Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘श्रीमंतां’चा थाटच न्यारा! ढोल-ताशांचा गजर, ‘मोरया’चा जयघोष अन्…; ‘दगडूशेठ’ बाप्पांची वैभवशाली सांगता मिरवणूक

Pune Ganeshotsav: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३४ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला थाटात निघाली.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 26, 2026 | 03:44 PM
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

Follow Us
Follow Us:
  • जय गणेशच्या नामघोषात ‘दगडूशेठ’ बाप्पांची वैभवशाली सांगता मिरवणूक
  • श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे १३४ वे वर्ष
  • अनंत चतुदर्शी ला रात्री ८.२५ वाजता हौदात मूर्तीचे विसर्जन
पुणे/Pune ganeshotsav: श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय… मोरया, मोरया… जय गणेश… गणपती बाप्पा मोरया… च्या जयघोषात आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पांची श्री वक्रतुंड रथातून वैभवशाली सांगता मिरवणूक पार (Pune Ganpati) पडली. अनंत चतुदर्शी ला रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी पांचाळेश्वर घाटावरील हौदात मूर्तीचे विसर्जन करून बाप्पाला निरोप देण्यात आला.

सलग चौथ्या वर्षी दुपारी ४ वाजता बेलबाग चौकातून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्यावेळी लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांनी अलोट गर्दी केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३४ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला थाटात निघाली.

Ganeshotsav: ‘वक्रतुंड’ ते ‘माता महाकाली’! रथ, पालख्या अन्…; लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुण्यनगरी सज्ज

तर, सायंकाळी ७.३० वाजता टिळक चौकात मुख्य विसर्जन रथाचे आगमन होताच हा क्षण डोळ्यात साठविण्यासाठी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रथाचे सारथ्य देखील यावेळी केले.

श्री वक्रतुंड रथाची मांडणी यंदाची प्रतिकृती असलेल्या वृंदावनमधील प्रेम मंदिराच्या विषयाप्रमाणे करण्यात आली होती. मंदिर वास्तुकलेने प्रेरित असा हा रथ तयार करण्यात आला. रथाची संकल्पना भारतीय मंदिर वास्तु केलेवर आधारित असून त्यात पारंपरिक शिल्पकला आणि आधुनिक फॅब्रिकेशनचा सुंदर संगम भाविकांना पाहायला मिळाला.

मिरवणुकीत ‘जय गणेश अमली पदार्थ मुक्त भारत अभियान’ जनजागृती करणारा ‘मानवसेवा रथ’ अग्रभागी होता. त्यामध्ये विनायक आणि रोहन देवळणकर यांचा चौघडा व प्रमोद गायकवाड यांचे सनई वादन झाले. तसेच स्वरूपवर्धिनीचे पथक, प्रभात बँड, दरबार बँड आणि केरळचे चेंदा मेलम पथक असा लवाजमा होता. तसेच पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त देखील मोठया संख्येने सहभागी झाले.

Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या देखाव्यांना ‘AI’ची साथ; तंत्रज्ञानाने बदलले जिवंत देखाव्यांचे रूप

 ‘दगडूशेठ’ च्या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीचे लाईव्ह प्रक्षेपण
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक जगभरातील गणेशभक्तांना अनुभविता यावी, यासाठी ट्र्स्टतर्फे यावर्षी विसर्जन मिरवणुकीचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. ट्रस्टच्या युट्युब पेजसह सर्व सोशल माध्यमांवर ही मिरवणूक घरबसल्या पाहण्याचा आनंद जगभरातील लाखो गणेशभक्तांनी घेतला.

Web Title: Immersion of shrimant dagdusheth halwai ganpati bappa took place on anant chaturdashi pune ganesh festival 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • dagdusheth halwai
  • Ganesh Visarjan
  • Ganeshotsav 2026
  • pune ganpati
  • pune news

संबंधित बातम्या

MPSC विद्यार्थ्यांचे ‘या’ तारखेपासून पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन; रोहित पवार आणि विश्वजीत कदमही सहभागी होणार
1

MPSC विद्यार्थ्यांचे ‘या’ तारखेपासून पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन; रोहित पवार आणि विश्वजीत कदमही सहभागी होणार

Mumbai News: ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद; ५३ हजार शिबिरांचे आयोजन
2

Mumbai News: ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद; ५३ हजार शिबिरांचे आयोजन

Satara DJ Dolby Crackdown: डॉल्बी जप्तीवरून खासदार विरुद्ध पालकमंत्री! साताऱ्यात डीजेच्या आवाजावरून राजकीय जुगलबंदी
3

Satara DJ Dolby Crackdown: डॉल्बी जप्तीवरून खासदार विरुद्ध पालकमंत्री! साताऱ्यात डीजेच्या आवाजावरून राजकीय जुगलबंदी

Rajapur Ganesh Visarjan: ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन् बाप्पाचा जयघोष! राजापूरमध्ये ११ दिवसांच्या बाप्पाला उत्साहात निरोप
4

Rajapur Ganesh Visarjan: ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन् बाप्पाचा जयघोष! राजापूरमध्ये ११ दिवसांच्या बाप्पाला उत्साहात निरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.