Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jejuri Warkari Accident : वारीदरम्यान भीषण दुर्घटना! वारकऱ्यांच्या दिंडीला दिंडीच्याच ट्रकने उडवले; ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू

Jejuri Warkari Accident Update : आषाढी वारीदरम्यान एक भीषण दुर्घटना घडली आहे. जेजुरीत सकाळी वारकऱ्यांचा भीषण अपघात झाला असून या दुर्दैवी घटनेत ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 13, 2026 | 10:00 AM
Warkari Accident

Warkari Accident

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात वारकऱ्यांच्या दिंडीत घुसला ट्रक वाहन
  • ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू
  • सासवड–जेजुरी मार्गावर घटना
Jejuri Warkari Accident : आषाढी वारीदरम्यान सासवड–जेजुरी मार्गावर रविवारी सकाळी भीषण अपघात झाला. बेलसर टोलनाक्यापासून जेजुरीच्या दिशेने सुमारे ५०० मीटर अंतरावर, हॉटेल शिपदीप लॉजिंगसमोर वारकऱ्यांना ट्रकने धडक दिल्याने तीन महिला वारकरी जागीच ठार झाल्या, तर चार महिला जखमी झाल्या.

हे देखील वाचा : मोशी दुर्घटना मानवनिर्मित, आयुक्तांना निलंबित करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; सुषमा अंधारेंची मागणी

दिंडीच्याच ट्रकने उडवले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रंगनाथ महाराज पोखरबीसीकर यांच्या दिंडीचा ट्रक आणि सांगली जिल्ह्यातील कसबेडिगराज येथील दिंडीतील महिला वारकरी यांच्यात हा अपघात झाला. या दुर्घटनेत तीन महिलांचा मृत्यू झाला असून, चार महिलांना दुखापत झाली आहे.

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले

जखमींना तातडीने जेजुरी येथील आयसीयू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासह पंचनामा व अन्य कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.

अपघाताचे कारण अस्पष्ट

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या दुर्घटनेमुळे वारी मार्गावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील कार्यवाही सुरू ठेवली आहे.

पोलिसांच्या वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; लाखो वारकरी मार्गावर असताना सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर चर्चा

या अपघातानंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या वाहतूक नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वारीच्या काळात सासवड–जेजुरी मार्गावर मोठ्या प्रमाणात वारकरी, दिंड्या आणि जड वाहने एकाच मार्गाने प्रवास करत असतात. अशा परिस्थितीत जड वाहनांची हालचाल, वेग नियंत्रण, स्वतंत्र लेन, तसेच संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त याबाबत पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वारकरी संघटनांकडूनही दरवर्षी वारी मार्गावरील सुरक्षिततेबाबत अधिक प्रभावी नियोजनाची मागणी केली जाते. या पार्श्वभूमीवर बेलसर टोलनाक्याजवळ झालेल्या या दुर्घटनेमुळे वारी मार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा आणि सुरक्षा आराखड्याचा फेरआढावा घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून पालख्या निघतात. यंदाही आषाढी वारीसाठी अनेक वारकीर चालत पंढीरीला निघाले आहेत. परंतु आज सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने या आषाढी वारीला गालबोट लावला.

हे देखील वाचा : मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर; आयुक्तांकडून तातडीने कार्यवाहीचे आदेश

Web Title: Jejuri warkari accident dindi truck runs over pilgrims 3 women dead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 09:50 AM

Topics:  

  • Accident News
  • Ashadhi Wari

संबंधित बातम्या

Ashadhi Ekadashi Special: पंढरीचा पांडुरंग आणि तिरूमलाचा व्यंकटेश या दोन्ही रूपांमागील साम्य काय? जाणून घ्या
1

Ashadhi Ekadashi Special: पंढरीचा पांडुरंग आणि तिरूमलाचा व्यंकटेश या दोन्ही रूपांमागील साम्य काय? जाणून घ्या

Ashadhi Wari 2026: पंढरपूरच्या वारीचा इतिहास, दिंडी परंपरा आणि वारकरी संप्रदायाचे महत्त्व जाणून घ्या
2

Ashadhi Wari 2026: पंढरपूरच्या वारीचा इतिहास, दिंडी परंपरा आणि वारकरी संप्रदायाचे महत्त्व जाणून घ्या

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीतील रिंगण, फुगडी, दिंडी आणि टाळ-मृदुंग परंपरांचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या
3

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीतील रिंगण, फुगडी, दिंडी आणि टाळ-मृदुंग परंपरांचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi: ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात माऊलींच्या पालखीचे प्रस्थान; जाणून घ्या रिंगण सोहळ्याचे महत्त्व
4

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi: ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात माऊलींच्या पालखीचे प्रस्थान; जाणून घ्या रिंगण सोहळ्याचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.