Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune: न्यायालयाच्या आदेशाने पाडलेले होर्डिंग पुन्हा उभारले; राजकीय वरदहस्त? महापालिकेची भूमिका काय?

टिळक चौकातील संभाजी पोलिस चौकीच्या पाठीमागील बाजून नदीपात्रालगत तीन होर्डिंग एकत्र करून दीड वर्षापूर्वी एकच भले मोठे होर्डिंग उभारण्यात आले होते. होर्डींगच्या नियमावलीला मुठ माती देवून उभरलेल्या या होर्डींगवर माध्यमांनी

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 04, 2025 | 10:45 PM
Pune: न्यायालयाच्या आदेशाने पाडलेले होर्डिंग पुन्हा उभारले; राजकीय वरदहस्त? महापालिकेची भूमिका काय?
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार वर्षभरापूर्वी पाडलेले होर्डींग पुन्हा उभारण्यात आले आहे.  याप्रकरणी पडताळणी करून, त्यावर कारवाई केली जाईल असे महापािलका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या हाेर्डींग मालकाला राजकीय वरदहस्त असल्याची माहीती पुढे येत आहे. गेल्यावर्षी हे वादग्रस्त हाेर्डींग महापािलकेने पाडले हाेते. ते पुन्हा उभे केले जात असल्याने या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेलेल्या अधिकारी आणि  कर्मचारी यांना हुसकाविण्यात आले हाेते. याचे व्हिडिओ व्हायरल झाले हाेते.

टिळक चौकातील संभाजी पोलिस चौकीच्या पाठीमागील बाजून नदीपात्रालगत तीन होर्डिंग एकत्र करून दीड वर्षापूर्वी एकच भले मोठे होर्डिंग उभारण्यात आले होते. होर्डींगच्या नियमावलीला मुठ माती देवून उभरलेल्या या होर्डींगवर माध्यमांनी प्रकाश टाकला होता. यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्तांनी या होर्डिंगवर जाहीरात प्रसिद्ध करण्यास बंदी घालून चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

तसेच याप्रकरणी कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. त्यानंतर होर्डिंग व्यावसायिकाने सलग होर्डिंग वेगवेगळे करून तीन होर्डिंग केले होते. कारवाई होण्याची शक्यता लक्षात घेऊन होर्डिंग मालकाने कारवाईस स्थगिती मिळवण्यासाठी महापालिका न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने कारवाईस स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर महापालिकेने फेब्रुवारी २०२३ मध्ये हे होर्डिंग पाडून टाकले होते.

या घटनेस एक वर्षाचा कालावधी गेल्यानंतर त्याच होर्डींग मालकाकडून आता पुन्हा याच ठिकाणी होर्डिंग उभारणी करण्याचे काम सुरू आहे. या हाेर्डींग मालकाला राजकीय वरदहस्त असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात प्रशासनाकडून चालढकल हाेत आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भाेसले यांनी या प्रकरणी चाैकशी केली जाईल, सर्व बाबी पडताळून हाेर्डींग वर कारवाई केली जाईल असे नमूद केले. दरम्यान अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी देखील संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून माहीती मागविली आहे. या प्रकरणी याेग्य ती कारवाई केली जाईल असे त्यांनी नमूद केले.

Pune News: अनधिकृत फ्लेक्सविरोधात पालिकेची कारवाई; तब्बल 52 लाखांचा दंड वसूल

अनधिकृत फ्लेक्सविरोधात पालिकेची कारवाई

शहरात अनधिकृत फ्लेक्स बॅनरबाजी सुरू असतानाच अनधिकृत फ्लेक्स विरोधात महापालिकेच्या परवाना व आकाश चिन्ह  विभागाने कारवाई केली जात असल्याचा दावा केला आहे. गेल्या काही महिन्यात एकूण ५२ लाख रुपयाहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे तसेच ११० जणांविरुद्ध कारवाई केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

सर्व महापालिकेच्या हद्दीत उभे केले जाणारे अनधिकृत होर्डिंग, पोस्टर्स, बैनर्स, फ्लेक्स, किऑक्सच्या विरोधात सातारा येथील  सुस्वराज्य फाउंडेशनने याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे.  उच्च न्यायालयाने जानेवारी २०१७  मध्ये  अनधिकृत होर्डिंग, पोस्टर्स, बॅनर्स, फ्लेक्स, किऑक्स विरुद्ध कारवाई  करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गेल्या वर्षी असेच आदेश जारी केले आहेत.  त्यानुसार पुणे महापालिकेने शहरातील अनधिकृतपणे उभारले जाणार्या होर्डिंग, पोस्टर्स, बॅनर्स, फ्लेक्स, किऑक्स विरुद्ध  मागील तीन महिन्यांपासून मोहीम हाती घेतली आहे, त्याअंतर्गत ऑक्टोबर २०२४ मध्ये विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्यामध्ये १४४९ फ्लेक्स, पोस्टर्स, बॅनर्स, किऑक्स निष्कासित करण्याची कार्यवाही करण्यात आली होती.

Web Title: Hoardings demolished by court order were re erected pune corporation enquiry and take decision pune marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 10:45 PM

Topics:  

  • Court
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…
1

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा
2

Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा

पुणे की शिमला? नागरिक गारठले; शहरात पुढील दोन दिवसांमध्ये…, कसे असणार तापमान?
3

पुणे की शिमला? नागरिक गारठले; शहरात पुढील दोन दिवसांमध्ये…, कसे असणार तापमान?

Pune Accident : अवजड वाहनांचा कहर! हिंजवडीत डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी
4

Pune Accident : अवजड वाहनांचा कहर! हिंजवडीत डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.