Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“पंतप्रधान मोदी, अमित शहा देशाचे गद्दार,” राहुल गांधी यांच्या वक्तव्याने देशभरात खळबळ

काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राष्टीय स्वयंसेवक संघ यांच्यावर जोरदार निशाणा साधत त्यांना 'देशाचे गद्दार' म्हणून म्हणून संबोधले आहे.

  • By विवेक
Updated On: May 21, 2026 | 09:01 PM
'जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा'; राहुल गांधींचा सरकारला इशारा, प्रशांत किशोरांच्या विजयाचीही चर्चा

'जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा'; राहुल गांधींचा सरकारला इशारा, प्रशांत किशोरांच्या विजयाचीही चर्चा

Follow Us
Follow Us:
  • राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राष्टीय स्वयंसेवक संघ यांच्यावर जोरदार निशाणा
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राष्टीय स्वयंसेवक संघ ‘देशाचे गद्दार’ – राहुल गांधी
  • राहुल गांधींचे वक्तव्य लज्जास्पद – नितीन गडकरी
काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राष्टीय स्वयंसेवक संघ यांच्यावर जोरदार निशाणा साधत त्यांना ‘देशाचे गद्दार’ म्हणून म्हणून संबोधले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरात राजकीय खळबळ निर्माण झाली असून सत्ताधाऱ्यांनी यावरून राहुल गांधी यांच्यावर चांगलीच आगपाखड केली आहे. राहुल गांधी यांनी बुधवारी (२० मे) उत्तर प्रदेश येथील रायबरेली या आपल्या मतदारसंघात दौऱ्यावर असताना हे वक्तव्य केले आहे. “पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि आरएसएस हे रोज राज्यघटनेवर हल्ला करत असून त्यांनी देशाचे हितसंबंध निवडक उद्योगपतींना विकले आहेत,” असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

रायबरेली येथील आपल्या मतदारसंघात दौऱ्यावर असताना एका सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, “जेव्हा संघाचे कार्यकर्ते तुमच्या घरी येऊन नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबद्दल बोलतात तेव्हा त्यांना सांगा कि त्यांची संघटना, मोदी आणि शहा हे गद्दार आहेत. त्यांनी आपला देश विकण्याचे काम केले. त्यांनी आपल्या राज्यघटनेवर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यावर हल्ला केला,” अशी टीका त्यांनी यावेळी केली. यावरून आता राजकीय वातावरण तापले असून भाजपच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. .

भाजप अध्यक्षांचा पलटवार

भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी यावरून राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे. “राहुल गांधी यांचे वक्तव्य देशातील १४० कोटी नागरिकांचा अपमान आहे. या वक्तव्यामधून निवडणुकीतील पक्षाच्या पराभवामुळे झालेली त्यांची निराशा दिसून येते. त्यांचा मानसिक तोल ढासळला आहे. ज्या व्यक्तीने दहशतवादी घटनांना आळा घातला. माओवाद संपवला आणि जगात तिरंग्याबद्दलचा आदर वाढवला, अश्या व्यक्तींसाठी तुम्ही असे शब्द वापराल का?” असा सवाल त्यांनी केला आहे.

OBC Non Creamy Layer: राज्य सरकारचा मोठा निर्णय; OBC नॉन-क्रिमी लेयर उत्पन्न मर्यादेत मोठी वाढ शक्य

राहुल गांधींचे वक्तव्य लज्जास्पद – नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही यावरून राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या ‘X’ अकाऊंटवरून टीका करत ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य अत्यंत लज्जास्पद आणि दुर्दैवी आहे. त्यातून त्यांची गोंधळलेली मानसिकता दिसून येते. राजकारणात वैचारिक मतभेद असणे स्वाभाविक आहे, परंतु लोकशाहीतील घटनात्मक पदांवर असलेल्या नेत्यांनी अशी भाषा आणि शब्द वापरणे अत्यंत निंदनीय आहे. हा देशवासीयांच्या भावनांचा अपमान आहे. देशातील जनतेने काँग्रेस पक्षाच्या या द्वेषपूर्ण राजकारणाला सडेतोड उत्तर दिले आहे आणि यापुढेही देत ​​राहील,” असे ते यावेळी म्हणाले.

शरद पवार राजकारणात पुन्हा ‘ॲक्टिव्ह’; राष्ट्रवादीतील फूट आता थांबणार?

Web Title: Rahul gandhi slams pm narendra modi amit shah and rss and call them traitors of nation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 09:01 PM

Topics:  

  • Amit Shah
  • PM Narendra Modi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात
1

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा
2

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा

‘महिला या देशाची सर्वात मोठी ताकद’; राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’मध्ये तरुणाईशी संवाद
3

‘महिला या देशाची सर्वात मोठी ताकद’; राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’मध्ये तरुणाईशी संवाद

राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वीच ABVP-NSUI वाद चिघळला; विद्यार्थिनींना धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप
4

राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वीच ABVP-NSUI वाद चिघळला; विद्यार्थिनींना धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.