Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Post: खांद्यावर जबाबदारीचं ओझं अन चेहऱ्यावर गोड हास्य; टपाल सेवेत ५८.५ टक्के महिलांनी कोरलं आपलं नाव

Indian Post: ग्रामीण भागातील महिला कर्मचाऱ्यांसाठी या नोकरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कामाची सांगड त्या आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांशी घालत आहेत. घरातील स्वयंपाक, मुलांची जबाबदारी, शेतीची कामे आणि कुटुंबाची देखभाल करत असतानाच टपाल सेवेतही त्या आपली भूमिका बजावत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 26, 2026 | 02:35 AM
Indian Post

Indian Post

Follow Us
Follow Us:
  • संसाराची जबाबदारी, हातात टपालाची बॅग; पुण्यात १,११५ महिलांची ‘डाक’सेवा
  • पुणे जिल्ह्यात टपाल विभागात महिलांचा वाढता सहभाग
  • विभागीय सेवेत ५८.५ टक्के महिला
किरण ढोणे/Indian Post: हातात टपालाची बॅग… सकाळपासून गावागावांत फिरत नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचणारी पत्रे, कागदपत्रे आणि विविध सेवा… आणि दुसरीकडे घरातील संसार, मुलांची जबाबदारी, शेतीची कामे. या सगळ्याचा मेळ साधत पुणे जिल्ह्यातील १,११५ महिला टपाल सेवेत कार्यरत (Indian Post) आहेत. विशेष म्हणजे, विभागीय सेवेत कार्यरत महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण एकूण महिला कर्मचाऱ्यांपैकी ५८.५ टक्के आहे.

टपाल विभागातील नोकरी आता केवळ शहरातील महिलांपुरती मर्यादित राहिलेली नाही. ग्रामीण भागातील मुली आणि महिलाही मोठ्या संख्येने या सेवेकडे वळताना दिसत आहेत. विशेषतः ग्रामीण डाक सेवक (GDS) म्हणून काम करण्याची संधी ग्रामीण महिलांसाठी रोजगाराचा महत्त्वाचा पर्याय ठरत आहे. पुणे जिल्ह्यात ४६३ महिला ग्रामीण डाक सेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यात पुणे MFL विभागातील सर्वाधिक १९७ महिला, बारामतीतील १३१ महिला, पुणे शहर पूर्व विभागातील ८५, तर पुणे शहर पश्चिम विभागातील ५० महिला GDS म्हणून काम करत आहेत.

दहावीच्या शिक्षणानंतर रोजगाराची संधी

ग्रामीण डाक सेवक पदासाठी दहावीपर्यंतचे शिक्षण असलेल्या उमेदवारांनाही संधी मिळत असल्याने ग्रामीण भागातील अनेक मुलींसाठी टपाल विभाग हा शिक्षणानंतर रोजगाराचा मार्ग ठरत आहे. उच्च शिक्षणासाठी शहरात जाणे शक्य नसलेल्या किंवा कौटुंबिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण थांबलेल्या मुलींना आपल्या गावाजवळच काम करण्याची संधी मिळते. यामुळे “दहावीपर्यंत शिक्षण, त्यानंतर नोकरी आणि स्वतःच्या पायावर उभे राहणे” असा प्रवास अनेक ग्रामीण मुलींसाठी शक्य होत आहे. नियमित उत्पन्नासोबतच सरकारी यंत्रणेचा भाग म्हणून काम करण्याचा आत्मविश्वासही त्यांना मिळत आहे.

India Post Recruitment 2026: भारतीय डाक विभागात १० वी पास उमेदवारांसाठी भरती जाहीर! कोण करू शकते अर्ज? जाणून घ्या सविस्तर

नोकरीसोबत घराची जबाबदारी

ग्रामीण भागातील महिला कर्मचाऱ्यांसाठी या नोकरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कामाची सांगड त्या आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांशी घालत आहेत. घरातील स्वयंपाक, मुलांची जबाबदारी, शेतीची कामे आणि कुटुंबाची देखभाल करत असतानाच टपाल सेवेतही त्या आपली भूमिका बजावत आहेत. गावातील नागरिकांना पत्रे आणि टपाल पोहोचविण्यापासून विविध टपाल व आर्थिक सेवा देण्यापर्यंत महिलांचा सहभाग वाढला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला केवळ सेवा घेणाऱ्या नव्हे, तर सेवा देणाऱ्या भूमिकेतही पुढे येत आहेत.

