Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अष्टविनायक भाविकांसाठी महत्त्वाची बातमी; ‘ही’ 3 मंदिरे उद्यापासून महिनाभर बंद

जतन आणि संवर्धनाच्या कामासाठी अष्टविनायकातील तीन प्रमुख मंदिरे १० मे ते ९ जून या कालावधीत भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 09, 2026 | 02:38 PM
अष्टविनायक भाविकांसाठी महत्त्वाची बातमी; 'ही' 3 मंदिरे उद्यापासून महिनाभर बंद

अष्टविनायक भाविकांसाठी महत्त्वाची बातमी; 'ही' 3 मंदिरे उद्यापासून महिनाभर बंद

Follow Us
Follow Us:

पिंपरी : महाराष्ट्र शासनाच्या ‘अष्टविनायक विकास आराखड्या’ अंतर्गत पुरातत्त्व विभागामार्फत सुरू असलेल्या जतन आणि संवर्धनाच्या कामासाठी अष्टविनायकातील तीन प्रमुख मंदिरे १० मे ते ९ जून या कालावधीत भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात श्री क्षेत्र मोरगाव (मयुरेश्वर), श्री क्षेत्र थेऊर (चिंतामणी) आणि श्री क्षेत्र सिद्धटेक (सिद्धिविनायक) या मंदिरांचा समावेश आहे.

 

पुरातत्त्व विभागाचे जतन व संवर्धन कार्य

ऐतिहासिक वारसा असलेल्या या मंदिरांना पौराणिक काळाप्रमाणेच मूळ सुबक दगडी रूप देण्यासाठी सध्या दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत. मुख्य गाभारा आणि सभामंडपाचे काम करताना भाविकांच्या गर्दीमुळे अडथळा निर्माण होऊ नये आणि हे काम विहित वेळेत पूर्ण व्हावे, या उद्देशाने पुरातत्त्व विभागाने ही मंदिरे बंद ठेवण्याची विनंती केली होती.

सह धर्मादाय आयुक्तांचे आदेश

या विनंतीची दखल घेत, सह धर्मादाय आयुक्त (पुणे विभाग) यांनी मंदिर प्रशासन, पुजारी, ग्रामस्थ आणि पुरातत्त्व विभाग यांची मते ऐकून घेतली. त्यानंतर कामाची निकड लक्षात घेता ७ मे २०२६ रोजी ही मंदिरे महिनाभर बंद ठेवण्याचे आदेश दिले. चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळानेही या आदेशानुसार ठराव संमत केला असून, ८ मे रोजी ग्रामसभा घेऊन स्थानिक ग्रामस्थांना या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे.

भाविकांसाठी महत्त्वाच्या सूचना

मंदिरे बंद असलेल्या काळात खालील नियमांचे पालन केले जाईल

नित्य पूजा सुरू राहणार : मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी बंद असले, तरी श्रींची नित्य पूजा, अभिषेक आणि इतर धार्मिक विधी परंपरेनुसार सुरू राहतील.

थेट दर्शन बंद : या एक महिन्याच्या कालावधीत भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश मिळणार नाही किंवा प्रत्यक्ष दर्शन घेता येणार नाही.

प्रवेश निर्बंध : केवळ अधिकृत पुजारी, बांधकाम यंत्रणेचे कर्मचारी, अधिकारी आणि विश्वस्त यांनाच मंदिर परिसरात प्रवेश दिला जाईल.

“अष्टविनायक मंदिरांचे हे संवर्धन दीर्घकालीन सुरक्षितता आणि भाविकांच्या भविष्यातील सोयीसाठी अत्यंत आवश्यक आहे. हे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी भाविकांनी आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.” — श्री मंदार महाराज देव (मुख्य विश्वस्त, चिंचवड देवस्थान ट्रस्ट)

हे सुद्धा वाचा : ‘रयत शिक्षण संस्थेला जागतिक दर्जा देणार!’ कर्मवीर पुण्यतिथी दिनी शरद पवारांचा मोठा संकल्प

Web Title: It has been decided to close the three major temples of ashtavinayak for a month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • maharashtra
  • pune news
  • temple news

संबंधित बातम्या

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
1

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
2

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
3

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
4

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.