1500 किमी अंतर फक्त ६ तासांत; या दोन शहरांदरम्यान धावणार भारतातील दुसरी बुलेट ट्रेन
मुंबई ते अहमदाबाद भारतात पहिला बुलेट ट्रेन मार्ग जपानच्या मदतीने निर्माण होत असून लवरच या मार्गावर ट्रेन धावणार आहे. त्यानंतर आता देशभरात बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता आहे. कारण भारतात दुसऱ्या बुलेट ट्रेन मार्गाचं काम सुरू झालं असून १५०० किमी फक्त साडे सहा तासांत कापता येणार आहे. दिल्लीहून हावडापर्यंत ही ट्रेन धावणार आहे.
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीच्या किंमतीही वधारल्या! जाणून घ्या सविस्तर
या नव्या बुलेट ट्रेन मार्गावर एकूण ९ स्थानकं प्रस्तावित आहेत. पहिलं स्थानक राजधानी दिल्लीमध्ये असेल. यानंतर ट्रेन थेट आग्रा कॅन्ट येथे थांबेल. त्यानंतर ती कानपूर सेंट्रल, अयोध्या, लखनऊ मार्गे वाराणसीकडे धावेल. वाराणसीहून पुढे ही ट्रेन पाटणा आणि नंतर झारखंड ओलांडून पश्चिम बंगालमधील आसनसोलमार्गे हावडा स्थानकावर पोहोचणार आहे.
दिल्ली-हावडा बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी सर्वेक्षण पूर्ण झाले असून, त्याचा अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या प्रकल्पाचं काम दोन टप्प्यांमध्ये हाती घेतले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली ते वाराणसी दरम्यानचं काम पूर्ण केले जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात वाराणसी ते हावडापर्यंतच बुलेट ट्रेन मार्गाची उभारणी होईल. संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे ५ लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
१६६९ किमी लांबीच्या या बुलेट ट्रेन प्रवासासाठी केवळ साडेसहा तास लागतील. दिल्ली ते पाटणा हे १०७८ किमीचे अंतर ही ट्रेन अवघ्या चार तासांत पूर्ण करेल. यानंतर पाटणा ते हावडा हा ५७८ किमीचा प्रवास फक्त दोन तासांत पार पडेल. एकूण नऊ स्थानकांपैकी पाच उत्तर प्रदेशात, एक बिहारमध्ये आणि उर्वरित दोन पश्चिम बंगालमध्ये असतील. विशेष म्हणजे, पाटणा परिसरात ६० किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड ट्रॅक बांधण्यात येणार आहे.