विभागीय सेवेतही महिलांची मोठी उपस्थिती :
ग्रामीण डाक सेवकांबरोबरच विभागीय टपाल सेवेतही महिलांची संख्या लक्षणीय आहे. पुणे शहर पश्चिम विभागात २३१, पुणे शहर पूर्व विभागात २२२, RMS B विभागात ९०, पुणे MFL मध्ये ५८, बारामतीत ३४ आणि पुणे रिजन कार्यालयात १७ महिला कार्यरत आहेत.

म्हणजेच, ग्रामीण भागातील पोस्टमनपासून शहरातील विभागीय कार्यालयांपर्यंत टपाल विभागाच्या विविध स्तरांवर महिलांची उपस्थिती ठळक होत आहे. आर्थिक स्वावलंबन, घराजवळ रोजगार आणि सरकारी सेवेत काम करण्याची संधी यामुळे ग्रामीण भागातील मुलींसाठी टपाल विभागाची नोकरी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

ग्रामीण डाक सेवक (GDS) महिलांची संख्या

पुणे जिल्ह्यातील महिला कर्मचारी (विभागीय सेवा)

टपाल विभाग. महिला GDS संख्या

पुणे शहर पूर्व. 85
पुणे शहर पश्चिम. 50
पुणे MFL. 197
बारामती. 131
एकूण. 463

एकूण ग्रामीण डाक सेवक महिला
463 (41.5%)
ग्रामीण भागातील महिलांचा वाढता सहभाग

मोठी बातमी! India Post GDS 4th Merit List जाहीर; एकूण २८,६३६ जागांमध्ये तुमची निवड झाली का? ‘या’ सोप्या ट्रिकने लगेच चेक करा

पुणे जिल्ह्यातील महिला कर्मचारी (विभागीय सेवा) :

टपाल विभाग. महिला विभागीय कर्मचारी संख्या
पुणे शहर पूर्व. 222
पुणे शहर पश्चिम. 231
पुणे MFL. 58
बारामती. 34
RMS B विभाग. 90
पुणे रिजन कार्यालय. 17
एकूण. 652

एकूण महिला कर्मचारी (विभागीय सेवा)
652 (58.5%)

पुणे जिल्ह्यात एकूण महिला कर्मचारी
1115 (100%)

टपाल सेवेत महिलांचा वाटा जवळपास
60 टक्क्यांवर

Web Title: Increasing numbers of women postal department pune women constitute 58 5 of divisional workforce

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Indian Post
  • navarashtra special
  • pune news

संबंधित बातम्या

दुचाकीवर तिघे बसल्यास दंड, मात्र पीएमपी बसमधील जीवघेण्या गर्दीकडे दुर्लक्ष; कारवाई कधी होणार?
1

दुचाकीवर तिघे बसल्यास दंड, मात्र पीएमपी बसमधील जीवघेण्या गर्दीकडे दुर्लक्ष; कारवाई कधी होणार?

Raksha Bandhan 2026: ‘इको-फ्रेंडली’ राख्यांना विशेष पसंती! राखी बांधा आणि झाड लावा’, काय आहे विशेष उपक्रम?
2

Raksha Bandhan 2026: ‘इको-फ्रेंडली’ राख्यांना विशेष पसंती! राखी बांधा आणि झाड लावा’, काय आहे विशेष उपक्रम?

DSP Trophy U-12 Cricket: इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि फँटम क्रिकेट अकादमीची विजयी आगेकूच
3

DSP Trophy U-12 Cricket: इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि फँटम क्रिकेट अकादमीची विजयी आगेकूच

तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच, पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट…
4

तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच, पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.