Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साखर उत्पादनात महाराष्ट्राची उत्तुंग झेप; राज्यातून तब्बल 98.95 लाख टन साखरेची विक्रमी निर्मिती

देशाच्या साखर उद्योगात महाराष्ट्राने यंदा आपली मोहोर उमटवली असून, उत्तर प्रदेशला पिछाडीवर टाकत उत्पादनात पुन्हा एकदा अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 05, 2026 | 02:05 PM
साखर उत्पादनात महाराष्ट्राची उत्तुंग झेप; राज्यातून तब्बल 98.95 लाख टन साखरेची विक्रमी निर्मिती

साखर उत्पादनात महाराष्ट्राची उत्तुंग झेप; राज्यातून तब्बल 98.95 लाख टन साखरेची विक्रमी निर्मिती

Follow Us
Follow Us:

पुणे : देशाच्या साखर उद्योगात महाराष्ट्राने यंदा आपली मोहोर उमटवली असून, उत्तर प्रदेशला पिछाडीवर टाकत उत्पादनात पुन्हा एकदा अव्वल स्थान प्राप्त केले आहे. ३१ मार्च अखेरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राने उत्पादनात मोठी झेप घेतली असली तरी, कारखान्यांचे अर्थकारण आणि आगामी मान्सूनच्या चिंतेमुळे साखर उद्योगासमोर आव्हाने कायम असल्याचे चित्र दिसत आहे.

 

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, यंदा देशातील एकूण साखर उत्पादनात मोठी सुधारणा झाली आहे. ३१ मार्चपर्यंत देशात २७१.२० लाख टन साखरेची निर्मिती झाली असून, गेल्या वर्षी याच काळात हे उत्पादन २४८.६५ लाख टन इतके होते. म्हणजेच राष्ट्रीय स्तरावर उत्पादनात सुमारे २३% वाढ नोंदवण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य उत्तर प्रदेशला मागे टाकून साखर उत्पादनामध्ये अव्वल ठरले आहे.

राज्यांची तुलनात्मक स्थिती (३१ मार्चपर्यंत)

राज्य चालू हंगाम (लाख टन) मागील हंगाम (लाख टन)
महाराष्ट्र ९८.९५ ८०.१०
उत्तर प्रदेश ८७.४५ ९१.००
कर्नाटक ४६.२७

 

मागील वर्षी उत्तर प्रदेश ९१ लाख टनांसह देशात प्रथम क्रमांकावर होते, तर महाराष्ट्र ८०.१० लाख टनांसह दुसऱ्या क्रमांकावर होते. यंदा मात्र महाराष्ट्राने आपली स्थिती लक्षणीयरीत्या सुधारली आहे.

गाळप हंगाम आणि कारखान्यांची स्थिती

२०२५-२६ च्या हंगामात देशभरातील एकूण ५४१ साखर कारखान्यांनी गाळप प्रक्रियेत सहभाग घेतला. यामध्ये महाराष्ट्रातील २१० कारखान्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, यंदा राज्याचा गाळप हंगाम सरासरी ११० दिवस चालला, जो गेल्या वर्षी केवळ ८३ दिवस होता.

हंगामाची सद्यस्थिती:

राज्यातील २१० पैकी २०२ कारखान्यांची धुराडी आता शांत झाली आहेत.

उर्वरित ८ कारखाने येत्या आठवड्यात आपले कामकाज बंद करण्याची शक्यता आहे.

विक्रमी उत्पादन तरीही चिंता का?

साखर उत्पादनाचे आकडे समाधानकारक असले तरी उद्योगापुढील तांत्रिक आणि आर्थिक प्रश्न सुटलेले नाहीत. तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही साखर कारखान्याचे आर्थिक गणित तेव्हाच जुळते जेव्हा तो हंगाम किमान १४० ते १५० दिवस चालतो. यंदा हंगाम वाढला असला तरी तो या निकषापर्यंत पोहोचू शकलेला नाही.

भविष्यातील संकटे

पावसाची ओढ : हवामान खात्याने यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. याचा थेट परिणाम पुढील वर्षीच्या ऊस लागवडीवर आणि उपलब्धतेवर होण्याची शक्यता आहे.

आर्थिक अनिश्चितता : उत्पादन वाढले तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, साखरेचा हमीभाव आणि कारखान्यांचा उत्पादन खर्च यांचा मेळ घालताना कारखानदारांची दमछाक होत आहे. त्यामुळे, महाराष्ट्राने उत्पादनात ‘नंबर १’ चे स्थान मिळवले असले तरी, या यशाचा आनंद साजरा करतानाच भविष्यातील अनिश्चिततेचे ढग साखर उद्योगावर कायम आहेत.

हे सुद्धा वाचा : पीएमआरडीएमध्ये अंतर्गत बदल्यांसाठी जोरदार फिल्डिंग! दबावतंत्राचा वाढता प्रभाव; आयुक्तांच्या भुमिकेकडे लक्ष

Web Title: It has been reported that the state of maharashtra has achieved record sugar production

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Harshvardhan Patil
  • Sugar Factory

संबंधित बातम्या

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर? २१ ऑगस्टला होणार विस्ताराची शक्यता; फडणवीसांच्या दिल्लीवारीने चर्चांना उधाण
1

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर? २१ ऑगस्टला होणार विस्ताराची शक्यता; फडणवीसांच्या दिल्लीवारीने चर्चांना उधाण

AI In Indian Sugar Industry : साखर उद्योगासाठी एआय ठरतंय ‘गेमचेंजर’; उसाची रिकव्हरी अन् इथेनॉल निर्मितीत होणार मोठी वाढ
2

AI In Indian Sugar Industry : साखर उद्योगासाठी एआय ठरतंय ‘गेमचेंजर’; उसाची रिकव्हरी अन् इथेनॉल निर्मितीत होणार मोठी वाढ

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, स्मृती इराणींचे कमबॅक
3

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, स्मृती इराणींचे कमबॅक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.