ठ पदावर बदली झाल्याने दस्तनोंदणी विभागात विविध चर्चांना उधाण आले आहे. महसूल विभागातील या निर्णयांमुळे प्रशासकीय विसंगती समोर आल्याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे. एकीकडे पुण्याकडून दरवर्षी अधिक महसुलाची अपेक्षा केली जाते, तर दुसरीकडे महत्त्वाची पदे दीर्घकाळ रिक्त ठेवली जात असल्याने दस्तनोंदणी यंत्रणेवर ताण वाढत आहे. त्यामुळे सह जिल्हा निबंधक आणि दुय्यम निबंधकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

Web Title: Many posts of sub registrar are vacant in offices across pune and pimpri chinchwad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 09:04 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
2

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
3

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
4

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.