Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ससून रुग्णालयातील सेवा विस्कळित; परिचारिकांच्या संपाचा रुग्णसेवेवर गंभीर परिणाम

ससून सर्वोपचार रुग्णालय येथे परिचारिकांच्या सुरू असलेल्या संपामुळे आरोग्यसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळित झाली असून, सलग चौथ्या दिवशीही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 26, 2026 | 02:40 PM
ससून रुग्णालयातील सेवा विस्कळित; परिचारिकांच्या संपाचा रुग्णसेवेवर गंभीर परिणाम

ससून रुग्णालयातील सेवा विस्कळित; परिचारिकांच्या संपाचा रुग्णसेवेवर गंभीर परिणाम

Follow Us
Follow Us:

पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालय येथे परिचारिकांच्या सुरू असलेल्या संपामुळे आरोग्यसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळित झाली असून, सलग चौथ्या दिवशीही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. या संपामुळे रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होत असून, नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या जात आहेत आणि अनेक रुग्णांच्या उपचारांमध्ये विलंब होत आहे. मंगळवारपासून सुमारे ७०० हून अधिक परिचारिका संपावर गेल्याने रुग्णालयातील दैनंदिन कामकाजावर मोठा ताण निर्माण झाला आहे. आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात असला, तरी नियमित ओपीडी सेवा, नव्या रुग्णांची भरती आणि शस्त्रक्रिया यावर मर्यादा आणाव्या लागत आहेत.

 

४०० परिचारिका तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध

रुग्णालय प्रशासनाने निवासी डॉक्टर तसेच नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय, इतर शासकीय रुग्णालयांतून आणि नर्सिंग कॉलेजमधून सुमारे ४०० परिचारिका तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र अनुभवी परिचारिकांच्या कमतरतेमुळे उपचार प्रक्रियेत अडथळे येत आहेत.

दरम्यान, अनेक रुग्णांना विलंब टाळण्यासाठी खासगी रुग्णालयांचा पर्याय स्वीकारावा लागत आहे, ज्यामुळे त्यांच्यावर आर्थिक भार वाढत आहे. काही रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रशासनाविरोधात नाराजीही व्यक्त केली आहे.

प्रशासन, संघटनांमध्ये चर्चेची प्रक्रिया सुरू

रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लप्पा जाधव यांनी संपावर असलेल्या परिचारिकांना तातडीने कामावर परतण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, परिचारिकांच्या मागण्या राज्यस्तरावरच्या धोरणांशी संबंधित असल्याने त्या स्थानिक पातळीवर पूर्ण करणे शक्य नाही. याबाबत राज्य आरोग्य विभागाशी सतत संपर्क ठेवण्यात येत असून, लवकरात लवकर तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. परिचारिकांच्या संघटनांकडून वेतनवाढ, कामाचे तास, तसेच सेवा अटी सुधारण्याच्या मागण्या केल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि संघटनांमध्ये चर्चेची प्रक्रिया सुरू असून, पुढील काही दिवसांत तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे सुद्धा वाचा : मुख्य लेखाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा, महापौरांचे प्रशासनाला आदेश; नेमकं प्रकरण काय?

Web Title: Healthcare services have been severely disrupted due to the nurses strike at sassoon hospital

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Sassoon Hospital
  • Sassoon Hospital

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.